दहावी पास असणाऱ्यांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी …….

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दल, अर्थात इंडियन कोस्ट गार्ड (indian coast guard recruitment 2021) मध्ये ‘ग्रुप-c’मधील विविध पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे

पुढील पदांसाठी भरती
सिविलियन एमटी ड्राइवर (ऑर्डिनरी ग्रेड),
फोर्क लिफ्ट ऑपरेटर
एमटी फिटर/एमटी (मेकेनिकल)

फायरमन
इंजिन ड्रायवर
मल्टी टास्किंग स्टाफ.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

सिविलियन एमटी ड्राइवर (ऑर्डिनरी ग्रेड) – दहावी उत्तीर्ण. हेवी आणि लाइट मोटर व्हीकल ड्राइविंग लायसन्स. मोटर ड्रायव्हिंगचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक. मोटर मेकॅनिझमचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.

फोर्क लिफ्ट ऑपरेटर – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा समकक्ष योग्यता किंवा संबंधित ट्रेडचा तीन वर्षांचा कामाचा अनुभव. हेवी मोटर व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स. दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजीचं ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे.

एमटी फिटर/एमटी (मेकॅनिकल) – दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. संबंधित ट्रेडमधील आयटीआय डिप्लोमा प्राप्त उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.

फायरमन – दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम हवा. उंची किमान १६५ सें.मी. छाती किमान ८१.५ से.मी. आणि फुगवून ८५ से.मी. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.

इंजिन ड्रायव्हर – सरकारी मान्यता कोणत्याही संस्थेतून इंजिन ड्रायव्हर म्हणून कॉम्पीटन्सी सर्टिफिकेट. दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.

मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार) – दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत चौकीदारीचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.

लस्कर – दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.

अर्ज करण्याची अखेरची मुदत – २२ नोव्हेंबर २०२१

अर्ज कुठे कराल..?
joinindiancoastguard.gov.in

Leave a Comment

x