Keyword Research म्हणजे काय ? व त्याचे फायदे

 नमस्कार मित्रांनो तुम्ही ब्लॉगिंग सुरु केली पण ब्लॉगिंग मधील काही अनुभवी लोकांनी तुम्हाला सांगितले असेल की जेव्हा तुम्ही योग्य कीवर्ड वापराल तेव्हाच तुम्हाला ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळेल किंवा तुमची वेबसाईट हि सर्च इंजिन मध्ये रँक करेल किंवा तरच तुम्ही तुमचे ब्लॉगिंग मधील ध्येय पूर्ण करू शकाल . नक्कीच तुम्ही हे कुठेतरी ऐकले असेल की योग्य  कीवर्ड हा तुमच्या ब्लॉगिंग प्रवासामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हे खरे सुद्धा आहे.  

What Is Keyword Research In Marathi

जेव्हा तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर ट्राफिक आणायचे असते किंवा तुम्हाला तुमचा ब्लॉग हा रँक करायचा असतो त्यासाठी  किवर्ड रिसर्च करणे हे खूप महत्त्वाचे आहे. मी सुद्धा काही काळापूर्वी याच परिस्थितीमध्ये होतो . मला सुद्धा किवर्ड रिसर्च म्हणजे काय म्हणजेच what is keyword research in marathi

 हे माहित नव्हते / परंतु ब्लॉगिंग करत असताना व इतरांच्या सल्लामुळे आणि इंटरनेटवरून माहिती घेतल्यानंतर मला किवर्ड रिसर्च कसा करायचा ? किवर्ड चे ब्लॉगिंग क्षेत्रात काय महत्व आहे ? हे समजले . आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला किवर्ड रिसर्च म्हणजे काय ? म्हणजेच what is keyword research in marathi ? किवर्ड चे ब्लॉगिंग क्षेत्रात काय महत्व आहे व योग्य किवर्ड कसा निवडावा हे सांगणारा तर चला सुरु करूया…. 

किवर्ड रिसर्च म्हणजे काय ? | What Is Keyword Research In Marathi

किवर्ड रिसर्च ही एक प्रोसेस आहे ज्यात तुम्ही किवर्डचा शोध घेता व त्यामुळे तुम्हाला तुमची टार्गेट ट्राफिक तुमच्या ब्लॉग पर्यंत कशी येते हे आपण शोधू शकतो किंवा मी तुम्हाला सोप्या भाषेत किवर्ड रिसर्च म्हणजे काय हे  समजावण्याचा प्रयत्न करतो . जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं उत्तर शोधायचे असते तेव्हा आपण गुगलमध्ये त्याबद्दल काही सर्च करतो व गुगल आपल्याला त्या प्रश्नाबद्दल काही ब्लॉग किंवा काही पोस्ट तुमच्यासमोर रिझल्टच्या स्वरूपात दाखवते .

 किवर्ड रिसर्चमध्ये तुम्हाला हे शोधणे सोपे होते की तो शब्द किंवा तो प्रश्न कोणता आहे जे तुमचे युजर गुगल मध्ये सर्च करत आहेत जर तुम्हाला तो शब्द किंवा तो प्रश्न माहित पडला तर तुम्ही त्याबद्दल लिहू शकता व त्या शब्दावर किंवा त्या प्रश्नावर समजा तुम्ही गुगलच्या पहिल्या पेजवर रँक झालात तर त्या प्रश्नाचे उत्तर शोधणारी लोक तुमच्या वेबसाईटवर येतील अशा प्रकारे किवर्ड रिसर्च केल्यानंतर आपल्या ब्लॉगला ऑरगॅनिक ट्रॅफिक येते.  

तांत्रिक भाषेत सांगायचं गेले तर किवर्ड रिसर्च म्हणजे गुगल वर तुमचे युझर जे तुमच्या वेबसाईट च्या विषयाबद्दल प्रश्न किंवा त्यांचे प्रॉब्लेम सर्च करत आहेत ते शोधणे . तसेच कीवर्ड रिसर्च केल्यानंतर तुम्हाला हे ओळखणे सोपे जाते की तुमचे युझर नक्की काय सर्च करत आहेत व त्यानुसार तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये त्या किवर्ड चा  वापर करून त्याबद्दल माहिती लिहू शकता. 

साधे उदाहरण सांगायचं गेलं तर जर मी समजा गुगल वर अशाप्रकारे बेस्ट स्मार्टफोन सर्च करतो तर मला गुगल त्या विषया संबंधित लोकांनी विचारले  प्रश्न रिझल्ट मध्ये दाखवतो. अश्या प्रकारे गुगल सर्च हि आपल्याला मदत करत असते . 

What Is Keyword Research In Marathi

ह्याचा जसा फायदा हा युझर ना होतो तसाच हा ब्लॉग लिहतो त्याला सुद्धा होतो . हे ज्या किवर्ड असतात हे बहुतेक लोकांनी ह्या आधी विचारलेले असतात म्हणून गुगल सुद्धा आपल्याला हेच किवर्ड दाखवतात . जर आपला प्रश्न त्या किवर्ड शी जुळत असेल तर आप त्या वर क्लिक करून तो प्रश्न सर्च करू शकतो . ह्या ह्याच अश्या संबंधित किवर्ड चा फायदा आपल्याला सारख्या ब्लॉगर ना होतो . जर आपण ह्याच प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या ब्लॉग मध्ये दिली तर आपल्या वेबसाईट वॉर ट्रॅफिक येऊ शकते . अश्या प्रकारे किवर्ड रिसर्च आपल्याला मदत करते . 

