लष्करात नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलातील ( indian army recruitment 2022 ) विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
लष्करातील कोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे, त्यासाठी पात्रता काय, अर्ज करण्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

या पदांसाठी भरती व दरमहा पगार
लेफ्टनंट – 56,100 – 1,77,500 रुपये
कॅप्टन – 61,300 – 1,93,900 रुपये
मेजर – 69,400 – 2,07,200 रुपये
लेफ्टनंट कर्नल – 1,21,200 – 2,12,400 रुपये
कर्नल – 1,30,600 – 2,15,900 रुपये
ब्रिगेडियर – 1,39,600 – 2,17,600 रुपये
मेजर जनरल – 1,44,200 – 2,18,200 रुपये
शैक्षणिक पात्रता
उमेदवार ‘एलएलबी’मध्ये किमान 55 % गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. शिवाय बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंद केलेली असावी. बार कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालेलं असावं. पदवीनंतर दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2022
आवश्यक कागदपत्रे
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
इथे करा ऑनलाईन अर्ज – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
मूळ जाहीरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा