आता फक्त आधार नंबर असला, तरी पैसे पाठवता येणार वाचा ही सोपी पद्धत…

देशात कित्येक जण असतील ज्यांच्याकडे अजूनही स्मार्टफोन नाहीत आणि याचा परिणाम असा की, डिजिटल पेमेंट चा पर्याय उपलब्ध नाही. म्हणून यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) अ‍ॅड्रेस नाहीत, त्यामुळे अशा लोकांना ऑनलाईन पेमेंट करता येत नाही. आता लोकांचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी युआयडीएआयने (UIDAI) भीम (भारत इंटरफेस फॉर मनी-BHIM) युजर्सना स्मार्टफोन किंवा युपीआय अ‍ॅड्रेस नसलेल्या व्यक्तींना आधार कार्डवरील नंबरचा म्हणजेच आधार नंबर ( transfer money using aadhar card ) वापरून आता पैसे पाठवण्याची सुविधा दिली आहे.

युआयडीएआयने दिलेल्या माहीतीनुसार, UIDAI च्या या सुविधेमुळे डिजिटल व्यवहार करणे अधिक सोपं होणार असल्याचं सांगण्यात येतंय. कारण अजूनही अनेक लोक डिजिटल झालेला नाहीत. Aadhaar Pay: BHIM चा वापर करणारे वापरकर्ते आधार कार्ड नंबरचा वापर करून त्या लोकांना पैसे ( transfer money using aadhar card ) पाठवू शकतात ज्यांच्याकडे फोन किंवा युपीआय अ‍ॅड्रेस नाही, अशी माहिती UIDAI ने दिली आहे.

तुम्हाला माहित असेल कि भीम एक युपीआय आधारित पेमेंट इंटरफेस आहे. या सिस्टमवरून पैसे पाठवताना तुम्हाला मोबाईल नंबर, युपीआय अ‍ॅड्रेस किंवा बँक डिटेल्स आवश्यक असतात. UIDAIच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार, BHIM App मध्ये लाभार्थ्यांच्या आधार नंबरचा वापर पैसे पाठविण्यासंबंधीचा युपीआय अ‍ॅड्रेस सारखा येणार आहे.

भीम अ‍ॅवरून आधार नंबरचा वापर करून पैसे कसे पाठवावेत? (How To Send Money Using Aadhaar Number In BHIM?):

1) सर्वात आधी प्ले-स्टोअर वरून BHIM APP डाऊनलोड करा. किंवा ते तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp या लिंकवर क्लिक करूनही डाऊनलोड करू शकता.

2) भीम अ‍ॅपमधून आधार क्रमांक वापरून पैसे पाठवण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी, लाभार्थीचा 12 अंकी यूनिक आधार क्रमांक प्रविष्ट करून टाकून पडताळणी (Verify) करावी लागेल.

3) त्यानंतर, प्रणाली आधार लिंकिंग व्हेरिफाय करेल आणि पैसे पाठवण्यासाठी लाभार्थीचा पत्ता डिस्प्ले करेल, असे युआयडीएआयने सांगितले आहे.

पाठवलेले पैसे कुठे येणार?

 लाभार्थ्याने डीबीटी/आधार आधारित क्रेडिट मिळवण्यासाठी निवडलेल्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होतील.
 आधार पे पीओएसचा वापर करणारे व्यापारी डिजिटल पेमेंटसाठी आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करू शकतील.
 फक्त आधार नंबर देऊन त्या नंबरशी लिंक असलेल्या खात्यातून व्यापाऱ्यांना पैसे पाठवता येतील.
 हे व्यवहार पडताळून पाहण्यासाठी फिंगरप्रिंटचा (अंगठ्याचा ठसा) वापर करावा लागणार आहे.
एखाद्या व्यक्तीची एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट असतील आणि सर्व खाती आधारशी जोडलेली असतील, तर सर्व खाती डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

Leave a Comment

x