टाटा पाॅवरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी…..पगार 3 लाखांपर्यंत, जाणून घ्या

TATA Power Recruitment 2021 | टाटाच्या (TATA) एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. टाटा पॉवर कंपनीची सहाय्यक असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टिम लिमिटेड (Tata Power Solar Systems Ltd.) या कंपनीतील पदांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. या भरतीसाठी (TATA Power Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी टाटा पॉवरच्या साइटवर अधिक माहिती मिळवता येऊ शकेल.

पदे –

  • ग्रॅच्युएट इंजिनियर ट्रेनी (Graduate Engineer Trainee)
  • सुपरवायझर (Supervisor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे BE, B.Tech किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे.

वेतन – 2.8 ते 3.2 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार

टाटा पॉवर ईझेड चार्जर्सच्या इकोसिस्टिममध्ये सार्वजनिक चार्जर्स, कॅप्टिव्ह चार्जर्स, बसेस/ताफ्यांसाठी चार्जर्स आणि घरगुती चार्जर्स यांच्या संपूर्ण मूल्य शृंखलेचा समावेश आहे. देशभरातील सर्व महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी 10 हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. टाटा पॉवरचे पहिले चार्जर्स मुंबईमध्ये इन्स्टॉल केले गेले होते.”

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. TATA ग्रुप जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, टाटा (TATA) ने आपल्या ग्राहकांसाठी आणि डीलर्ससाठी ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, एमजी मोटर्स इंडिया लिमिटेड, जग्वार लँड रोव्हर, टीव्हीएस आणि इतर अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय अनेक राज्य परिवहन मंडळांसोबत भागीदारी करण्यात आली आहे, त्यामार्फत ई-बस चार्जिंगच्या सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.

Leave a Comment

x