वर्डप्रेस हे एक खूप प्रसिद्ध कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे आणि याचा वापर करणे सुद्धा खूप सोपे आहे परंतु वर्डप्रेस मध्ये सुद्धा असे काही कॉमन errors आहेत त्याचा त्रास आपल्याला कधी कधी होतो . आज या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला वर्डप्रेस errors कोणते आहेत म्हणजेच wordpress errors in marathi व हे errors चा अर्थ काय आहे हे सांगणार आहे तर चला सुरु करूया…..
जाणून घ्या 9 वर्डप्रेस Errors बद्दल माहिती | WordPress Errors In Marathi
1. Error Establishing a Database Connection
हा error येण्या मागचे मुख्य कारण आहे ते म्हणजे तुमची वेबसाइट ही तुमच्या डेटाबेस शी कनेक्ट नाही होत आहे . परंतु कधी कधी हा error वेब पेज रीलोड केल्या नंतर निघून सुद्धा जातो . परंतु जर वेब पेज रीलोड केल्या नंतर ही हा error जात नसेल तर हा error फिक्स करण्यासाठी मी नक्कीच एक पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करीन .
2. 500 Internal Server Error
खरंतर 500 Internal Server Error हा error प्रत्येक वर्डप्रेस यूजर ल गोंधळात टाकणारा आहे . परंतु हा एक सामान्य error आहे . हा error येण्याच कारण म्हणजे जेव्हा तुमच्या वेब सर्वर सोबत काही छेडछाड केली जाते जसे की .htaccess मध्ये काही छेडछाड झाली असेल तर किंवा कोणत्या तरी प्लगइन मुळे किंवा php च्या मेमोरी लिमिट मुळे सुद्धा हा error येतो . जेव्हा तुमच्या वर्डप्रेस च्या फाइल सोबत छेडछाड केली जाते तेव्हा तुमचा सर्वर योग्य टी माहिती देण्यात कमी पडतो . व ह्या मुळे सामान्य वेब पेज दाखवण्या जागी तुम्हाला internal server error दाखवला जातो .
3. Memory exhausted error
तुम्हाला तर माहितीच असेल की वेब सर्वर हे सुद्धा एक प्रकारे संगणक सारखे असते त्या मुळे ह्याला सुद्धा मेमोरी ची गरज लागते . आणि जेव्हा अधिक मेमोरी ची गरज भासते तेव्हा हा error दाखवण्यात येतो .
4. White Screen Of Death
तसं सांगायला गेल तर White Screen Of Death हा एक सामान्य error आहे . आणि फक्त तुम्ही नाही तर हा error खूप जुन्या ब्लॉगर ला सुद्धा येत असतो . हा error येण्याचे कारण म्हणजे php च्या code मध्ये काही प्रॉब्लेम किंवा memory लिमिट मुळे सुद्धा हा error येत असतो . आणि हा error येण्या मागे एक दुसरे सुद्धा कारण असू शकते ते म्हणजे प्लगइन किंवा थीम मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर .
5. Destination folder already Exists error
हा error येण्याच मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही प्लगइन किंवा थीम इंस्टॉल करत असता परंतु तुम्ही जी थीम किंवा प्लगइन इंस्टॉल करत आहात त्याची फाइल जर वर्डप्रेस मध्ये अधिक पासूनच असेल तर हा error दाखवण्यात येतो .
6. Folder permission error
चुकीची फाइल किंवा फोल्डर ची अनुमति वर्डप्रेस मध्ये अपलोड करत असताना तुम्हाला ह्या error व्हा सामना करावा लागतो . ह्या error सुद्धा कसा सोडवावा ह्या साठी मी पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करीन .
7. Another update in process error
खरं तर हा error येण्याच मुख्य कारण म्हणजे जर तुम्ही कुठली ही थीम किंवा प्लगइन किंवा कोणते ही वर्डप्रेस मधली फाइल अपडेट करत आहात व ती प्रोसेस चालू आहे परंतु यशस्वी रित्या पूर्ण झाली नाही आहे आणि तेव्हाच जर तुम्ही काही दुसऱ्या गोष्टी अपडेट करायचं प्रयत्न करत असाल तर Another update in process हा error दाखवण्यात येतो . आणि हा error स्वतहून निघून सुद्धा जातो
8. Briefly Unavailable for Scheduled maintenance error
हा एरर तेव्हा दाखवला जातो जेव्हा तुम्ही वर्डप्रेस च्या core फाइल , थीम किंवा प्लगइन अपडेट करत असता . परंतु टेंशन घेण्याच कारण नाही कारण हा एरर जेव्हा तुमच्या अपडेट करत असलेल्या फाइल , थीम आणि प्लगइन ह्या यशस्वी अपडेट होतात तेव्हा हा error निघून जातो .
9. 502 bad gateway error
बहुतेक वेळा हा error स्वताहूनच निघून जातो . परंतु जर हा error जात नसेल तर त्या साठी मी एक पोस्ट बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन .
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण वर्डप्रेस हे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वापरत असणाऱ्या लोकांना काही errors चा सामना करवा लागतो . परंतु ते error का येत आहेत किंवा त्या error चा अर्थ काय हे समजत नाही . म्हणू ह्या पोस्ट मध्ये आपण असेच 9 वर्डप्रेस error ची म्हणजेच wordpress errors in marathi बद्दल माहिती घेतली . तुम्हाला ह्या पोस्ट किंवा वेबसाइट बद्दल काही ही शंका असेल तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……..