SEO म्हणजे काय ? व SEO चे प्रकार

  SEO म्हणजे काय ? म्हणेजच What Is SEO In Marathi किंवा SEO Meaning In Marathi व ब्लॉगसाठी SEO का गरजेचे आहे ? हे  एक नवीन ब्लॉगरला नेहमीच जाणून घ्यायचे असते.  आजच्या डिजिटल युगात लोकांच्या समोर आपल्याला जर आपली ओळख निर्माण करायची असेल . तर ऑनलाईन हा एकमेव मार्ग आहे जिथे तुम्ही करोडो – लाखो लोकांच्या समोर आपली ओळख निर्माण करू शकता . आपण येथे आपल्या कलेच्या आधाराने किंवा मदतीने आपली ओळख निर्माण करु शकतो . मग ती व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा कन्टेन्ट च्या माध्यमाने पण हे सगळं करण्याअगोदर सर्च इंजिन च्या पहिल्या पेजमध्ये तुमची जागा बनवणे खूप गरजेचे आहे कारण तुमचे वाचत असतील किंवा तुम्हाला बघणारे लोक.  त्यांना सर्च इंजिन च्या पहिल्या पेज वरच राहणे पसंद असते व त्यावर ते विश्वास सुद्धा ठेवतात. 

What Is SEO In Marathi ? | SEO Meaning In Marathi

परंतु सर्च इंजिन च्या पहिल्या पेजवर येणे हे काही साधे काम नाही . त्यासाठी तुम्हाला तुमचा कंटेंट किंवा तुमचे आर्टिकल SEO फ्रेंडली करणे गरजेचे आहे. .  म्हणजेच तुम्हाला तुमची वेबसाईट बदल करणे गरजेचे आहे. ज्यांनी तुमची वेबसाइट सर्च इंजिनमध्ये रँक होईल आणि याच प्रक्रियेला SEO असे म्हटले जाते . तर आपण आज SEO म्हणजे काय व ते कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  असं म्हणायला गेलं तर ब्लॉगिंग व SEO ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  याचे कारण असे की तुम्ही कितीही छान कन्टेन्ट बनवला व त्याला जर SEO ची साथ नसेल तर ते कधीच सर्च इंजिनमध्ये रँक होणार नाही. रँक होणार नाही म्हणजेच तुम्हाला ट्रॅफिक येणार नाही . 

मग जर तुमच्या कन्टेन्ट वर वाचक येणार नसेल तर तर तुम्ही जी मेहनत घेत आहात त्याला काहीच अर्थ नाही . जर तुम्ही ब्लॉगिंगला सिरियसली घेत आहात तर तुम्हाला SEO शिकणे गरजेचे आहे व हे SEO तुम्हाला पुढे जाऊन खूप मदत करणार आहे.  तसं सांगायला गेलं तर SEO चे  काही नियम नाही आहेत हे पूर्णपणे गुगलच्या अल्गोरिदम  वर अवलंबून  आहेत . व ते दिवसेंदिवस बदलत राहणार आहे .  त्यामुळे SEO सोबत तुम्हाला सुद्धा अपडेट राहण्याची गरज आहे . व तुम्ही SEO बद्दल जेवढे शिकाल तेवढे कमीच आहे . कारण यामध्ये रोज एक नवीन  नियम बदलत असतो त्यामुळे हा असा विषय आहे जो कधीच संपणार नाही व वेळेनुसार तो स्वतः मध्ये खूप बदल करेल. 

SEO म्हणजे काय ? | What Is SEO In Marathi ? | त्याचे प्रकार कोणते ? 

ह्या पोस्ट मध्ये आज आपण SEO म्हणजे काय म्हणेजच What Is SEO In Marathi किंवा SEO Meaning In Marathi व ते कसे करावे किंवा त्याचे कोणते प्रकार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत . आपण मागील पोस्ट मध्ये कीवर्ड रिसर्च म्हणजे काय ? याबद्दल जाणून घेतले . जर तुम्ही ती पोस्ट वाचली नसेल तर नक्की वाचा . मराठी जीवन ह्या साईट वर तुम्हाला ब्लॉगींग बद्दल सर्व गोष्टी सविस्तरपणे आपल्या मराठी भाषेत शिकायला मिळतील.  त्यामुळे आपल्या वेबसाईटवरील नवीन पोस्ट वाचायला विसरू नका . तर चला सुरू करूया….. 

SEO म्हणजे काय ? | what is SEO in marathi

SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हि एक अशी टेक्निक आहे ज्याच्या मदतीने आपण आपली वेबसाईट किंवा ब्लॉग सर्च इंजिनमध्ये रँक करू शकतो . सर्च इंजिन काय आहे ? हे आपणा सर्वांनाच माहिती आहे.  गुगल हा जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे व या सारखे अनेक सर्च इंजिन आहेत जसे की बिंग , याहू . परंतु गूगल या मधील प्रसिद्ध असे सर्च इंजिन म्हणून ओळखले जाते . SEO मदतीने आपण आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगला कुठल्याही सर्च इंजिनमध्ये रँक करू शकतो . समजा आपण गूगल मध्ये जाउन काही सर्च केले व त्या संबंधित कन्टेन्ट आपल्याला रिझल्ट मध्ये दिसतो तर हा सर्व रिझल्ट अनेक वेगवेगळ्या ब्लॉगमधून आपल्यासमोर दाखवला जातो .

