ब्लॉगिंग क्षेत्रात किंवा SEO क्षेत्रात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे बॅकलिंक म्हणजेच backlink . असे खूप ब्लॉगर आहेत ज्यांनी आताच ब्लॉगिंग सुरु केली आहे . त्यामुळे बॅकलिंक हि संज्ञा समजायला त्याना थोडा वेळ लागू शकतो . ह्या पोस्ट मी आज तुम्हाला बॅकलिंक म्हणजे काय म्हणजेच Backlink kya hai in marathi , बॅकलिंक चे प्रकार म्हणजेच types of backllink in marathi, व बॅकलिंक चे ब्लॉगिंग क्षेत्रातले फायदे म्हणजेच advantages of backlink in marathi सांगणार आहे . हि पोस्ट वाचल्या नंतर मला आशा आहे कि तुम्हाला बॅकलिंक म्हणजेच what is backlink in mrathi बद्दल कोणतीच शंका राहणार नाही . तर चला मग सुरु करूया …..
बॅकलींक म्हणजे काय ? | what is backlink in marathi
बँकलिंग म्हणजे एक असा दुवा म्हणजेच link आहे जो दोन वेबसाईटला एकमेकांमध्ये जोडतो. त्यामुळे गूगल सारखे सर्च इंजिन हे बॅक लिंकला रँकिंग फॅक्टर म्हणजेच ranking factor म्हणून ओळखतो . जसे की कोणती हि वेबसाईट दुसऱ्या वेबसाईटची लिंक त्याच्या ब्लॉक किंवा पोस्ट मध्ये देते तेव्हा सर्च इंजिनला असे वाटते की हा कंटेंट चांगला असावा . जेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटी च्या बॅकलींकस बनवता तेव्हा तुमच्या पोस्टची रँकिंग सुद्धा वाढते.
बॅकलिंक कश्याप्रकारे काम करते ? | How Do Backlinks Work?
बॅकलिंक हा तुमच्या वेबसाईट च्या वाढीत आणि सर्च इंजिन म्हणजेच search engine मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो . त्या वेबसाईट बॅकलिंक च्या माध्यमातून ट्रॅफिक दुसऱ्या वेबसाईट वर वळवू शकतो . जसे समझा मी ब्लॉगिंग ह्या विषयाबद्दल खूप चांगल्या पोस्ट लिहतो व अश्याच खूप साऱ्या ब्लॉगिंग रिलेटेड वेबसाईट ने जर मला बॅकलिंक दिल्या तर माझ्या वेबसाईट ऑथॉरिटी म्हणजेच authority वाढेल व ऑथॉरिटी वाढेल त्यामुळे माझ्या वेबसाईट ची रँकिंग सुद्धा वाढेल , रँकिंग वाढेल त्यामुळे मला इतर वेबसाईट वरून ट्रॅफिक तर येईलच पण माझी रँकिंग वाढल्यामुळे मला ऑरगॅनिक ट्रॅफिक म्हणजेच organic traffic सुद्धा येईल . अश्याप्रकारे बॅकलिंक तुमच्या वेबसाईट च्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावतो .
बॅकलिंक चे प्रकार | types of backlink in marathi
बॅकलिंक चे दोन प्रकार आहेत . एक प्रकार हा दुसऱ्या प्रकार पेक्षा महत्वाचा आहे . तर चला त्या बद्दल जाणून घेऊया .
Do Follow बॅकलिंक – ह्या अश्याप्रकाराच्या बॅकलिंक आहेत ज्या सगळयांना हव्या असतात . कारण मुळे ह्या बॅकलिंक तुमच्या वेबसाईट चे महत्व वाढवते . त्यामुळे ह्या बॅकलिंक मुळे तुमची सर्च इंजिन मध्ये रँकिंग सुद्धा वाढते . परंतु सगळ्याच dofollow बॅकलिंक ह्या चांगल्या नसतात . त्यामुळे dofollow बॅकलिंक ह्या जास्त नसावा पण जेवढ्या असतील तेवढ्या तरी चांगल्या वेबसाईट ने दिलेल्या असाव्या . जर तुम्हाला dofollow बॅकलिंक ह्या खराब वेबसाईट वरून मिळाल्या आणि हे जर गुगल च्या लक्षात आले तर गूगल तुमची वेबसाईट कायमची बंद सुद्धा करू शकते . त्यामुळे dofolllow बॅकलिंक ह्या quantity मध्ये नाही तर quality मध्ये बनवा .
