तुम्ही वर्डप्रेस ब्लॉग नवीन सुरू केला आहे का ? व तुम्हाला वर्डप्रेस मधील फीचर ची माहिती नाही आहे का ? व ह्यामुळेच वर्डप्रेस मध्ये पोस्ट कशी लिहावे हे समजत नाही आहे किंवा seo कसा करावा ? , कोणत्या किवर्ड पोस्ट लिहावी हे सुद्धा समजत नसेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात . कारण हे सगळे प्रश्न प्रत्येक नवीन ब्लॉगर ला पडत असतात .
नमस्कार मित्रांनो तुमचे मराठी जीवन ह्या वेबसाइट वर स्वागत आहे . ह्या पोस्ट मध्ये आज आपण वर्डप्रेस मध्ये पोस्ट कशी लिहावी ? म्हणजेच how to write post in wordpress in marathi ह्या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत .
2021 मध्ये वर्डप्रेस मध्ये पोस्ट कशी लिहावी ? | how to write post in wordpress in marathi
1. पोस्ट चे title कुठे लिहावे
Add Title ह्या बॉक्स वर तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमच्या पोस्ट साठी तिटळे लिहू शकता . हे title आधी पासूनच H1 ह्या heading टॅग मध्ये असते . त्यामुळे तुम्हाला ह्या साथी वेगळे heading टॅग देण्याची गरज नाही .
2. पोस्ट मध्ये इमेज कशी टाकावी ?
पोस्ट मध्ये जर तुम्हाला इमेज टाकायची असेल तर ब्लॉक च्या बाजूला तुम्हाला ” + ” हे चिन्ह दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करून Image वर क्लिक करायचे आहे . ह्या नंतर तुम्ही इमेज अपलोड करून किंवा तुमच्या मीडिया लायब्ररी मधून निवडू शकता .
3. पॅराग्राफ कसा बनवावा
ह्या साठी तुम्हाला ब्लॉक च्या बाजूला असलेल्या ” + ” ह्या चिन्हा वर क्लिक करून Paragraph वर क्लिक करायचे आहे .
4. पोस्ट मध्ये पॉईंट्स कसे बनवावे
कधी कधी तुम्हाला जर कुठली ही लिस्ट असेल तर त्या साठी त्याचे पॉईंट्स बनावे लागतात तर त्या साठी तुम्हाला ब्लॉक च्या बाजूला तुम्हाला ” + ” हे चिन्ह दिसेल तिथे तुम्हाला List वर क्लिक करावे लागेल .
5. पोस्ट मध्ये Heading कसे बनवावे
पोस्ट मध्ये तुम्हाला H1 , H2 , H3 , H4 अश्या heading भासते तर त्या साठी तुम्हाला ब्लॉक च्या बाजूला असलेल्या ” + ” चिन्हा वर क्लिक करायचे आहे .
6. पोस्ट ड्राफ्ट मध्ये सेव कशी करावी ?
डशबोर्ड मध्ये वरती उजव्या बाजूला save draft ऑप्शन आहे ह्याच्या मदतीने तुम्ही पोस्ट ला ड्राफ्ट मध्ये सेव करून ठेवू शकता . असे समझा की तुम्ही पोस्ट आज लिहली परंतु पोस्ट तुम्हाला उद्या पब्लिश करायची आहे . तर तुम्ही लिहली पोस्ट ड्राफ्ट मध्ये सावे करून जेव्हा हवे तेव्हा ती पोस्ट पब्लिश करू शकतो .
7. Categories कशी बनवावी
उजव्या बाजूला असणाऱ्या साइड बार मध्ये तुम्हाला Categories कहा ऑप्शन दिसेल ह्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पोस्ट साठी कॅटेगरी बनवून तुम्हाला हवी टी पोस्ट वेगळ वेगळ्या कॅटेगरी मध्ये टाकू करू शकता .
8. पोस्ट मध्ये Tags कसे जोडावे
उजव्या बाजूला असणाऱ्या साइड बार मध्ये तुम्हाला Tags चा ऑप्शन दिसेल . टॅग हे सुद्धा एक प्रकारे कॅटेगरी सारखेच काम करते परंतु ह्याच्या मदतीने पोस्ट रॅंक होण्यास मदत होते .
9. पोस्ट मध्ये Featured Image कसे जोडावे
उजव्या बाजूला असणाऱ्या साइड बार मध्ये तुम्हाला Featured Image चा ऑप्शन दिसेल . ह्या मदतीने तुम्ही पोस्ट ला फीचर इमेज जोडू शकता . फीचर इमेज म्हणजे एक प्रकारे पोस्ट चे thumbnail असे म्हणू शकता .
10. पोस्टचा Preview कसा पाहावा ?
डशबोर्ड मध्ये वरती उजव्या बाजूला Preview ऑप्शन आहे ह्याच्या मदतीने तुम्ही पोस्ट प्रीव्यू वर्जन जसे की तुमच्या वाचकाला तुमची पोस्ट कशी दिसेल हे समजते .
11. पोस्ट publish कशी करावी ?
डशबोर्ड मध्ये वरती उजव्या बाजूला publish ऑप्शन आहे ह्या च्या मदतीने तुम्ही पोस्ट पब्लिश करू शकता .
12 . पोस्ट लिहण्यास सुरवात कोठून करावी ?
तुम्हाला ह्या डशबोर्ड मध्ये जो मोकळा भाग दिसत आहे तिथे तुम्हाला तुमची पोस्ट लिहायला सुरवात करायची आहे .
निष्कर्ष ( conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण वर्डप्रेस मध्ये पोस्ट कशी लिहावी ? म्हणजेच how to write post in wordpress in marathi हे सविस्तर जाणून घेतले व पोस्ट लिहण्यासाठी असलेल्या गरजेच्या गोष्टी ह्यांच्या बद्दल सुद्धा माहिती जाणून घेतली . तुम्ही तर एक नवीन ब्लॉगर असाल व तुम्ही तुमच्या ब्लॉग ची सुरवात वर्डप्रेस मध्ये केली असेल तर पोस्ट लिहायला सुरवात करण्याअगोदर ही पोस्ट नक्की वाचा . ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेयर करा .