नमस्कार मित्रांनो ह्या आधीच्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगिंग संबंधित बेसिक गोष्टी जाणून घेतल्या . ब्लॉगिंग करण्यासाठी साठी तुम्ही 2 प्लॅटफॉर्म वापरू शकतो . एक आहे ब्लॉगर ते आहे मोफत व दुसरे आहे वर्डप्रेस ते सुद्धा मोफतच आहे परंतु त्या साठी डोमेन व होस्टिंग घेणे गरजेचे आहे हे तुम्हाला माहीतच असेल .
तर ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत ब्लॉगर मध्ये पोस्ट कशी लिहावी ? म्हणजेच How To Write Post In Blogger In Marathi. ब्लॉगर मध्ये पोस्ट लिहणे सोप्पे आहे व पोस्ट पब्लिश करणे सुद्धा . ही पोस्ट वाचल्या नंतर तुमच्या ते लक्षात येईलच तर चालल सुरू करूया ..
जाणून घ्या ब्लॉगर मध्ये पोस्ट कशी लिहावी ? | How To Write Post In Blogger In Marathi
ब्लॉगर मध्ये पोस्ट पब्लिश करण्या अगोदर ब्लॉगर मध्ये ब्लॉग कसं बनवावा हे तुम्हाला माहीतच असेल . नसेल माहीत तर तुम्ही त्या साठी यांच्या जुन्या पोस्ट वाचू शकता . त्याच्या मदतीने तुम्ही सहज तुमचा ब्लॉग बनवू शकता .
ह्या नंतर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा
- सर्वात पहिला ब्लॉगर. कॉम वर जाऊन लॉगिन करा
- ह्या नंतर तुमचा ब्लॉग निवडा ज्यात तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे
ह्या नंतर तुम्हाला अश्या प्रकारे dashboard दिसेल ह्या मध्ये सर्व प्रथम तुम्हाला posts वर क्लिक करायचे आहे व त्या नंतर अधिक New Post वर क्लिक करायचे आहे . ह्या नंतर तुमच्या समोर पोस्ट एडिटर ओपन होईल त्या मध्ये तुम्ही पोस्ट लिहू शकता .
तुम्ही ज्या विषया संबंधित पोस्ट लिहीत आहात त्याच्या साठी एक सुंदर असे शीर्षक तुम्हाला सर्वात वरच्या टाइटल बॉक्स मध्ये लिहायचे आहे . व खालील ती जागा मोकळी आहे त्यात तुम्हाला पोस्ट लिहायला सुरवात करायची आहे .
ब्लॉग पोस्ट मध्ये टेक्स्ट फॉर्मट कसे करावे ?
जेव्हा आपण पोस्ट लिहतो तेव्हा कित्येक वेळा वाक्य किंवा शब्दाला वेगळ्या फॉर्मट मध्ये लिहण्याची गरज भासते . कारण ह्या मुळे ते शब्द किवहा वाक्य ह आकर्षिक दिसतात . ब्लॉगर च्या पोस्ट एडिटर मध्ये एक टुल बार आहे ज्यात टेक्स्ट फॉर्मट बदलण्यासाठी 8 ऑप्शन आहेत जसे की .. बोल्ड , italic , अंडरलाइन , पॅराग्राफ फॉर्मट , फॉन्ट साइज , फॉन्ट टाइप , टेक्स्ट कलर इत्यादि . टेक्स्ट फॉर्मट करण्यासाठी सर्वात पहिला यता शब्दाला किंवा वाक्याला तुम्हाला सिलेक्ट कार्याचे आहे व तुम्हाला टुल बार मध्ये हवे असलेल्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे .
सुरवातीच्या वेळेस तुम्ही सगळ्या ऑप्शन वर क्लिक त्या ऑप्शन चा काय उपयोग आहे हे जाणून घेऊ शकता . त्याने तुम्हाला त्या ऑप्शन चा उपयोग समजण्यास सोप्पे जाईल .
ह्या मध्ये पॅराग्राफ फॉर्मट साठी हि काही ऑप्शन दिले आहेत जसे की ..
- Major Heading ( H1 )
- Heading ( H2 )
- Sub Heading ( H3 )
- Minor Heading ( H4 )
- Normal
ह्या मध्ये तुम्हाला H1 ते H4 हेडिंग चे प्रकार दिले गेले आहेत . major heading म्हणजे सर्वात मोठी साइज व minor heading मध्ये सर्वात लहान साइज . ह्याच उपयोग पोस्ट मध्ये हेडिंग टाकण्यासाठी होतो . व पॅराग्राफ साठी नॉर्मल साइज चा वापर केला जातो . ब्लॉगर मध्ये तुम्हाला H1 हेडिंग वापरायची गरज नही आहे कारण वरती जो हेडिंग असतो तो आधीच H1 असतो . व एक पोस्ट मध्ये फक्त एकच H1 वापरू शकतो .
ब्लॉग पोस्ट मध्ये इमेज कसे जोडावे ?