Nofollow बॅकलिंक – Nofollow बॅकलिंक मध्ये असणारा Nofollow टॅग हा सर्च इंजिन लिंक ला दुर्लक्ष करा असा सिग्नल देतो . त्यामुळे ह्या Nofollow बॅकलिंक चा आपल्याला रँकिंग मध्ये काहीच फायदा होत नाही . जर कोणी आपली Nofollow बॅकलिंक त्याच्या वेबसाईट वर बनवली तर तिथून आपल्याला ट्रॅफिक तर येऊ शकते पण ह्या बॅकलिंक मुळे आपल्या वेबसाईट ची ऑथॉरिटी वाढणार नाही . त्यामुळे ह्या बॅकलिंक चा ट्रॅफिक व्यक्तिरिक्त आपल्याला काहीच फायदा नाही.
बॅकलिंक संबंधित काही संज्ञा | terms related backlink in marathi
लिंकिंग रूट डोमेन – linking root domain म्हणजे किती विशिष्ट डोमेन द्वारे तुमच्या वेबसाईट च्या बॅकलिंक बनवल्या गेल्या आहेत . जर कोणी एकाच वेबसाईट वर तुमच्या अनेक बॅकलिंक बनवत असेल तर लिंकिंग रूट डोमेन मध्ये ते फक्त एक वेळा मोजली जाईल .
high क्वालिटी बॅकलिंक – जेव्हा आपल्या वेबसाईट ची बॅकलिंक हि कोणती हि जास्त ऑथॉरिटी वाली वेबसाईट बनवते तेव्हा त्या बॅकलिंक ला high quality backlink असे म्हणतात .
low क्वालिटी बॅकलिंक – low quality backlink म्हणजे अश्या बॅकलिंक ज्या वाईट किंवा स्पॅम वेबसाईट वर बनवल्या गेल्या आहेत .
Internal लिंक – जेव्हा आपण आपल्या पोस्ट मध्ये आपल्याच वेबसाईट च्या इतर पोस्ट च्या लिंक टाकतो तेव्हा त्या लिंक ला internal link असेल म्हणतात .
लिंक ज्युस – जेव्हा कोणी आपल्या होम पेज ची बॅकलिंक बनवतो आणि आपण त्या बॅकलिंक चा ज्यूस आपल्या पोस्ट च्या रँकिंग साठी वापरतो त्याला link juice असे म्हणतात .
बॅकलींक चे फायदे | advantage of backlink in marathi
बॅकलींक चे फायदे जाणून घेण्याअगोदर आपण बॅकलींक बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करूया. जर बॅकलींक या चांगल्या वेबसाईटवर म्हणजे अश्या वेबसाइट ची ऑथॉरिटी चांगली आहे अशा वेबसाईटवर बनवल्या असतील तरच आपल्याला SEO रँकिंग मध्ये त्या बॅकलींक चा फायदा होतो व आपण ज्या बॅकलिंक बनवले आहेत त्या आपल्या ब्लॉगच्या टॉपिक विषयी असतील तरच त्या बॅकलिंक चा फायदा आहे तर चला मग जाणून घेऊयात बॅकलिंक चे फायदे..
१. वेबसाईट ची ऑरगॅनिक रँकिंग सुधारते
बॅकलिंक तुम्हाला सर्च इंजिन मध्ये रँक करण्यास मदत करतो . जर तुमच्या कडे काही प्रीमियम टूल असतील तर त्यात तुम्हाला समझेल कि ज्या वेबसाईट टॉप १० मध्ये रँक करत आहेत त्याच्या खूप साऱ्या बॅकलिंक आहेत . त्यामुळे तर तुम्हाला इतरांकडून जर बॅकलिंक भेटल्या तर तुमच्या पोस्ट ची रँकिंग नक्कीच सुधारू शकते . त्यामुळे प्रत्येक पोस्ट साठी वेगळी बॅकलिंक बनवायचा प्रयत्न करा .
