कोणती ही वेबसाइट किंवा ब्लॉग वर सर्च इंजिन वरुण ट्रॅफिक आणायचे असेल तर त्या वेबसाइट व ब्लॉग चा SEO करणे गरजेचे आहे . मागील पोस्ट मध्ये आपण SEO म्हणजे काय ? व त्याचे कोणते प्रकार आहेत ह्या बद्दल जाणून घेतले .
आज आपण On Page SEO म्हणजे काय ? व On Page SEO कसा करावा ? हे सविस्तर जाणून घेणार आहोत . तसे तर SEO चे तीन प्रकार आहेत . जसे की On Page SEO , ऑफ पेज SEO व लोकल SEO . पण आज आपण फक्त On Page SEO म्हणजे काय ? म्हणजेच On Page SEO In Marathi व On Page SEO कसा करावा ? हे जाणून घेणार आहोत . जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर On Page SEO म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे . तर चला सुरू करूया ..
On Page SEO म्हणजे काय ? | On Page SEO In Marathi
On Page SEO एक अशी प्रोसेस आहे ज्याच्या मदतीने आपण आपण आपली पोस्ट सर्च इंजिन मध्ये रॅंक अकरू शकतो . व ह्या मुळे आपल्याला organic ट्रॅफिक येण्यास मदत होईल . जर तुम्हाला मोफत मध्ये organic ट्रॅफिक हवी असेल तर ब्लॉग पोस्ट तुम्हाला अश्या प्रकारे लिहावे लागेल की ती गुगल व तुमचा वाचक ह्या दोघांना ही आवडेल . ह्या मध्ये आपण पोस्ट ची क्वालिटी वाढवतो व उत्तम प्रकारे पोस्ट मध्ये टाकले जातात . ह्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात जसे की टाइटल , हेडलाइन , मेटा डिस्क्रिपशन इत्यादि . त्या बद्दल आपण सविस्तर पुढे जाणून घेणारच आहोत .
2021 मध्ये On Page SEO कसा करावा ? | On Page SEO In Marathi
On Page SEO का गरजेचा आहे ?
जास्तीत जास्त लोक त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ही सर्च इंजिन वरच शोधतात . जर तुमचा ब्लॉग हा गुगल मध्ये रॅंक करत नसेल तर तुमचा ब्लॉग हा लोकां पर्यंत कसा पोहचणार ? म्हणूनच तुम्हाला ब्लॉग गुगल वर कसा रॅंक करेल ह्या साठी तयारी करावी लागेल . व त्या साठी तुम्हाला SEO शिकणे गरजेचे आहे . On Page SEO मध्ये पूर्ण कंट्रोल हा तुमच्या हातात असतो . तर तुम्ही योग्य प्रकारे On Page SEO करता तर तुम्ही गुगल मध्ये नक्की रॅंक करेल . तर चला बघूया On Page SEO कसा करावा ?
ब्लॉगचा On Page SEO कसा करावा ?
तर चला आता सविस्तर पाहूया की On Page SEO कश्या प्रकारे केला जातो . व त्या साठी काय काय करावे लागेल . तसे तर On Page SEO मध्ये भरपूर गोष्टी येतात . परंतु खाली दिलेले मुद्दे हे फक्त रॅंक करण्यासाठी गरजेचे आहेत ..
1. योग्य मेटा डिस्क्रिप्शन लिहा
तुमच्या पोस्ट साठी मेटा डिस्क्रिप्शनव एक महत्त्वाचा मुद्दा आहे . यामध्ये तुम्हाला तुमच्या फोकस किवर्ड लिहायचे आहेत . व मेटा डिस्क्रिप्शनची लांबी ही 160 शब्दांपेक्षा जास्त नको .तुमची पोस्ट वाचण्या अगोदर वाचक तुमचे मेटा डिस्क्रिप्शन वाचत असतो . त्यामुळे तुमचे मेटा डिस्क्रिप्शन हे आकर्षक असावे.
2. पोस्ट मध्ये heading टॅग चा वापर करा
तुमच्या पोस्ट मध्ये जे मुख्य टाइटल आहे ते H1 असायला हवे . व सब heading हे H2 हवे . अश्याच प्रकारे खालील heading मध्ये H3 , H4 टॅग चा वापर करा. पोस्ट मध्ये 1 पेक्षा जास्त H1 टॅग चा वापर करू नका .
3. किवर्ड frequency वर लक्ष ठेवा
खूप लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की किवर्ड चा वापर पोस्ट मध्ये कीती वेळा करावा . तर ह्याचे उत्तर असे की किवर्ड हा गरज असेल तिथेच लिहावा . उगाच किवर्ड चा भडिमार करू नये .
4. External लिंक चा वापर करा
तुम्ही ज्या विषयावर पोस्ट लिहीत आहात त्याच संबंधित इतर वेबसाइट ची लिंक ही जोडावी . ह्या मुळे तुमच्या रॅंकिंग ला एक वेगळीच बूस्ट मिळते . परंतु लक्षात ठेवा तुम्ही ज्या विषयावर लिहीत आहात तर external लिंक सुद्धा त्या संबंधीतच असावी .
