Samsung मध्ये भारतात नोकरीची उत्तम संधी , 1 हजार पदांसाठी मेगा भरती !

नोकरीची उत्तम संधी – Samsung भारतात ( samsung job vacancy 2021 ) 1 हजार पदांसाठी मेगा भरती करणार. इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी दक्षिण कोरियातील सॅमसंग ही कंपनी पुढील वर्षी भारतात १ हजार इंजिनिअर पदांसाठी मेगा भरती करणार आहे. इंजिनिअर पदासाठी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

हे सर्व इंजिनिअरींगचे उमेदवार आयआयटी आणि इतर प्रमुख इंजिनिअरिंग संस्थांमधून नियुक्त केले जाणार आहे. अशी माहिती कंपनीने जाहीर केली. पुढच्या वर्षी सॅमसंग कंपनी एक हजार पदांसाठी इलेक्टॉनिक, इलेक्ट्रिकल, डेटा मॅनेजमेंट आणि सॉप्टवेअर क्षेत्रातील उमेदवारांची निवड करणार आहे. लवकरचं या भरती संदर्भातील माहिती सॅमसंग ( samsung job vacancy 2021 ) कंपनी जाहीर करेल.

उर्वरित भरती कंपनी बिट्स पिलानी, IIIT (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) आणि NIT (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सारख्या इतर अभियांत्रिकी संस्थांमधून करेल. सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख (मानव संसाधन) समीर वाधवन म्हणाले की, भारतातील संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्र गेल्या काही वर्षांत मोठ्याप्रमाणात वाढ होतेय. यासाठी आम्ही १००० हून अधिक इंजिनिअर्स नियुक्त करण्याचे नियोजन करत आहोत.”

Leave a Comment

x