नमस्कार मित्रांनो .. तर अखेर आपण ब्लॉगिंग सुरु करण्याचा विचार केलाच असेल ? आपल्या सगळ्यांना असे जीवन हवे आहे जिथे कोणी आपल्यला सांगणारे नको … हे कर … ते कर … असे कर.. तसे कर… बरोबर ना ? असे जीवन कोणाला नको असेल जिथे आपणच आपले बॉस ? आणि खरं सांगायचं तर हे सगळी मोकळीक ब्लॉगिंग जीवन तुम्हाला मिळते . इथे तुम्हीच तुमचे बॉस असता . हि कुठली हि ९ ते ५ नोकरी नाही आहे . जिथे टेन्शन आहे. आजचे काम आजच करायला हवं असे कोणते हि प्रेशर इथे नाही आहे .
अशी पोस्ट कशी लिहावे ज्याने तुमचा वाचक तुमच्या पासून कधीच लांब जाणार नाही . त्या मुळे त्याची सुरवात हि पहिल्या ब्लॉग पासूनच व्हायला हवी . पण खूप सारे नवीन ब्लॉगर ह्या गोष्टींचा विचार करत नाही . त्यांना फक्त ब्लॉग सेटअप करून पोस्ट टाकायचे आहेत आणि पैसे कमवयाचे आहेत . माफी असावी पण हैने तुमचा नक्कीच भर्मनिरस होईल . सत्य तर हे आहे कि तुम्ही तुमच्या वाचकाला बांधून नाही ठेवू शकले तर त्या वाचकाला तुम्ही गमवून बसाल . त्या मुळे ब्लॉगिंग मध्ये तर तुम्हाला यशस्वी होयचे आहेत तर उत्तम ब्लॉग पोस्ट कशी लिहावे हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल . तर चला मग सुरवात करूया .
पहिली ब्लॉग पोस्ट कशी लिहावी ? | How to write first blog post in marathi
जे कोणी नवीन ब्लॉगर आहेत व त्यांना उत्तम ब्लॉग पोस्ट लिहायची आहे त्यांना काही गोष्टी त्यांच्या ब्लॉग पोस्ट मध्ये टाकणे जरूरी आहे . जसे कि ….
तुम्ही कोण आहात ?
तुम्ही जेव्हा तुमच्या बद्दल त्यांना सांगाल तेव्हाच ते तुमच्या वर विश्वास ठेवतील . त्यामुळे तुम्ही कोण आहेत हे फक्त शब्दाने न सांगता तुमचे स्वतःचे फोटो सुद्धा त्याना दाखवा हैने त्याचा तुमच्या वर विश्वास बसेल व ते तुमच्या शी व तुमच्या ब्लॉगशी कनेक्ट होतील .
तुम्ही ब्लॉगिंग का करत आहात ?
हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर लोकांना माहीत नसेल की तुम्ही ब्लॉगिंग का करत आहात त्यामागे काय कारण आहे तर लोक तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत त्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तर देताना ऑडियन्स च्या मानाचा नक्की विचार करा त्यामुळे या प्रश्नांची उत्तर देताना स्वतःला काही प्रश्न विचारा की तुम्ही वाचक का तुमच्या ब्लॉगवर येतोय ते तुमच्या ब्लॉग मध्ये काय बघतात व तुमच्या ब्लॉग मध्ये त्या वाचकांसाठी काय आहे त्यामुळे तुमच्या वाचकाला सांगा की तुम्ही ब्लॉगिंग त्यांच्यासाठी का करत आहे याने ते तुमच्याशी लवकर कनेक्ट होतील.
तुम्ही कशाबद्दल ब्लॉग लिहिणार आहात ?
त्यामुळे ही नक्कीच एक उत्तम आयडिया ठरू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट वारंवार अपडेट कराल जर तुमचं नियमित शेडूल असेल तर त्यामुळे तुमच्या ब्लॉगवर 10 टॉपिकवर लिहिण्यापेक्षा एकच टॉपिक मध्ये लिहा याने तुमच्या ब्लॉगची अथोरिटी वाढेल व तुमचा वाचक तुमच्याकडे त्या फिल्डमधील एक्स्पर्ट म्हणून बघेल.
