आता टेन्शन फ्री होऊन चालवा गाडी ! चलन फाडण्यापासून वाचवेल स्मार्टफोन, जाणून घ्या कसे

लोक आपल्या वाहनाने ऑफिस, शाळा आणि इतर ठिकाणी जाताना सोबत गाडीची आवश्यक कागदपत्रे ठेवतात. जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीयूसी. बहुतांश लोक ही कागदपत्रे सोबत ठेवूनच वाहन चालवतात. मात्र काहीवेळा लोक ही कागदपत्रे घरीच विसरतात आणि विनाकागद ( mparivahan app download ) वाहन चालवल्याने चलन फाडले जाते. परंतु हे टाळता येऊ शकते.

तुम्हाला वाचवू शकतो स्मार्टफोन
स्मार्टफोन तुमचे चलन फाडण्यापासून वाचवू शकतो. यासाठी तुम्ही एम-परिवहन ( mparivahan app download ) अ‍ॅपचा वापर करू शकता. या अ‍ॅपमध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि पीयूसी ठेवू शकता. ते कसे डाऊनलोड करावे पाहुयात…

ही आहे डाऊनलोड करण्याची पद्धत :

Step 1 : गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन mParivahan अ‍ॅप डाऊनलोड करा. याचा आयकॉन लाल रंगाचा असेल.

स्टेप 2 : नंतर अ‍ॅपमध्ये साईनअप करा. यासाठी मोबाइल नंबर आवश्यक आहे.

Step 3 : फोन नंबरने लॉगिन केल्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल.

स्टेप 4 : यानंतर अ‍ॅपचा इंटरफेस ओपन होईल. यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीयूसी अपलोड करू शकता.

जवळ कागदपत्रे नसताना ट्रॅफिक पोलिसाने अडवले तर हे अ‍ॅप ओपन करून कागद दाखवा. यामुळे चलन कापले जाणार नाही. (mParivahan)

Leave a Comment

x