ब्लॉग पोस्ट मध्ये इमेज जोडल्याने त्या पोस्ट ची क्वालिटी वाढते . व वाचकाचा सुद्धा जास्त वाचण्याची इच्छा होते . म्हणून पोस्ट मध्ये कमीत कमी 1 इमेज तरी जोडावी .
इमेज जोडण्यासाठी टुल बार मधील इन्सर्ट इमेज आयकॉन वर क्लिक करा . व त्या नंतर तुमची इमेज अपलोड करायची आहे .
ब्लॉगर पोस्ट मध्ये विडियो कशी जोडावी ?
जर तुम्हाला आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये विडियो टाकायची असेल तर त्यामध्ये सुद्धा एक option आहे . तुम्ही टुल बार मधील इन्सर्ट विडियो आयकॉन वर क्लिक करून तुम्ही कम्प्युटर मधील किंवा युट्यूब मधील सुद्धा विडियो जोडू शकता .
ब्लॉगर मध्ये permalink कशी बनवावी ?
जर तुम्हाला तुमच्या पोस्ट मध्ये कोणती ही लिंक जोडायची असेल तर तुम्ही हे सुद्धा काम खूप सहजपणे करू शकता ह्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम त्या टेक्स्ट ला सिलेक्ट करायची आहे व त्यानंतर इन्सर्ट आणि एडिट लिंक आयकॉन वर क्लिक करायचे आहे व त्यामध्ये Website ची URL पेस्ट करायची आहे .
ब्लॉग पोस्टमध्ये टेबल कसे जोडावे ?
कधी-कधी ब्लॉगपोस्ट मध्ये टेबल ची सुद्धा गरज पडते . टेबल च्या मदतीने आपण डेटा योग्य प्रकारे दाखवू शकतो. टेबल जोडण्यासाठी तुम्हाला टूलबार मधील इन्सर्ट टेबल च्या आयकॉन वर क्लिक करा . ह्या मध्ये तुम्हाला Row आणि Column जोडण्याचे ऑप्शन दिले जातात .
ब्लॉगर मध्ये लेबल कसे जोडावे?
तुम्ही तुमच्या पोस्ट वेगवेगळ्या category मध्ये टाकू शकतो व ह्यालाच लेबल असे म्हंटले जाते . तर समजा मी ब्लॉगिंग बद्दल पोस्ट लिहतो तर त्या मध्ये मी ब्लॉगर , वर्डप्रेस , SEO इत्यादि . कॅटेगरी बनवल्या आहेत .
पोस्ट साठी सर्च डिस्क्रिपशन कसे लिहावे ?
खूप सारे नवीन ब्लॉगर सर्च डिस्क्रिपशन न लिहताच सोडून देतात . कारण त्यांना माहीतच नसते की सर्च डिस्क्रिपशन चे कीती जास्त महत्व आहे . जेव्हा तुम्ही गुगल मध्ये रॅंक होता तेव्हा तुमच्या पोस्ट च्या खाली छोटे सर्च डिस्क्रिपशन दिसते . ते वाचूनच लोक तुमच्या पोस्ट वर क्लिक करतात . पोस्ट एडिटर मध्ये उजव्या बाजूला सर्च डिस्क्रिपशन चा ऑप्शन असतो तिथे तुम्ही सर्च डिस्क्रिपशन लिहू शकता .
ब्लॉग पोस्ट आपल्या वेळेनुसार कशी पब्लिश करावी
कधी कधी आपण एक टाइम टेबल बनवतो व त्या नुसारच पोस्ट रोज पब्लिश करत असतो पण कधी कधी आपले टाइमटेबल चुकते पण ह्याची सुद्धा काळजी करायचे कारण नाही . ब्लॉगर मध्ये एक ऑप्शन आहे ” published on ” . ह्याचे मदतीने तुम्ही पोस्ट तुमच्या हिशोबाने कधी ही पब्लिश करू शकता . म्हणजे एक प्रकारचे timer समजले तरी चालेल .
ब्लॉग पोस्ट लिहताना ही गोष्ट लक्षात ठेवा
पोस्ट लिहताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमची पोस्ट वाचकाला समजेल अशीच लिहली पाहिजे . तुमची समजवण्याची पद्धत ही सोप्पी असावी . व जिथे गरज असेल तिथेच फॉर्मट टेक्स्ट चा वापर करा .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगर मध्ये पोस्ट कशी लिहावी ? म्हणजेच How To Write Post In Blogger In Marathi ह्या बाबतीत माहिती जाणून घेतली . मला आशा आहे की ही पोस्ट वाचल्या नंतर ब्लॉगर मध्ये पोस्ट कशी लिहावी ? म्हणजेच How To Write Post In Blogger In Marathi ह्या बाबतीत तुम्हाला समजला असेल . ह्या पोस्ट किंवा वेबसाइट बद्दल तुम्हाला कोणती शंका असेल तर नक्की शेयर करा . ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत नक्की शेयर करा .