राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने ५४ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. वरिष्ठ सल्लागार (अॅकॅडमिक) , सल्लागार (अॅकॅडमिक), प्रोजेक्ट असोसिएट, सर्वे असोसिएट, सीनियर रिसर्च असोसिएट, ज्युनियर प्रोजेक्ट फेलो, कार्यालय सहाय्यक आदि पदांवर एनसीईआरटीने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांकडे १५ जानेवारी २०२२ पर्यंतचा अवधी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. योग्य उमेदवार वेबसाइटवर जाऊन पदांचा तपशील जाणून घेऊ शकतात.

अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एनसीईआरटीची अधिकृत वेबसाइट, ncert.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. प्रत्येक पदासाठी ऑनलाइन अॅप्लिकेशन एनसीईआरटीद्वारे देण्यात आले आले. या प्रत्येक लिंकच्या माध्यमातून उमेदवार संबंधित पदाच्या अॅप्लिकेशन फॉर्मवर जाऊ शकतात. येथे उमेवारांना विचारलेला तपशील भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत. अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ जानेवारी २०२२ आहे.
पात्रता काय
सीनियर कन्सल्टंट – किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ६५ वर्षे.
कंसल्टंट – किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ६५ वर्षे.
प्रोजेक्ट असोसिएट / सर्वे असोसिएट / सीनियर रिसर्च असोसिएट- किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ६५ वर्षे.
ज्युनियर प्रोजेक्ट फेलो – किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. वयोमर्यादा किमान ४० वर्षे.
ऑफिस असिस्टंट – कोणत्याही विषयातील पदवी आणि २ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ६५ वर्षे.
अकाउंटंट – कोणत्याही विषयातील पदवी आणि अकाउंटंटचा २ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ६५ वर्षे.