Blog साठी Article कसे लिहावे ? – 10 Tips

 नमस्कार मित्रांनो तुमचा एक स्वतःचा ब्लॉग आहे.  तुम्ही त्या ब्लॉगची खूप चांगली डिझाईन सुद्धा केली आहे . सोबतच त्याचा SEO  सुद्धा केला आहे परंतु ब्लॉगसाठी आर्टिकल कसे लिहावे ? म्हणजेच How To Write Article For Blog In Marathi हे तुम्हाला माहीत नाही . मग पुढे तुम्ही ब्लॉगींग तरी कसे करणार ? साधी सरळ गोष्ट आहे . वाचक तुमच्या वेबसाईट वर येणार . परंतु जर तुमच्या वेबसाईटवर चांगला कंटेनर नसेल . तर ते जास्त वेळ तुमच्या ब्लॉग वर  राहणार नाहीत व ते दुसऱ्या साइटवर निघून जातील . 

How To Write Article For Blog In Marathi

असेल तर खूप कमी झालेअसेल  की लोकांना एखाद्या वेबसाईट ची डिझाईन आवडली . म्हणून ते त्या वेबसाईट ला वारंवार भेट देतात . परंतु हे तर मग तुम्ही नक्कीच ऐकले असेल.  की चांगला कन्टेन्ट मुळे लोक त्याच वेबसाईट ला वारंवार भेट देतात.  किंवा आपण हि असे कधीतरी केलेले असेल . लोकांना त्यांच्या प्रश्नाचे एक उत्तम उत्तर हवे असते.  जर तुम्ही ते उत्तर त्यांना देऊ शकलात . तर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता .

 जर तुम्ही चांगला कन्टेन्ट लिहित असाल . तर तुमचा वाचक सुद्धा तुमच्या पासून कधीच दूर जाणार नाही . उलट तो तुमच्या पोस्टची वाट बघेल . त्यामुळे जर ब्लॉग साठी पोस्ट कसे लिहावे हे तुम्हाला माहीत नसेल.  तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात या ठिकाणी आपण बघणार आहोत की ब्लॉगसाठी आर्टिकल  कसे लिहावे ? म्हणजेच How To Write Article For Blog In Marathi .. 

ब्लॉग चे आर्टिकल लिहण्यासाठी १० टिप्स | How To Write Article For Blog In Marathi 

तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की कन्टेन्ट इस द किंग व हे खरे सुद्धा आहे.  एक ब्लॉग साठी त्याच्या पोस्ट खूप महत्त्वाच्या आहेत . व या पोस्टमध्ये आज आपण ब्लॉग साठी आर्टिकल कसे लिहावे  ? हे जाणून घेणार आहोत व या पोस्टच्या मदतीने तुम्ही सहज आर्टिकल लिहू शकता व तुम्ही तुमच्या वाचकांना तुमच्या वेबसाईटशी  बांधून ठेवू शकता तर चला सुरु करूया…. 

1. स्वतःचे अनुभव लिहा 

जेव्हा आपण कोणत्याही विषयावर लिहत असतो तेव्हा जर त्याबद्दल आपले काही खास अनुभव असतील . तर आपण त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे लोकांना सांगू शकतो व आपल्या अनुभवामुळे त्या पोस्ट चे महत्व खूप वाढते. कारण त्यामध्ये आपल्या आपण आपल्याला आलेले  प्रॉब्लेम व आपण त्या प्रॉब्लेम कसे सोडवले शोधले अशा खूप साऱ्या गोष्टी आपण त्यात लिहू असतो .  त्यामुळे समोरचा वाचक त्या गोष्टींशी जुळवून घेतो . व समोरचा  वाचक सुद्धा तुमचे अनुभव जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो .  

2. वाचकाला प्रश्न विचारा 

जेव्हा माणूस वाचत असतो तेव्हा फक्त तो वाचण्यावर फोकस करत असतो.  त्यामुळे तुम्ही जर त्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले तर समोरचा माणूस त्या पोस्टशी जुळवून घेतो.  कारण कधीकधी तुम्ही ज्या विषयावर पोस्ट  लिहित आहात.  त्या विषयांवर वाचकाचे सुद्धा काही अनुभव असतात . जर तुम्ही पोस्टमध्ये काही त्या विषयाबद्दल प्रश्न विचारले . तर वाचक त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्यास उत्सुक असतो व अशे प्रश्न विचारल्यामुळे समोरचा माणूस सुद्धा तुमच्या शी लवकर कनेक्ट होतो . 

3. आर्टिकल चे पूर्व नियोजन करा 

How To Write Article For Blog In Marathi

जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयांवर आर्टिकल लिहीत असता तेव्हा त्या विषयाबद्दल अधिक माहिती गोळा करा.  व ते मुद्दे एका पानावर लिहून घ्या व व त्या मुद्यांच्या मदतीने आर्टिकल लिहायला सुरवात करा .  पूर्व नियोजन केल्या मुळे तुम्ही तुमचे आर्टिकल लवकर व कुठली चूक न करता लिहू शकता व यामुळे आर्टिकल योग्य रीतीने  लिहिण्यास मदत होते . 

