10 वी/ ITI उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी …….

दहावी झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर निदान गॅरेज, वर्कशॉप खोलून काम तरी करता येईल म्हणून आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये ( Indian Navy Bharti 2021 ) शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे. नौसेनेने एन्ट्रन्स परीक्षेद्वारे ट्रेड्समन मेट (INCET TMM) साठी 1200 पदांवर भरती काढली आहे.  (recruitment for the post of tradesman in Indian Navy 2021.)

  • पदाचे नाव – ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)

Indian Navy Bharti 2021 Vacancy Details – पदांची संख्या 

  • ईस्टर्न नेव्हल- 710
  • वेस्टर्न नेव्हल – 324 पदे
  • साउदर्न नेव्हल – 125 पदे
  • एकूण पदांची संख्या – 1159

Salary – पगार…

या पदांसाठी 18 हजार रुपयांपासून 56,900 रुपये प्रति महिना पगार आणि याशिवाय केंद्र सरकारचे भत्ते असा पगार दिला जाणार आहे.

Age Limit – वय आणि शिक्षणाची अट…

मान्यताप्राप्त बोर्डामधून उमेदवार 10 वी पास हवा. याशिवाय मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय झालेला असायला हवा. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असायला हवे. आरक्षणातून अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासंबंधीच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत.

या पदांसाठी इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन जाऊन अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी म्हणजे आजपासूनच अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. 7 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क 205 रुपये आहे. तर इतरांसाठी कोणतेही शुल्क नाहीय.

Selection Process – निवड कशी केली जाणार?

भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीची परीक्षा ही ऑनलाईन, कॉम्प्युटरवर आधारित असणार आहे.

Leave a Comment

x