भारतीय पॅकेजिंग संस्थेत भरती, ४७ हजारपर्यंत मिळेल पगार

IIP Recruitment: भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या( indian institute of packaging recruitment )मुंबईतील कार्यालयाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

indian institute of packaging recruitment

भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या पदभरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यात येणार आहेत. सीनियर फेलोशिप (Senior Fellowship), रिसर्च असोसिएट (आरए) (Research Associate (RA)), सीनियर रिसर्च फेलो Senior Research Fellow (SRF), असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor), असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor,), यंग प्रोफेशनल/ सल्लागार (Young Professional / Consultant), ग्रंथपाल आणि डिझायनर (Librarian and Designer) पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा
पुरुष उमेदवारांसाठी ४० वर्षे तर महिला उमेदवारांसाठी ४५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

पगार
निवड झालेल्या उमेदवाराला ४७ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

२५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. आलेल्या अर्जामधून शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

1 thought on “भारतीय पॅकेजिंग संस्थेत भरती, ४७ हजारपर्यंत मिळेल पगार”

Leave a Comment

x