LIC मध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती …….

भारतीय जीवन विमा ( LIC Recruitment 2021 ) निगम म्हणजेच एलआयसीनं विमा सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एलआयसीनं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं 100 जागांवर भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://licindia.in/ वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार https://licindia.in/ या वेबसाईटवर 31 डिसेंबरपर्यंत पर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांनी एलआयसीच्या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

100 जागांसाठी भरती

एलआयसीच्या ( LIC Recruitment 2021 ) लोक प्रशासन आणि संरक्षण विभागातील विमा सल्लागार पदासाठी 100 जागांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथील कार्यालायत नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल.

पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार भारत सरकार मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असावा. निवड झाल्यानंतर त्याला मार्केटिंग आणि सेल्समध्ये काम करावं लागेल.

वेतन

एलआयसीकडून विमा सल्लागार म्हणून निवड होणाऱ्या उमदेवारांना 7 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान मानधन दिलं जाणार आहे. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

x