२. पोस्ट लवकर इंडेक्स होतात
सर्च इंजिन चे जे बॉट आहेत बॅकलिंक च्या साहयाने नव्या वेबसाईट शोधायचा प्रयत्न करतात . त्यामुळे जर त्याच्या बॉट ला तुमच्या वेबसाईट ची लिंक इतर वेबसाईट मध्ये मिळाली तरच ते लवकर तुमची वेबसाईट इंडेक्स करू शकतील . त्या मुळे बॉट साठी अश्या वेबसाईट इंडेक्स करणे कठीण जाते ज्यांच्या काहीच बॅकलिंक नाही आहेत . त्या मुळे जर तुमची नवीन वेबसाईट आहे आणि तुम्हाला इंडेक्स करण्यात प्रॉब्लेम येत आहे तर त्या वेबसाईट ने बॅकलिंक बनवण्यावर जास्त भर द्यावा .
३. रेफरल ट्रॅफिक
ह्या बॅकलिंक चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ह्या बॅकलिंक तुम्हाला referral traffic मिळवून देतात. त्यामुळे जर कोणी तुमची बॅकलिंक बनवत असेल तर त्या बॅकलिंक च्या साहयाने इतर वेबसाईट चे ट्रॅफिक तुम्हाला मिळू शकते .
बॅकलिंक कश्या मिळवाव्या | How to get backlinks in marathi
तुमच्या वेबसाईट साठी बॅकलिंक बनवण्यासाठी नक्कीच वेळ आणि मेहनत लागू शकते . मी तुम्हाला थोडक्यात इथे काही मार्ग सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या वेबसाईट साठी बॅकलिंक बनवू शकता .
१. तुम्ही तुमच्या वेबसाईट च्या नावाने सोशिअल मीडिया अकाउंट बनवून तेथे बॅकलिंक बनवू शकता .
२. तुम्ही इतर वेबसाईट साठी गेस्ट पोस्ट guest post म्हणजेच लिहून त्याच्या कडे बॅकलिंक ची मागणी करू शकता .
३. तुम्ही तुमच्या विषयाशी निगडित असणाऱ्या वेबसाईट कडे बॅकलिंक ची मागणी करू शकता .
४. तुम्ही इतर वेबसाईट च्या पोस्ट वर कंमेंट करून तिथे आपली लिंक टाकून सुद्धा बॅकलिंक बनवू शकता .
हे बॅकलिंक बनवण्याचे काही मार्ग मी तुम्हाला थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला बॅकलिंक कश्या बनवाव्या ह्या साठी सविस्तर पोस्ट हवी असेल तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . त्यासाठी मी सविस्तर पोस्ट लिहण्याचा प्रयत्न नक्की करेन .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट आपण बॅकलिंक म्हणजेच Backlink kya hai in marathi बद्दल सविस्तर जाणून घेतले ज्या मध्ये आपण बॅकलिंक म्हणजे काय म्हणजेच what is backlink in marathi , बॅकलिंक चे प्रकार म्हणजेच types of backlink in marathi , बॅकलिंक चे फायदे म्हणजेच advantages of backlink in mrathi व बॅकलिंक निगडित काही संज्ञा आणि बॅकलिंक कश्या बनवाव्या म्हणजेच how to get backlinks in marathi ह्या बद्दल थोडक्यात जाणून घेतले . तर तुम्हाला ह्या वेबसाईट किंवा ह्या पोस्ट बद्दल काही हि प्रश्न असतील तर निसंकोच कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांना नक्कीच शेयर करा . आम्ही पुढे हि ब्लॉगिंग विषयी अश्या पोस्ट लिह्ण्याच प्रयत्न करू .