4. परिच्छेद छोटे ठेवा 

मोठे मोठे परिच्छेद कोणत्याच वाचकाला वाचायला आवडत नाही.  कारण ते वाचताना वाचकाला खूप कंटाळा येतो . त्यामुळे तुम्ही मोठे आर्टिकल लिहित असाल किंवा छोटे परंतु परिच्छेद हे छोटेच ठेवावा . त्यामुळे वाचकाला आर्टिकल वाचण्यास आवड निर्माण होते तु. म्ही यशस्वी ब्लॉगर्सचे ब्लॉग पाहिले असतील . तर त्यामध्ये ते ब्लॉगचे परिच्छेद छोटे ठेवतात .  मनुष्यला मोठे परिच्छेद वाचण्यास आवडत नाही हि त्याची मानसिकता आहे . 

6. बुलेट पॉईंट्स चा वापर करा 

बुलेट पॉईंट म्हणजे तुम्ही पोस्ट मध्ये जे गोल बिंदू बघितले असतील जे पॉईंट ला दर्शवण्यासाठी वापरले जातात . ह्या बुलेट पॉईंट्स चा वापर केल्याने तुम्ही तुमच्या परिच्छेदाचे महत्वाचे भाग करून लोकांना दाखवू शकतात . ह्याने वाचकाला महत्वाची योग्य माहिती मिळते . व समोरच्या माणसाला सुद्धा समजते कि बुलेट पॉईंट्स आहेत म्हणजे हे महत्वाचे मुद्दे आहेत . 

7. रोमांचकता बनवून ठेवा 

जर तुम्ही कधी साधे सरळ चित्रपट बघता का ? ज्यात काही रोमांचक नसते . नाहि ना ? खूप कमी माणसे असतील ज्यांना असे चित्रपट पाहायला आवडतात . ब्लॉगिंग मध्ये सुद्धा असेच असते जर  तुमच्या ब्लॉग काही रोमांचक मुद्दे नसतील तर समोरचा माणूस कंटाळून जाईल त्यामुळे समोरच्याला ब्लॉग वाचताना मज्जा यायला हवी . जर तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये रोमांचकता ठेवली तर वाचक सुद्धा कंटाळणार नाही व तो तुमची पोस्ट अधर्वट वाचणार नाही . तुम्ही न्यूज पेपर चे शीर्षक पाहिलेच असतील . त्या मध्ये बघा एकादी साधी सरळ बातमी सुद्धा रोमांचक बनवून सांगतात . ह्याच कारण असे कि ” जो दिखता है , वही बिकता है ” समजले का ? 

8. दुसर्यापेक्षा वेगळे लिहण्याचा प्रयत्न करा . 

तुम्ही तर पाहिलेच असेल गुगल वर एकाच विषयांवर किती लाखो पोस्ट आहेत . परंतू त्या सगळ्या पोस्ट लोक वाचत नाहीत . आणि एवढा त्यांना वेळ सुद्धा नाही आहे . मग ते ह्या साठी गुगल ची मदत घेतात . गुगल त्यांच्या वाचकांसाठी उत्तम पोस्ट पहिल्या पेज वर रँक करतो . पण त्याच पोस्ट का रँक करतो ? तर त्या मध्ये इतरांपेक्षा काही वेगळे व हटके लिहलेले असते . त्यामुळे वाचकाला सुद्धा जास्तीची व नवीन माहिती मिळते . त्यामुळे इतरांसारखे तेच तेच रटाळ लिहत बसू नका . जे लिहताय ते इतरांपेक्षा वेगळे लिहा . 

9. लोकांना पुरावा दाखवा 

तुम्हाला तर माहितीच असेल कि इंटरनेट वर सगळे काही सत्यच सांगितले जात नाही . तर काही गोष्टी ह्या फक्त पैशांसाठी सांगितल्या जातात . त्यामुळे लोके हि तुमच्या वर सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीत . तुम्ही सुद्धा कोणी जर सत्य आहे कि खोटे ह्याचा पुरावा दाखवत असेल तरच आपण विश्वास ठेवतो . खरे तर माणसाची हि मानसिकता आहे . त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्या मानसिकते नुसार स्वतः मध्ये बद्दल करणे गरजेचे आहे . त्यामुळे कुठल्या विषयाबद्दल लिहत असताना . फोटो च्या स्वरूपातून पुरावा दाखवण्याचा प्रयत्न करा .

10 . व्याकरण व भाषेतील चुका टाळा 

How To Write Article For Blog In Marathi

तुम्ही ज्या विषयावर लिहत आहेत ते तुम्ही पूर्ण रिसर्च करून लिहले परंतु जर तुम्ही तुम्ही कन्टेन्ट लिहीत असताना व्याकरणातील व शब्दातील काही चुका केल्या तर समोरच्या वाचकाला तुम्ही काय लिहले आहे हे समझणार नाही . व त्यामुळे तुमचे वाईट इम्प्रेशन पडू शकते . व तुमचा वाचक तुमच्यापासून दुरावला जाऊ शकतो . त्यामुळे अश्या छोट्या छोट्या चुकांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका . 

ब्लॉग साठी आर्टिकल कसे लिहावे हे तर जाणून घेतले पण त्या ब्लॉग चा SEO कसा करावा हे माहित आहे तुम्हाला ? माहित नसेल तर आमची How To Write SEO Friendly Article In Marathi हि पोस्ट नक्की वाचा . 

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉग साठी आर्टिकल कसे लिहावे  म्हणजेच How To Write Article For Blog In Marathi ह्या जाणून घेतले . त्यासाठी आपण १० मुद्यांवर सविस्तर चर्चा केली . तुम्ही जर ह्या मुद्यांनुसार आर्टिकल लिहले तर ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी हि रोखू शकता नाही . तुम्हाला ह्या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल काही हि शंका असतील तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला अजिबात विसरू नका ….. 

Leave a Comment

x