Blog चे प्रमुख प्रकार

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉग चे प्रकार म्हणजेच types of blog in marathi व त्याची माहिती जाणून घेणार आहोत . ब्लॉग ऑनलाईन माहिती लोकां पर्यन्त पोहचवण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. ऑनलाईन वाचक हे कोणत्या ही प्रकारची माहिती ब्लॉग च्या साहयाने जाणून घेऊ शकतात .
 ब्लॉग हे अनेक प्रकारचे म्हणजेच types of blog in marathi असतात. व ब्लॉगर अश्या ब्लॉग वर वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट पब्लिश करत असतो. जर तुम्ही नविन ब्लॉगर असाल किंवा तुम्हाला ब्लॉगिंग सुरू करायची असेल तर तुमच्या साठी ह्या मधील कोणता ब्लॉग हा तुमच्या साठी योग्य आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. तर चला मित्रांनो जाणून घेऊया ब्लॉग चे प्रकार म्हणजेच types of blog in marathi …….

ब्लॉग चे प्रकार | Types Of Blog In Marathi

मित्रांनो तुम्ही ब्लॉगिंग करून महिन्याचे लाखो पैसे कमावू शकतात. ऑनलाईन ब्लॉगिंग तुम्ही चांगली कमाई करू शकता. बहुतेक ब्लॉगर हे ब्लॉगवर जाहिरात लावून किंवा affiliate मार्केटिंग करून चांगले पैसे कमवत आहेत. परंतु आताच्या काळात ब्लॉगिंग मध्ये जलद यशस्वी होणे थोडे कठीणच आहे. कारण आताच्या काळात बहुतेक लोक हे स्वतःचे ब्लॉग सुरू करत आहेत.
 त्यामुळे पहिल्या पेक्षा आता स्पर्धा थोडी जास्त आहे. त्यामुळे जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या कडे संयम असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्या ही विषयाची माहीती ही ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यामुळे योग्य टॉपिक निवडणे आताच्या काळात गरजेचे आहे. तर तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. 
तसे सांगायला गेले तर ब्लॉग चे प्रकार हे व्यक्ती , विषय आणि उद्देश च्या हिशोबाने भरपूर आहेत. पंरतु इथे आपण प्रमुख ब्लॉग चे प्रकार म्हणजेच types of blog in marathi व त्याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत . 

1. पर्सनल ब्लॉग 

 पर्सनल ब्लॉग  हे स्वतःच्या आवडीनुसार बनवले जातात . तसं सांगायला गेले तर पर्सनल ब्लॉग मध्ये तुम्ही स्वतःच्या मनातले विचार प्रकट करू शकता.  पर्सनल ब्लॉगवर कंटेंट रायटर हा एकच असतो.  इंटरनेटवर पर्सनल ब्लॉगची संख्या भरपूर आहे.  
व पर्सनल ब्लॉग हे वेगवेगळ्या भाषेमध्ये जसे की इंग्लिश, हिंदी ,मराठी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहेत .पर्सनल ब्लॉग हे एक विशिष्ट माणूस सांभाळत असतो.पर्सनल ब्लॉग लिहिणारे बहुतांश ब्लॉगर यांची ब्लॉग मधून  पैशाची अपेक्षा नसते . ते फक्त त्यांचे मनातले विचार लोकांपर्यंत पोचण्यासाठी व मांडण्यासाठी त्यांचे ब्लॉग लिहीत असतात. 

