एनएलसी कंपनीमध्ये विविध पदांची भरती, २२ हजारपर्यंत मिळेल पगार

सीए (CA) किंवा सीएमए (CMA) परीक्षा उत्तीर्ण असलेल्या पीएसयूमध्ये सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU), भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या एनएलसी इंडिया लिमिटेड ( nlc india limited recruitment 2021 ) मध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी (वित्त) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पदभरतीच्या जाहिरातीनुसार एनएलसी कार्यालयात आणि विविध प्रोजेक्टमध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी (वित्त) च्या एकूण ५६ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचा कालावधी
एनएलसी इंडिया लिमिटेड ( nlc india limited recruitment 2021 ) मधील औद्योगिक प्रशिक्षणार्थी (वित्त) पदांसाठी ही भरती केवळ एका वर्षासाठी आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. निवडलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणात सहभागी झाल्यापासून हा कालावधी लागू होईल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना प्रति महिना २२ हजार रुपये मानधन दिले जाईल.

पात्रता
एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी (वित्त) पदांसाठी अर्ज करण्यास पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवारांकडे २०२०-२१ वर्षामध्ये ICAI द्वारे आयोजित चार्टर्ड अकाउंटंट (CA) ची इंटरमीडिएट परीक्षा किंवा ICMAI कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) ची इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

Leave a Comment

x