परंतु किवर्ड रिसर्च हे एवढ्या वरच थांबत नाही तर तुम्ही किवर्ड रिसर्च टूल च्या साहयाने खोल वर अश्या किवर्ड बद्दल अभ्यास करू शकता . ह्या साठी  इंटरनेट वर खूप सारे किवर्ड रिसर्च टूल उपलब्ध आहेत . ह्या मध्ये किवर्ड बद्दल अधिक ची माहिती जसे कि …. 

1. किवर्ड – किवर्ड म्हणजे असा शब्द जो गुगल वरील युझर वारंवार सर्च करतो . 

2. किवर्ड व्हॉल्यूम – ह्या मध्ये तुम्हाला समजते के तुमचा किवर्ड हा महिन्याकाठी किती लोकांनी सर्च केला . त्या नुसार हा डेटा दाखवला जातो . 

3. किवर्ड ट्रेंड – ह्या मध्ये तुम्हाला समजते कि तुमचा किवर्ड हा महिन्याकाठी रोज सर्च केला जातो का किंवा सोप्या शब्दात सांगायचे गेले तर हा किवर्ड ट्रेंडिंग आहे का ? 

4. किवर्ड डिफिकल्टी – ह्या मध्ये तुम्हाला समजते कि ह्या किवर्ड वर तुम्ही सहज रँक करू शकता का ? जर त्या किवर्ड ची डिफिकल्टी जास्त असेल तर खूप लोकांनी त्या किवर्ड बद्दल आधीच आपल्या ब्लॉग मध्ये लिहले आहे असे समजावे . 

अश्या प्रकारची अधिक च्या माहिती तुम्ही अश्या किवर्ड रिसर्च टूल मध्ये जाणून घेऊ शकता . अश्या किवर्ड रिसर्च टूल साठी मी वेगळा ब्लॉग लिहायचा नक्की प्रयत्न करेन. 

किवर्ड रिसर्च केल्याचे फायदे | benefits of keyword research in marathi

What Is Keyword Research In Marathi

ह्या मध्ये बघूया कि किवर्ड रिसर्च कश्याप्रकारे तुमच्या वेबसाईटची किंवा ब्लॉग ची मदत करू शकतो . 

1. किवर्ड रिसर्च केल्याने तुमचा वाचक नक्की गुगल मध्ये काय सर्च करतो हे समजते . 

2. किवर्ड रिसर्च केल्याने तुम्हाला असे प्रश्न सापडतात ज्या संबंधित जास्त लोकांनी काही लिहले नाही आहे परंतु फार लोक अश्या प्रकारचे प्रश्न गुगल वर सर्च करतात . 

3. किवर्ड रिसर्च केल्याने तुमचे स्पर्धक कोण आहेत . किंवा ते कोणत्या विषयांवर लिहत आहे हे सुद्धा समजते . 

4. किवर्ड रिसर्च मध्ये तुम्ही कमी स्पर्धा असलेले किवर्ड शोधू शकता ज्याने तुम्ही त्या किवर्ड वर आरामात रँक होऊ शकता . 

5. किवर्ड रिसर्च केल्याने तुम्हाला त्या किवर्ड ची CPC समजते म्हणजेच जर तुमच्या वेबसाईट वर जाहीरात दिसत असेल तर त्या किवर्ड च्या जाहिरात वर तुम्हाला एका क्लिक मागे किती पैसे मिळणार हे समजते . व ह्यामुळेच तुम्ही जास्त CPC वाले किवर्ड वापरले तर तुम्ही तुमची कमाई सुद्धा वाढवू शकता . 

हे असे भरपूर सारे फायदे किवर्ड रिसर्च केल्याने होतात . परंतु काही लोकांना असे वाटत असते कि किवर्ड हा फक्त जास्त सर्च व्हॉल्युम वाला असले म्हणजे झाले . परंतु हे साफ चुकीचे आहे . कोणते हि अर्धे ज्ञान हे घातक असते . त्यामुळे अशी चूक अजिबात करू नका . त्यामुळे किवर्ड रिसर्च बद्दल आपण ५० % जाणून घेतले जसे कि किवर्ड रिसर्च म्हणजे काय म्हणजेच what is keyword research in marath व किवर्ड रिसर्च केल्याचे फायदे म्हणजेच benefits of keyword research in marathi . त्यामुळे किवर्ड रिसर्च  आपण सगळं जाणून घेतले असे समजू नका . ह्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योग्य किवर्ड रिसर्च कसा करावा ? ह्या साठी मी एक वेगळा ब्लॉग लिहण्याचा प्रयत्न करेन . ज्या मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये किवर्ड रिसर्च कसा करावा ह्या बद्दल सांगण्याचा प्रयत्न करेन . 

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगिंग क्षेत्रातील खूप महत्वाची गोष्ट म्हणजेच किवर्ड रिसर्च म्हणजे काय म्हणजेच what is keyword research in marath हे डिटेल मध्ये बघितले . व किवर्ड रिसर्च केल्याने आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईट ला काय फायदे होऊ शकतात हे सुद्धा बघितले . बहुतेक लोक ब्लॉगिंग यशस्वी न होण्याचे कारण हे किवर्ड रिसर्च न करणे असते . त्यामुळे अश्या लोकांसाठी मी किवर्ड रिसर्च म्हणजे काय हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला . तुम्हाला ह्या पोस्ट बद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……. 

Leave a Comment

x