पीएफ खात्यातून लगेच मिळतील 1 लाख रुपये …… कसे ते वाचा..

कोरोना संकटामुळे अनेकांवर आर्थिक संकटे कोसळली. त्यातही अचानक मोठ्या प्रमाणात दवाखान्याचा खर्च वाढल्याने अनेकांचे कंबरडे मोडले. अनेकांना आपली बचत घरातील रुग्णासाठी खर्च करावी लागली.

आर्थिक तंगीमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, प्रोव्हिडंट फंडातून (pf account money withdrawal) कोणताही कर्मचारी आता घरबसल्या 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकणार आहे..

मोदी सरकारच्या नव्या निर्णयानुसार, भविष्य निर्वाह निधीचा कर्मचारी सदस्य वैद्यकिय कारणांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम अॅडव्हान्स काढू शकतो. त्यासाठीची नेमकी प्रक्रिया काय आहे, याबाबत जाणून घेऊ या..

केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयानुसार, कोणत्याही मेडिकल ईमरजेंन्सीसाठी कर्मचारी पीएफ ( pf account money withdrawal ) मधून 1 लाख रुपयापर्यंत रक्कम काढू शकताे. विशेष म्हणजे, अवघ्या 1 तासांत ‘पीएफ’चे पैसे तुमच्या खात्यात आता जमी केले जाणार आहेत. पीएफ खातेधारकाला त्यासाठी 3 ते 7 दिवस वाट पाहावी लागणार नाही.

रुग्णालयात भरती झाल्यानंतर क्लेमचे पैसे मिळू शकतात. खरे तर ही सुविधा आधीही होती, परंतु नवीन नियमांनुसार आधीप्रमाणे मेडिकल बिल आता देण्याची गरज नसणार आहे.

पीएफ खात्यातून पैसे कसे काढणार..? | pf account money withdrawal

– सर्वप्रथम www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करा.
– वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर उजव्या बाजूला ‘COVID-19’ च्या टॅबवर क्लिक करून आगाऊ दावा ऑनलाईन घेऊ शकता.

– https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface ऑनलाइन सेवा >> क्लेम (फॉर्म -11, 1, 10 सी आणि 10 डी) वर जा
– तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक टाका आणि पडताळणी करा.

– ऑनलाइन दाव्यासाठी ‘पुढे जा’वर क्लिक करा.
– ड्रॉप डाऊनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडा (फॉर्म 31).
– तुमचे कारण निवडा, आवश्यक रक्कम भरा आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता टाका.

– ‘गेट आधार ओटीपी’वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
– आता क्लेम फाइल झालेला असेल. तसेच 1 तासानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.

Leave a Comment

x