7 लाख तरुणांना रोजगार मिळणार..! मोदी सरकारने दिली ‘या’ योजनेला मुदतवाढ..

बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या.. त्यांनाही या बातमीने दिलासा मिळणार आहे. कारण, राेजगाराशी संबंधित एका योजनेला मोदी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे..

‘नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम’… ( National Apprenticeship Training Scheme ) असे या योजनेचे नाव आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या योजनेमुळे पुढील 5 वर्षात देशातील 7 लाख तरुणांना राेजगार मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे..

ते म्हणाले, की रोजगारासाठी तरुण सक्षम व्हावेत, यासाठी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे ( National Apprenticeship Training Scheme ) त्यांना विशेष ट्रेनिंग दिले जाईल. त्यासाठी केंद्र सरकार 3,054 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेत 9 लाख तरूणांना ट्रेनिंग दिले जाईल…

ट्रेनिंगसोबत पगारही मिळणार..
‘एनएटीएस’ ट्रेनिंग प्रोग्राममध्ये इंजिनिअरिंग, ह्यूमेनिटीज, सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सहभागी केले जाईल. त्यांना मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा सेक्टर नि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग देताना तरुणांना 8,000 ते 9,000 रुपये ‘स्टायपेंड’ मिळेल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मध्ये ‘अप्रेंटिसशिप’वर जोर देण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रेनिंग प्रोग्रामवर सरकार 3,054 कोटी रुपये खर्च करणार आहे. मागील 5 वर्षांच्या तुलनेत ही रक्कम 4.5 पट जास्त आहे.

प्रत्येक क्षेत्रातील तरूण रोजगारासाठी कौशल्यपूर्ण व्हावेत, यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्यात आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थीही सहभागी होऊ शकतील.

कशाचे ट्रेनिंग मिळणार..?
मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल डिव्हायसेस मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा सेक्टर नि ऑटोमोबाइल सेक्टरबाबत ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यांना ‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (PLI) सोबत जोडले जाईल. नंतर हे तरुण स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतात. कंपन्यांही त्यांना नोकऱ्या देतील.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘गती-शक्ती मिशन’ सुरू केले होते. त्यामुळे भविष्यात उद्याेग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कामगारांची गरज लागणार आहे. अशा वेळी या तरूणांना रोजगाराच्या अनेक संधी होणार आहेत. त्या दृष्टीने ही योजना लाभदायक ठरणार असल्याचे गाेयल यांनी सांगितले..

Leave a Comment

x