NBCC मध्ये विविध पदांती भरती, जाणून घ्या तपशील

NBCC Recruitment 2021: एनबीसीसी इंडिया (NBCC India) मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. भारतातील नऊ रत्न कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या एनबीसीसी इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या (Management Trainee)अनेक पदांची भरती केली जाणार आहे. एनबीसीसी इंडियातर्फे पदभरती संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण ७० पदे भरली जाणार आहेत.

रिक्त जागा तपशील
NBCC India ने जारी केलेल्या नोटिफिकेशनननुसार, एकूण ७० पदांची भरती केली जाईल. यामध्ये डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकलच्या १० जागा भरण्यात येणार आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिलसाठी ४० पदांसाठी भरती होणार आहे. येथे मॅनेजमेंट ट्रेनी इलेक्ट्रिकलच्या १५ जागा भरण्यात येणार आहेत.
प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल बॅकलॉगमध्ये एक पद आणि सीनियर स्टेनोग्राफर बॅकलॉगमध्ये एक पद भरण्यात येणार आहे. ऑफिस असिस्टंटसाठी ३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. संपूर्ण रिक्त जागांचा तपशील अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

Leave a Comment

x