दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत 2422 जागांसाठी भरती, कोणत्याही परीक्षेविना होणार निवड..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दहावी पास झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात रेल्वेमध्ये ( indian railway recruitment 2022 ) विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येत आहे. तब्बल 2000 हून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने सेंट्रल रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस भरती-2022 बाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी 17 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. हा अर्ज कसा करायचा, त्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

indian railway recruitment 2022

एकूण पदांची संख्या – 2422
– मुंबई क्लस्टर – 1659
– भुसावळ क्लस्टर – 418
– पुणे क्लस्टर – 152
– नागपूर क्लस्टर – 114
– सोलापूर क्लस्टर – 79

अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांसाठी – 100 रुपये
राखीव प्रवर्गासाठी – अर्ज शुल्क माफ.

निवड कशी होणार..?
अॅप्रेंटीस पदासाठी कोणत्याही परीक्षेविना उमेदवाराची निवड होणार आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी दहावीचे मार्क आणि आयटीआय मार्कांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर क्लस्टरनिहाय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पात्रता
– कमीतकमी 50 टक्के मार्कांसह दहावी पास
– संबंधीत ट्रेडमध्ये ‘आयटीआय’ पास

अर्ज करण्यासाठी मुदत – 16 फेब्रुवारी 2022

अर्ज कुठे करायचा..?
https://rrccr.com/TradeApp/Login

जाहीरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

x