इंडसइंड बॅंकेत विविध पदांची भरती ……

बारावी पास असणाऱ्या आणि बॅंकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील इंडसइंड बॅंकेत ( indusInd Bank Recruitment 2021 ) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे.

इंडसइंड बॅंके ( indusInd Bank Recruitment 2021 ) मध्ये १५० रिक्त जागांवर लवकरच भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत लोन अधिकारी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर आपला अर्ज पाठवायचा आहे. अधिकृत वेबसाइटची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. ८ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

लोन अधिकारी पदाच्या १५० जागा भरण्यात येणार असून यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी पास असणे गरजेचे आहे. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे सेल्स डिपार्टमधील कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना नोकरीमध्ये प्राधान्या देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अर्जासोबक रेझ्युमे, बारावी आणि किंवा पदवीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो जोडणे गरजेचे आहे.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना उत्तम पगार आणि इन्सेंटिव्ह्स, कंपनीतर्फे पेट्रोलचा खर्च, कर्मचारी आणि कुटुंबाचा वीमा मिळणार आहे. उमेदवारांना कल्याण, ठाणे, डोंबवली , बोरीवली, ,वाशी, विरार, दादर, अंधेरी, पालघर, घाटकोपर , पनवेल या ठिकाणी कामानिमित्त पाठविले जाऊ शकते.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

x