2. ग्रुप ब्लॉग

 ग्रुप ब्लॉग मध्ये पोस्ट या एकापेक्षा अनेक रायटर पब्लिश करत असतात.  असे ब्लॉग हे मनोरंजन किंवा राजकारण या विषयांवर आधारित असतात.  अशा ब्लॉग वर एक पेक्षा अनेक विषयांवर पोस्ट लिहिल्या जातात . परंतु आजच्या काळात पर्सनल ब्लॉगवर सुद्धा एक पेक्षा अनेक विषयांवर सुद्धा लिहिले जाते.  असे केल्याने तुम्ही तुमच्या ब्लॉगवर अधिकचे विजिटर आणू शकता . 
ग्रुप ब्लॉग मध्ये तुम्ही अनेक विषयांवर लिहू शकता जसे की राजकारण, आरोग्य, टेक्नॉलॉजी किंवा असे अनेक विषय . अशा अनेक विषयांवर लिहिल्यामुळे तुम्ही लवकर यशस्वी होऊ शकता.  त्यामुळे आजच्या काळात इंटरनेटवर ग्रुप ब्लॉग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. 

3. कॉर्पोरेट ब्लॉग

 कॉर्पोरेट ब्लॉग हा विशेष करून एखाद्या कंपनीसाठी बनवला जातो . कंपनीच्या वाढीसाठी किंवा त्यांचे सेल वाढवण्यासाठी कॉर्पोरेट ब्लॉगची निर्मिती केली जाते.  या ब्लॉगचा मुख्य उद्देश हा त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत ऑनलाईन पोचवणे हा असतो . या ब्लॉगच्या माध्यमातून ते त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत प्रमोट करून त्यांची सेल वाढवतात. 

4. नीचे ब्लॉग

 नीचे ब्लॉग हे मुख्यतः एकच विषयांवर बनवले जातात.  अशा प्रकारच्या ब्लॉग मध्ये एकच विषयांवर लिखाण केले जाते . कोणत्याही विषयाची संपूर्ण माहिती म्हणजेच नीचे ब्लॉग होय . निचे ब्लॉग चे उदाहरण पुढील प्रमाणे….. मनोरंजन ब्लॉग , मूवी ब्लॉग,फूड ब्लॉग,आरोग्य ब्लॉग, शैक्षणिक ब्लॉग, टेक्नॉलॉजी ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग,खेळ ब्लॉग, फॅशन ब्लॉग इत्यादी .

5. एफिलिऐट ब्लॉग

Types Of Blog In Marathi
 अशाप्रकारच्या ब्लॉगवर प्रॉडक्ट चे मार्केटिंग केले जाते . या ब्लॉगच्या पोस्टमध्ये कोणत्याही प्रॉडक्ट बद्दल माहिती देऊन त्याच्या खरेदीसाठी लिंक दिली जाते . त्यावरून जर वाचकाने खरेदी केली तर ब्लॉगच्या मालकाला त्याचे कमिशन मिळते . अशा प्रकारचे  एफिलिऐट ब्लॉग हे इंटरनेटवर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत व खूप सारे ब्लॉगर अशा एफिलिऐट ब्लॉगमधून लाखो रुपये कमवत आहेत. 

6. मायक्रो ब्लॉग 

 अशा प्रकारच्या ब्लॉग मध्ये छोट्या छोट्या ब्लॉग पोस्ट लिहून त्या पब्लिश केल्या जातात . ज्या वेबसाईटवर मायक्रो ब्लॉग लिहिले जातात त्याला मायक्रोब्लॉगिंग ब्लॉग म्हटले जाते.  सोशल मीडिया वर पब्लिश केल्या गेलेल्या पोस्टलासुद्धा मायक्रो ब्लॉक म्हटले जाते. 

7. इव्हेंट ब्लॉग 

 इव्हेंट ब्लॉग वर विविध प्रकारच्या सणा नुसार त्या संबंधित ब्लॉग पोस्ट पब्लिश केले जातात.  इव्हेंट ब्लॉगींग ही विशिष्ट प्रकारच्या सणासाठी बनवल्या जातात जसे की होळी, दिवाळी ,क्रिसमस इत्यादी. 

निष्कर्ष 

 ह्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगचे  प्रकार म्हणजेच types of blog in marathi व त्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली.  जर तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाइट बद्दल कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. 

Leave a Comment

x