Google Question Hub म्हणजे काय ? व त्याचे फायदे

 नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आज आपण Google Question Hub म्हणजेच what is google question hub in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तुम्हाला तर माहीतच असेल गुगल हे किती मोठे नेटवर्क आहे . आज पूर्ण जगात गुगल चा वापर केला जातो .  गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे.  आजच्या काळात गुगल ही जगातील सर्वात मोठ्या कंपनी पैकी एक आहे . तर आज आपण गुगलच्या एका प्रॉडक्ट बद्दल म्हणजेच Google Question Hub बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 

what is google question hub in marathi

Google Question Hub म्हणजे काय ? | what is google question hub in marathi

 या पोस्टमध्ये मी तुम्हाला आज Google Question Hub म्हणजे काय ? म्हणजेच what is google question hub in marathi? Google Question Hub कशा प्रकारे काम करते ? Google Question Hub चे फायदे म्हणजेच question hub benefits in marathi. ह्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर ह्या पोस्ट मध्ये आज मी देण्याचा प्रयत्न करेन . जर तुम्हाला Google Question Hub बद्दल काहीच माहिती नसेल . तर तुम्ही एक योग्य ठिकाणी आला आहात . इथे तुम्हाला Google Question Hub बद्दल सर्व माहिती मिळेल. तर चला सुरू करूया ……

Google Question Hub म्हणजे काय ?

Google ने Question Hub नावाचे एक टूल बनवले आहे . ते फक्त पब्लिशर किवा ब्लॉगर यांच्यासाठी आहे . Google Question Hub या टूलच्या मदतीने तुम्ही सहज अशा टॉपिक ची माहिती मिळू शकता . जे इंटरनेटवर लोकांमार्फत सर्च केले जातात . जर तुम्ही एक ब्लॉगर आहात व तुम्ही एक विशिष्ट विषयांवर लिहीत असाल . तर येथे तुम्ही तुमचे त्या विषयाचे नाव सर्च करून . त्याच्या संदर्भात असणारे प्रश्न इथे जाणून घेऊ शकता . त्यामध्ये तुम्हाला तुमच्या विशिष्ट विषयाबद्दल लोक काय सर्च करतात याबद्दल माहिती मिळेल . 

या टुलचे मुख्य उद्दिष्ट हे ब्लॉगर व पब्लिशर ला मदत करण्यासाठी आहे व याचा मुख्य हेतू असा आहे की ब्लॉगर च्या समोर असे प्रश्न आणले जावे की जे युजरला हवे आहेत परंतु त्याच्याबद्दल कोणताच कन्टेन्ट गुगलवर उपलब्ध नाही , जर ब्लॉगरला समजले की लोक काय सर्च करत आहेत किंवा त्यांना कोणत्या विषया बद्दल माहिती हवे आहे तर ते Google Question Hub च्या मदतीने त्या विषयांवर माहिती लिहू शकतील. 

Google Question Hub कशा प्रकारे काम करते ? 

Google Question Hub हे टूल खूप साध्या प्रकारे बनवले गेले आहे व ह्याचा वापर कोणीही सहज करू शकतो . जर तुम्ही एक ब्लॉगर आहात तर या टूलमध्ये तुम्हाला युजर कोणते प्रश्न सर्च इंजिन मध्ये सर्च करत आहेत हे तुम्हाला समजेल व इथे असे प्रश्न दाखवले जातात याबद्दल गुगल वर कंटेंट हा उपलब्ध नाही आहे . उदाहरणार्थ जर कोणी गुगल वर काही सर्च करत असेल .परंतु त्याला त्याबद्दल रिझल्ट मिळत नसेल म्हणजेच कुठल्याच कंटेंट रायटरने त्याबद्दल गुगल वर लिहिले नाही आहे त्यामुळे त्या युजरला त्याचे उत्तर मिळू शकत नाही . 

what is google question hub in marathi

त्यामुळे Google Question Hub च्या माध्यमातून तुम्ही ते प्रश्न जाणून त्यावर लिहू शकता . व तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक आणू शकता . जेव्हा युजरला त्याच्या प्रश्नांची उत्तरं गुगल वर मिळत नाही तेव्हा तो यूजर गुगलला त्या बद्दल फीडबॅक मध्ये त्याचे प्रश्न मांडतो व गुगल तेच प्रश्न Google Question Hub मध्ये दाखवून कंटेंट रायटर ने या प्रश्नांवर लिहावं असे गुगल चे मत असते. 

 Google Question Hub चे फायदे | google question hub benefits in marathi

Google Question Hub चे खूप सारे फायदे आहेत परंतु हे टूल नवीन असल्यामुळे यामध्ये अधिक फीचर उपलब्ध नाही आहेत.  तरीसुद्धा हे टूल कंटेंट क्रियेटर किंवा ब्लॉगरसाठी एक वरदाना पेक्षा कमी नाही आहे . 

  • कोणत्याही कंटेंट रायटरला या टूलच्या मदतीने कन्टेन्टची आयडिया मिळते 
  • यूजर चे प्रश्न सहज सोडवले जातात 
  • तुम्ही ह्याच्यामदतीने  यूजर फ्रेंडली आर्टिकल लिहून तुमची ब्लॉग पोस्ट सहज रॅंक करू शकता 
  • जर तुम्ही इथे असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत असाल तर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर चांगले ऑर्गनिक ट्रॅफिक आणू शकता 
  • तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये हे प्रश्न ऍड करून व त्याची उत्तरे देऊन तुम्ही तुमच्या कन्टेन्टची क्वालिटी वाढवू शकता

Google Question Hub च्या मदतीने ब्लॉग वेबसाईटची ट्रॅफिक कशी वाढवावी ? 

 तुम्ही गुगल Google Question Hub च्या मदतीने ब्लॉग आणि वेबसाईट ची ट्रॅफिक सहज वाढवू शकता . यासाठी तुम्हाला Google Question Hub जॉइन करावे लागेल व  येथे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागतील . त्यासाठी तुम्ही प्रश्नांमध्ये तुमच्या ब्लॉग पोस्ट ची URL सबमिट करून . तुमच्या वेबसाईटवर सहज ट्रॅफिक आणू शकता. URL सबमिट केल्यानंतर जर कोणी तो प्रश्न गुगल मध्ये सर्च करत असेल . तर तिकडे तुमचा ब्लॉग रॅंक होईल व त्यानुसार तुमच्या वेबसाईटवर ऑरगॅनिक ट्रॅफिक येईल. 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आपण Google Question Hub म्हणजे काय म्हणजेच what is google question hub in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला जर ह्या पोस्ट किंवा वेबसाइट बद्दल कोणती ही शंका असेल तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका …..

Leave a Comment

x