What Is SEO In Marathi ? | SEO Meaning In Marathi

 ह्या मध्ये जो सर्वात पहिला रिझल्ट आपल्याला दिसतो . तो गुगल या सर्च इंजिनमध्ये पहिल्या नंबर वर रँक करत असतो व त्याने पहिल्या नंबरवर रँक करण्याचे कारण म्हणजे त्या वेबसाईट चा SEO हा पूर्ण पणे केला गेला आहे .  त्यामुळेच तो ब्लॉग त्या कीवर्ड वर रँक करत आहे . आपल्याला गुगलमध्ये किंवा कोणत्याही सर्च इंजिनमध्ये रँक करण्यास SEO मदत करते . जर आपली वेबसाइट सर्च इंजिन चा रिझल्ट मध्ये पहिल्या नंबरवर किंवा पहिल्या पेजवर असेल तर वाचक सुद्धा आपल्याच वेबसाइटला भेट देण्यास पसंती देतात . व त्यामुळे दिवसेंदिवस आपली ऑरगॅनिक ट्राफिक सुद्धा वाढत जाते. 

SEO ब्लॉगसाठी का गरजेचा आहे ? | Importance of SEO for blog in marathi

आत्ताच आपण जाणून घेतले की SEO म्हणजे काय ? तर चला जाणून घेऊ या की ब्लॉगसाठी SEO करणे का गरजेचे आहे ? आपली वेबसाईट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण SEO टेक्निकचा वापर करतो . समजा मी एक वेबसाईट बनवली . त्यामध्ये खूप चांगला कन्टेन्ट म्हणजेच हाय क्वालिटी कन्टेन्ट सुद्धा लिहला .  परंतु जर मी त्या पोस्ट किंवा वेबसाईटची SEO नाही केला तर माझी वेबसाईट कधीच लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. 

 जर मी माझ्या पोस्टचा SEO नाही केला व माझ्या वाचकाने समजा कोणताही किवर्ड सर्च  केला व मी त्या किवर्ड बद्दल लिहून सुद्धा SEO न केल्याने मी त्या पोस्टवर म्हणजे कीवर्ड वर रँक  होणार नाही . जर तुमच्या पोस्टचा SEO केला नसेल तर तुम्ही सर्च इंजिन मध्ये रँक होऊ शकत नाही व रँक न  झाल्याने आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक सुद्धा येणार नाही . SEO करणे काही कठीण काम नाही.  एकदा तुम्हाला SEO काय आहे किंवा ते कसे केले जाते हे समजले तर तुम्ही आरामात SEO करू शकता व तुमची वेबसाईट गुगलमध्ये रँक करू शकता. 

SEO चे प्रकार | types of SEO in marathi

What Is SEO In Marathi ? | SEO Meaning In Marathi

SEO हे दोन प्रकारचे असतात एक असतो ऑन पेज SEO व दुसरा असतो ऑफ पेज SEO. ह्या दोन्ही हि वेगळ्या गोष्टी आहेत व ह्यांचे कार्य सुद्धा वेगळी आहेत . तर चला ह्या बद्दल थोडं जाणून घेऊयात ….. 

1. ऑन पेज SEO

ऑन पेज SEO तुमच्या ब्लॉग व  वेबसाईट ला मधून SEO फ्रेंडली करतो . ऑन पेज SEO  मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात जसे कि फोकस कीवर्ड चा पोस्ट मध्ये बरोबर उपयोग करणे , जसे कि टायटल किंवा मेटा डिस्क्रिपशन मध्ये किवर्ड चा वापर , वेबसाईट चा स्पीड ,  टायटल टॅग , पोस्ट ची URL , इंटर्नल लिंकिंग , अल्ट टॅग अश्या खूप साऱ्या गोष्टी व पेज SEO मध्ये येतात . मी ह्या साठी एक वेगळी पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करेन ज्या मध्ये आपल्या पोस्ट व वेबसाईट चा ऑन पेज SEO कसा करावा हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन . 

2. ऑफ पेज SEO

ऑफ पेज SEO म्हणजे बाहेरून आपल्या वेबसाईट ला SEO फ्रेंडली करणे . ह्या मध्ये वेबसाईट चे ऑन पेज SEO  झाल्या नंतर त्या ब्लॉग चे प्रोमोशन करायचे काम ऑफ पेज SEO करते . जसे कि वेबसाईट सर्च इंजिन मध्ये सबमिट करणे , ब्लॉग सोशल मीडिया वर शेयर करणे , पोस्ट व वेबसाईट च्या बॅकलिंक बनवणे अश्या खूप साऱ्या गोष्टी असतात . मी ऑफ पेज SEO साठी वेगळी पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करेन ज्या मध्ये ऑफ पेज SEO कसा करावा हे स्पष्ट पणे सांगेन . 

निष्कर्ष ( conclusion )

हि पोस्ट वाचल्या नंतर SEO म्हणजे काय ? म्हणेजच What Is SEO In Marathi किंवा SEO Meaning In Marathi ब्लॉग साठी SEO करणे का गरजेचे आहे ? SEO चे कोणते प्रकार आहेत म्हणेजच types of SEO in marathi अश्या सर्व शंका  असतील अशी मी आशा करतो . अश्याच  पोस्ट लिहण्याचा मी पुढे हि प्रयत्न करेन. लवकरच भेटू एक नवीन विषयांसोबत . 

तुम्हाला ह्या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल काही हि शंका असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ….. 

Leave a Comment

x