एमपीएससी अंतर्गत 370 पदांची मोठी भरती, पगार 2 लाखांच्याही पुढे? अर्ज करण्यासाठी वाचा..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 370 जागांसाठी भरती (MPSC Recruitment 2022) सुरू होतेय. MPSC भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

 जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग – 172
 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग – 42
 शरीर विकृती शास्त्रज्ञ – 12
 मनोविकृती चिकित्सक – 20
 नेत्र शल्कचिकित्सक – 17
 बधिरीकरण तज्ज्ञ – 15
 क्ष-किरण शास्त्रज्ञ – 21
 अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ – 05
 विशेष अधिकारी (स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ) – 28
 वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा) – 09
 वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा) – 15
 वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) – 14

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): MBBS/MD/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, अनुभव

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा आणि पदासमोरील फाईल डाऊनलोड करून जाहिरात वाचा (Notification)  https://mpsc.gov.in/adv_notification?m=8

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://mpsconline.gov.in/candidate

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 21 जानेवारी 2022 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]

 वयोमर्यादा (Age Limit): 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 35 वर्षे & 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Leave a Comment

x