5. Internal लिंकिंग नक्की करा
जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट लिहता तेव्हा त्या मध्ये तुमच्या जुन्या पोस्ट ची लिंक जोडायला विसरू नका . कारण जर तुमची नवीन पोस्ट रॅंक झाली तर तुमची लिंक केलेली पोस्ट सुद्धा रॅंक होईल . म्हणूनच प्रत्येक पोस्ट मध्ये internal लिंकिंग नक्की करा .
6. URL ही SEO फ्रेंडली ठेवा
आता तुमच्या मनात प्रश्न येईल की URL ला SEO फ्रेंडली कसे बनवावे . तर त्या साठी URL ची लांबी ही कमी ठेवा . व URL मध्ये फोकस किवर्ड चा नक्की वापर करा. URL ला permalink सुद्धा म्हंटले जाते .
7. इमेज चे optimization सुद्धा करा
गुगल हे इमेज पाहू शकत नाही . गुगल इमेज ओळखण्यासाठी alt टॅग ची मदत घेतो . त्यामुळे इमेज चे optimization करण्यासाठी इमेज च्या alt टॅग मध्ये फोकस किवर्ड चा वापर करा . व इमेज पोस्ट मध्ये अॅड करण्याआधी ती compress नक्की करा .
8. पेज स्पीड सुधारा
आता गुगल च्या नुसार तुमच्या वेबसाइट चा स्पीड सुद्धा एक रॅंकिंग फॅक्टर आहे . त्यामुळे तुम्हाला तर गुगल मध्ये रॅंक करायचे असेल तर तुमच्या वेबसाइट चा स्पीड 3 सेकंद पेक्षा जास्त नसावा .
- नक्की वाचा – ब्लॉग चा लोडिंग स्पीड कसा वाढवावा ?
9. कंटेंट हा साधा असावा
कंटेंट हा वाचकाला समजावा अशा योग्य पद्धतीने लिहावा . ज्या टॉपिक वर तुम्ही लिहीत आहात त्या टॉपिकला सोडून इतर कोणत्याही गोष्टीवर लिहू नका . व SEO साठी फक्त किवर्डचा भडीमार कंटेंटमध्ये करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची पोस्ट हा एक माणूस वाचणार आहे. त्यामुळे त्याला समजेल व त्याला आवडेल अशाच पद्धतीने लिहा
10. कंटेंट हा अपडेट करत रहा
इंटरनेटवर अशा कोणत्याही कन्टेन्ट ची वॅल्यू नाही की जे आउटडेटेड आहेत . असे आउटडेटेड कन्टेन्ट कोणीही वाचत नाही . तुमच्या वाचकाला नेहमी नवीन गोष्टी वाचण्याची आवड असते . त्यामुळे कंटेंट नेहमी अपडेट करत राहा . त्यामध्ये नवीन गोष्टी जोडायचा प्रयत्न करा.
11. किवर्ड रीसर्च नक्की करा
तुम्ही जर अशा विषयांवर लिहीत असाल जे विषय किंवा त्या विषयाबद्दल कोणीच वाचत नाही . तर ती पोस्ट लिहिण्याचा काय फायदा ? . त्यामुळे कंटेंट लिहिण्याआधी किवर्ड रिसर्च नक्की करा . जर तुम्हाला ऑरगॅनिक ट्रॅफिक हवे असेल. तर तुम्ही किवट रिसर्चच्या माध्यमातून असे कीवर्ड जाणून घेऊ शकता की त्याबद्दल खूप सारे लोक सर्च करतात . जर तुम्ही त्या किवर्डच्या संबंधित पोस्ट लिहली. तर तुमच्या ब्लॉगवर खूप ट्राफिक येईल. त्यामुळे कंटेंट लिहिण्याआधी किवर्ड रिसर्च करायला विसरू नका.
- नक्की वाचा – कीवर्ड रिसर्च म्हणजे काय ?
12. फोकस किवर्डला पहिल्या 100 शब्दांमध्ये टाका
तुमचं कंटेंट हा कोणत्या विषयांवर आधारित आहे हे सुरुवातीच्या ओळीमध्ये स्पष्ट झाले पाहिजे . त्यामुळे तुमचा जो फोकस किवर्ड आहे तो पोस्ट च्या पहिला 100 शब्दांमध्ये नक्की ऍड करा .त्यामुळे सर्च इंजिन ला तुमचा कंटेंट हा कोणत्या विषयांवर आहे हे लवकर समजते.
13. पोस्ट टाइटल मध्ये कीवर्ड ॲड करा
जेव्हा आपण फोकस कीवर् पोस्ट च्या टायटल मध्ये लिहितो . तेव्हा त्याचा SEO वर खूप चांगला परिणाम पडतो . त्यामुळे जिथे गरज आहे तिथे फोकस किवर्ड टाइटल मध्ये नक्की वापरा . व टाइटल ची लांबी ही कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट आपण On Page SEO म्हणजे काय ? म्हणजेच On Page SEO In Marathi व On Page SEO कसा करावा ह्या बद्दल सविस्तर जाणून घेतले . परंतु त्या आधी हे लक्षात घ्या की तुम्ही पोस्ट ही वाचकांसाठी लिहीत आहात सर्च इंजिन साठी नाही . त्यामुळे पोस्ट लिहताना पहिला वाचकांचा करा . तुम्हाला ह्या पोस्ट व वेबसाइट बद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ..