पदवीधारक तरुणांना राष्ट्रीय बॅंकांमध्ये नोकरीची संधी, लगेच करा अर्ज

राष्ट्रीयीकृत बँकांमधील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तसेच ‘आयबीपीएस- एसओ ( ibps recruitment 2021 ) परीक्षा 2021’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांनाही नोकरीची संधी चालून आली आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन ( ibps recruitment 2021 ) तर्फे राष्ट्रीय बँकांमध्ये तब्बल 1828 पदांसाठी भरती होत आहे. याबाबतची जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बॅंकांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

पुढील पदांसाठी भरती
आय.टी. अधिकारी
कृषी क्षेत्र अधिकारी
राजभाषा अधिकारी

कायदा अधिकारी
एचआर/कार्मिक अधिकारी
विपणन अधिकारी

एकूण पदसंख्या – 1828 जागा

शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग : रु. 850/- राखीव प्रवर्ग : रु. 175/-

अर्ज दाखल करण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021 आहे.

अर्ज कुठे करणार..? – www.ibps.in

Leave a Comment

x