तुम्ही कोणासाठी पोस्ट लिहीत आहात ?
तुमच्या पहिल्या ब्लॉग पोस्ट म्हणजेच first blog post in marathi मध्ये तुमच्या टारगेट वाचका बद्दल सांगायला विसरू नका . तुम्ही कोणत्या लोकांसाठी हा ब्लॉग लिहित आहात ? किंवा हि लोक कशी आहेत ? त्यामुळे वाचणारा जर टार्गेट ऑडियन्स असेल तर त्यासाठी हा ब्लॉग त्यांचे प्रॉब्लेम सोडवणारा असेल व तुमच्या टारगेट ऑडियन्स तुमची गोष्ट सांगायला विसरू नका की तुम्ही त्यांच्यासाठी का लिहित आहात ? याने तुमचा वाचक तुमच्याशी खूप जास्त कनेक्ट होईल.
वाचक तुमच्या ब्लॉग मध्ये कशाप्रकारे सामील होऊ शकतो ?
तुमच्या वाचकाला ही गोष्ट सांगणे फार जरुरी आहे की ते तुमच्या ब्लॉगमध्ये कशाप्रकारे सामील होऊ शकतात ? तुम्ही त्यांना कमेंट करण्यासाठी सांगता ? किंवा तुम्ही त्यांना गेस्ट पोस्टसाठी ऑफर देता का ? किंवा वाचक तुम्हाला ई-मेल करून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कसे द्यायला ? किंवा त्यांना असणारे प्रॉब्लेम तुम्ही कसे सोडू शकता त्यामुळे वाचकाला तुमच्या ब्लॉग मध्ये सामील करण्यासाठी तत्पर रहा काही वाचक या गोष्टींना नकार देतील किंवा ते तुमच्यावर विश्वास हि नाही ठेवणार परंतु त्यांना असणारी प्रॉब्लेम फीडबॅक सहाय्याने सांगण्यास सांगा व त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचे प्रयत्न करा.
ब्लॉगिंग मधली ध्येय स्पष्टपणे सांगा… – Blogging Goals
तुम्ही तुमच्या वाचका सोबत तुमचे ब्लॉगिंग मधील ध्येय स्पष्टपणे तुमच्या पहिल्या पोस्ट मध्ये सांगू शकता. तुम्हाला ब्लॉगिंगच्या सहाय्याने काय साध्य करायचे आहे ? किंवा या सहा ते एक वर्षाच्या काळात तुम्हाला तुमच्या ब्लॉग मधून काय अपेक्षा आहेत असे सर्व ध्येय तुम्ही तुमच्या वाचकांसोबत शेअर करू शकता त्यामुळे तुमचा वाचक तुम्हाला हे ध्येय पुर्ण करण्यासाठी तुमची नक्कीच मदत करू शकतो.
तुमचा परिचय करून देणारी पोस्ट लिहा . – Introduction Blog post
ब्लॉग सुरु करणे ही महत्त्वाची गोष्ट नसून ब्लॉक उत्तम रित्या पुढे हि सुरु ठेवणे हे मुख्य ध्येय ठेवा तुमच्या पहिल्या पोस्टमध्ये मी वरती ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यात तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहिता तर ही एक नक्कीच उत्तम सुरुवात ठरू शकते त्यामुळे तुमच्या वाचकाला हे समजायला हवे की तुम्ही एक प्रामाणिक व उत्कट ब्लॉगर आहात. त्यांना सांगा की ब्लॉगिंग च्या मार्फत तुम्हाला कुठलेही वाईट कृत्य करायचे नाही आहे त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या मदतीसाठी हा ब्लॉग बनवलेला आहे .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आम्ही नवीन ब्लॉगर साठी त्याची पहिली ब्लॉगिंग पोस्ट म्हणजेच first blog post in marath हि कशी असावी ह्या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे जर या व्यतिरिक्त तुम्हालाही काही पॉईंट्स तुमच्या पोस्टमध्ये टाकायचे असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सुचवा व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या वेबसाईट बद्दल किंवा या पोस्ट बद्दल कोणतेही प्रॉब्लेम असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. लवकरच भेटू या एक नवीन पोस्ट सोबत….