हरवलेले पॅनकार्ड या सोप्या पद्धतीने पुन्हा काढता येणार..!

नागरिकांच्या ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड.. त्याचा जोडीला येते पॅनकार्ड.. कोणताही व्यवहार असो, पॅनकार्ड (pan card apply online) जवळ असणे आवश्यक असते. पॅनकार्डमध्ये 10 अंकी ‘अल्‍फा न्‍यूमेरिक’ नंबर असतो, जो आर्थिक व्यवहारांसाठी महत्वपूर्ण समजला जातो.

केंद्र सरकारच्या नियमामुळे आधार कार्ड (Aadhar) व पॅनकार्ड एकमेकांशी लिंक करावे लागते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांच्या प्रक्रियेत सुसुत्रता आली आहे. ग्राहकांकडे पॅनकार्ड नसतं, त्यावेळी केवळ आधार कार्डच्या साहाय्यानेही व्यवहार करता येतो. मात्र, केवायसी (KYC) साठी पॅन कार्ड लागतेच..

अनेकदा पॅन कार्ड गहाळ झाल्यास कोणताही व्यवहार करण्यात नागरिकांना अडचणी येतात. मात्र, अशा वेळी ग्राहक त्याचे पॅनकार्ड लगेच मिळवू शकतात. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फाॅलो कराव्या लागतात.. पॅनकार्ड परत कसं मिळवायचं, त्याद्वारे व्यवहार कसा करायचा, याबाबत जाणून घेऊ या…

असं मिळवा परत पॅनकार्ड..! | pan card apply online
नव्याने पॅन कार्ड काढण्यासाठी इन्कमटॅक्स पोर्टलच्या वेबसाईटवर जा. तेथे ‘इन्स्टंट पॅनकार्ड’ ऑप्‍शनवर क्लिक करा. नंतर ई-पॅन (E-pan) या पर्यायावरील ‘गेट न्यू ई-पॅन’ पर्यायावर क्लिक करा. नंतर आधार नंबर टाका.

स्क्रिनवर खालीलपैकी काही पर्याय उपलब्ध होतील.
– यापूर्वी कधीही पॅनकार्ड मिळालेले नाही.
– चालू मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक केलेला आहे.
– आधार कार्डवर जन्म दाखल्याची सर्व डिटेल्स उपलब्ध आहे.
– पॅनकार्डसाठीची वयोमर्यादा पूर्ण केलेली नाही.

पैकी योग्य त्या पर्यायांवर क्लिक करा. नंतर मोबाईल नंबरवर ‘ओटीपी’ येईल. ओटीपी टाकल्यानंतर 15 अंकी नंबर जनरेट होईल. नंतर नव्या पॅन कार्डची प्रत ई-मेलवर येईल. तेथून नवीन पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता…

Leave a Comment

x