जर तुम्ही हे आर्टिकल वाचत असाल तर त्यासाठी तुमचा एक स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट असणे गरजेचे आहे . कारण आज या पोस्टमध्ये आपण ब्लॉगिंग संबंधित एक महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत . त्याचे नाव आहे बाऊन्स रेट म्हणजे काय ? म्हणजेच What Is Bounce Rate In Marathi . या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत बाऊन्स रेट म्हणजे काय व या बाऊन्स रेट मुळे आपण जास्त ट्राफिक कसे प्राप्त करू शकतो व तुमच्या ब्लॉगमधून चांगली कमाई करण्यासाठी बाऊन्स रेट कसे कमी करता येईल या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत . तर चला प्रथम जाणून घेऊया बाऊन्स रेट म्हणजे काय ?
जाणून घ्या बाऊन्स रेट म्हणजे काय ? | What Is Bounce Rate In Marathi
बाउन्स रेट म्हणजे काय ? | What Is Bounce Rate In Marathi
ही कोणत्याही एका ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर येणाऱ्या वाचकांची एक आकडेवारी असते . जे वाचक जेव्हा ते पेज किंवा ब्लॉग सोडून जातात किंवा याला दुसऱ्या शब्दांमध्ये असू द्या म्हणू शकतो की ही अशा लोकांची आकडेवारी आहे की वाचक तुमच्या साईडचे एक पेज हे फक्त केवळ एक वेळ बघतात व इतर पेजवर जातात .
जसे की आपण उदाहरण जाणून घेऊया की आपल्या साइटवर समजा पाऊस रेट हा 70 आहे . तर याचा अर्थ असा की तुमच्या साइटवर भेट देणार्यांची एकूण संख्या ही 70 होती व त्यांनी केवळ फक्त एकच पेज बघितले . तर तुम्हाला समजले असेल कि जेवढा बाउन्स रेट कमी तेवढेच आपल्यासाठी चांगले असते .
जर तुम्ही सर्वात चांगला बाऊन्स रेट चा विचार केला तर तो 10% पेक्षा कमी असतो आणि दहा वर्षांपेक्षा कमी असणारा वेबसाईट ही लाखो वेबसाईट मध्ये फक्त एकच वेबसाईट असू शकते . 90 पेक्षा जास्त बाऊन्स रेट असणारी वेबसाईट म्हणजे लोकांना त्या वेबसाईटमध्ये काडीमात्र इंटरेस्ट नाही आहे व मध्यम बाऊन्स रेट असणाऱ्या वेबसाईटमध्ये 40 ते 80 टक्के वाले लोक येतात .
हे तर समजलेच असेल की बाऊन्स रेट जेवढा कमी तेवढे आपल्यासाठी चांगले असते . तर प्रत्येक एका ब्लॉगरचे हे ध्येय असले पाहिजे की त्याचे बाऊन्स रेट हा कमीत कमी असावा . तर बाऊन्स रेट हा कमी कसा करावा याबद्दल आपण जाणून घेऊया.
बाऊन्स रेट कमी कसा करावा ? | How to reduce bounce rate in marathi
तसे तर तुम्ही गुगल वर सर्च केले की बाऊन्स रेट कमी कसा करावा तर त्यासाठी प्रत्येक वेबसाईट ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगेल . परंतु तुम्ही माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला असे सांगेन की फक्त ब्लॉग ची लांबी वाढवण्यासाठी फालतू गोष्टींना तुमच्या पोस्टमध्ये टाकू नका व ह्यावर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही जर तुमच्या पोस्टमध्ये फालतू गोष्टी लिहीत नसाल तर तुमचा बाऊन्स रेट हा ऑटोमॅटिक कमी होईल . तर चला बाऊन्स रेट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स पाहूया .
1. योग्य वाचकांना टार्गेट करा
तुमच्या वेबसाईटचे ध्येय हे जास्तीत जास्त वाचक हे तुमच्या वेबसाईटवर आणणे हे नसून टार्गेटेड वाचक आणणे हे असावे . तुम्हीच ह्या गोष्टीचा विचार करा की ज्या लोकांना खेळा मध्ये आवड आहे तर ते लोक आरोग्य बद्दल वाचतील का ? म्हणूनच तुमच्या वेबसाईटवर नेहमी योग्य वाचक आणण्याचा प्रयत्न करा व अशा वाचकांना आकर्षक आकर्षित करा की ज्यांना तुमच्या पोस्ट वाचण्याची आवड असेल.
2. साईट ही यूजर फ्रेंडली असावी
कोणताही वाचकाला जर त्याला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही देत नसाल तर तो वाचक तुमच्या वेबसाईटवर कधीच परत येणार नाही . म्हणूनच तुमच्या वेबसाईटचे नेवीगेशन चांगली ठेवा . जाहिरातीचा लोड सुद्धा कमी ठेवा की ज्याने वाचकाला तुमची पोस्ट वाचण्यास प्रॉब्लेम होणार नाही . चांगला फॉन्ट निवडा व फॉन्ट असा निवडा जे वाचण्यास व समजण्यास सोपे असावे . जास्त ब्राईट कलरचा वापर तुमच्या पोस्टमध्ये करू नका . थीम साधी ,नीटनेटकी व सुंदर असावी.
3. पेज चा लोडिंग स्पीड हा कमी ठेवा
पेज चा लोडिंग स्पीड हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे . जर तुम्हाला सर्च इंजिन मध्ये चांगली रँकिंग हवी असेल तर त्यासाठी लोडिंग स्पीड हा कमी असणे आवश्यक आहे . ब्लॉग चा लोडिंग स्पीड कसा वाढवावा ? ह्या साठी तुम्ही आमच्या पोस्ट सुद्धा वाचू शकता.
4. वाचकांना कॉलिटी कन्टेन्ट द्या
तुमच्या वेबसाईट वरील कंटेंट हा तुमच्या यशस्वी होण्या मागचे सर्वात मोठे कारण आहे . जर तुम्ही लोकांना कॉलिटी कंटेंट देत असाल तर तुमचा वाचक तुमच्या साइटवर वारंवार येईल . व त्याला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर तो सर्वप्रथम तुमच्या वेबसाईट वर येउन पाहिल की तुम्ही त्याबद्दल लिहिले आहे की नाही . त्यामुळे जर तुमची साईट ही सर्च इंजिन साठी नाही तर तुमच्या वाचकांसाठी असेल . तर तुम्हाला यशस्वी बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही . कॉलिटी कन्टेन्ट साठी तुम्ही तुमच्या साइटवर नवीन गोष्टींबद्दल पोस्ट लिहू शकता . पोस्टमध्ये इमेजेस व व्हिडिओज चा वापर करू शकता . व पोस्टमधील हेडिंग व सब हेडिंग हे नीटनेटकी असावे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाचकांना कॉलिटी कन्टेन्ट देऊ शकता.
निष्कर्ष ( Conclusion )
या पोस्टमध्ये आपण बाऊन्स रेट म्हणजे काय What Is Bounce Rate In Marathi व बाऊन्स रेट तुमच्या साईट साठी कशाप्रकारे महत्त्वाचा आहे व बाऊन्स रेट कशा प्रकारे कमी केला जाऊ शकतो म्हणजेच How to reduce bounce rate in marathi . याबद्दल आपण या पोस्टमध्ये माहिती घेतली. तुम्हाला ह्या पोस्ट किंवा वेबसाइट बद्दल काही ही शंका असतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका . लवकरच भेटू एक नवीन विषयासोबत …..