MMRDRA मध्ये नोकरीची संधी, सरकारी नोकरीसाठी जाणून घ्या तपशील

MMRDRA Recruitment 2021: मुंबई मेट्रो संचलन महामंडळामध्ये (Mumbai Metropolitan Region Development Authority, MMRDA) विविध पदांची केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत सिस्टिम एक्सपर्टची (Systems Expert) पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सिस्टिम एक्सपर्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा (Degree or Diploma in Engineering) असणे गरजेचे आहे. यासोबतच टेस्टिंग अॅण्ड कमिशनिंग मेंटेनन्स (testing & commissioning/ maintenance) निवड झालेल्या उमेदवारांना एमएमआरडीएच्या मुंबई कार्यालयात नियुक्त केले जाणार आहे.

उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर https://mmrda.maharashtra.gov.in वरील रिक्रूटमेंट विभागात जाऊन अर्ज भरता येणार आहे. १५ डिसेंबर रोजी यासंदर्भातील अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना ११ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Leave a Comment

x