मिनिटात मिळणार पॅनकार्ड, कोणताही चार्ज देण्याची गरज नाही

 Instant PAN पॅनकार्ड हे आज प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक झालं आहे. पॅनकार्ड बनवण्याच्या पद्धतीला अधिक सोपं कसं करता येईल याकडे केंद्र सरकारने आणखी एक पाऊल टाकलं आहे. यासाठी आता तुम्हाला तासभर रांगेत उभं राहण्याची गरज नाहीय. कारण अगदी १० मिनिटात तुम्ही पॅनकार्ड बनवू शकता. पॅन हे १० अंकाचं एक खास alphanumeric आहे. ज्याला इनकम टॅक्स विभागाकडून जारी करण्यात येतं.  आता instant pan card apply मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी देण्याची देखील गरज नाही.  

काय आहे  instant pan card apply

इनकम टॅक्स विभागाने आपलं ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन प्रक्रिया सुरु केली आहे, ज्यात आधार नंबर आणि पॅनकार्डचं आकलन केलं जातं. ही सुविधा तेव्हाच घेता येऊ शकते, जेव्हा खालील अटी आणि शर्थी तुम्ही पूर्ण कराल.

1. या आधी तुम्ही पॅनकार्ड घेतलेलं नसावं

2. तुमचा मोबाईलनंबर तुमच्या आधारशी लिंक असावा

3. आधार कार्डवर तुमची जन्म तारीख, महिना आणि वर्ष यांची नोंद दिसली पाहिजे

4. पॅनकार्डसाठी अर्ज करताना तो अल्पवयीन नसावा.

असं मिळेल instant PAN?

1. सर्वात आधी https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. तेथे होमपेजवर दिसणाऱ्या ‘Instant E-PAN’ वर क्लिक करा.         

2. आता ‘Get New e-PAN’ वर जा.

3. यानंतर आधार नंबर रजिस्टर करा.

4. तुमच्या आधारसोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल, त्यावर एक ओटीपी, म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल. 

5. आधार नंबरच्या आधारावर (Validate) करा.

6. आता ईमेल आल्याचं स्पष्ट (Validate) करा.

 7. यानंतर e-PAN तुम्ही डाऊनलोड करु शकता.

आयकर विभागाच्या माहितीनुसार ई-पॅन मिळवण्यासाठी एक सोपी आणि पेपरलेस प्रोसेस आहे, तसेच ईपॅन जेवढं महत्त्वाचं असेल, तेवढंच (physical) तुमचं सध्याचं पॅनकार्ड असतं.

ज्यांनी यापूर्वी पॅनकार्ड काढलं आहे, त्यांच्यासाठी ही सेवा नाहीय.

Leave a Comment

x