ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Jute Corporation of India Recruitment: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Jute Corporation of India Recruitment,JCI) मध्ये सरकारची नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये ज्युनिअर इन्स्पेक्टर, ज्युनिअर असिस्टंट आणि अकाऊंटंट ही पदे भरली जाणार आहे.

या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २४ डिसेंबर २०२१ रोजी कंपनीने जाहीर केलेल्या भरती जाहिराती (No.01/2021) नुसार, सर्व तीन पदांच्या एकूण ६३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी विहित निवड प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये ज्युनिअर इन्स्पेक्टरची ४० पदे, कनिष्ठ सहायकाची ११ पदे आणि लेखापालाची १२ पदे आहेत.

अकाऊंटंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून एमकॉम पदवी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव तसेच बीकॉम उमेदवारांना ७ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे गरजेचे आहे. तसेच कॉम्प्युटरवर इंग्रजीमध्ये किमान ४० शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.

ज्युनिअर असिस्टंट पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण आणि ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
सर्व पदांसाठी १ डिसेंबर २०२१ रोजी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे, भरतीशी संबंधित अधिक तपशील ज्यूट कॉर्पोरेशन भरती २०२२ नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

अर्ज प्रक्रिया
ज्यूट कॉर्पोरेशन भरती २०२२ साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कंपनीची अधिकृत वेबसाइट jutecorp.in वर ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. २४ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार १३ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर भरु शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान खुला वर्ग, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना २०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल. हे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी कर्मचारी वर्गातील उमेदवारांना शुल्कामध्ये पूर्ण सवलत देण्यात आली आहे.

Leave a Comment

x