स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती, 35 हजारापर्यंत पगाराची संधी

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( Swachh Maharashtra Abhiyan Recruitment 2021 ) नागरी या प्रकल्पासाठी शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागण्यात आले आहेत. राज्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 ( Swachh Maharashtra Abhiyan Recruitment 2021 ) साठी सर्व नागरी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शहर समन्वयक पदासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती करण्यात येणार आहे. एकूण 408 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता

शहर समन्वयक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ई., बी.टेक., बी.आर्क, बी. प्लानिंग आणि बी.एस.सी यापैकी कोणतीही पदवी असणं आवश्यक आहे. नागरी स्थानिक स्वराज संस्थेतील कामाचा किमान 6 महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?

उमेदवारांनी https://ccjobs.smmurban.co.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. इतर कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी एकच अर्ज सादर करावा, असं सांगण्यात आलं आहे.

मानधन

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत भरण्यात येणाऱ्या शहर समन्वयक पदासाठी अमृत शहरे व गडचिरोली जिल्ह्यातील शहरांसाठी 35 हजार रुपये मानधन असेल. उर्वरित शहरांमध्ये काम करणाऱ्या शहर समन्वयक उमेदवारासाठी 30 हजार रुपये मानधन देण्यात येईल.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2021 ही निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार त्यांच्या पसंतीचा महसुली विभाग नमूद करु शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाईन पद्धतीनं मुलाखत घेतल्यानंतर केली जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 पूर्ण होईपर्यंत या सेवा सुरु राहणार आहेत. उमेदवारांचं वय 35 वर्षांपेक्षा कमी असावं, अशी अट आहे.

Leave a Comment

x