पॅन कार्ड वापरताना ‘ही’ चूक नका ….. भरावा लागू शकतो 10 हजारांचा दंड !

पॅन कार्ड.. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आवश्यक ओळखीचा दस्ताऐवज… कर व्यवस्थापनासाठीचे एक महत्वाचा कागदपत्र.. सरकारी-निमसरकारी कामासाठी सातत्याने वापरले जाणारे कार्ड.. पॅनकार्डशिवाय ( how to use pan card ) आर्थिक व्यवहारांशी संबंधित काम पूर्णच होऊ शकत नाही.

पॅन ( how to use pan card ) म्हणजे ‘परमनंट अकाऊंट नंबर’… आयकर विभागाकडून देण्यात येणारा 10 आकडी अल्फान्युमरिक नंबर.. प्रत्येकासाठी हा नंबर वेगळा असतो. त्यामुळे आयकर विभागास नागरिकांनी केलेले सर्व व्यवहार ओळखता येतात.

पॅनकार्ड वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते, अन्यथा तुमची एखादी चूकही महागात पडू शकते. साधारणपणे नागरिकांकडून काय चूक होते, त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या..

काय चूक होते..?
बऱ्याचदा पॅन कार्डसाठी अर्ज करतो, पण तो वेळेवर न पोहोचल्यास आपण दुसऱ्यांदा अर्जही करतो. त्यातून काही वेळा दोन दोन कागदपत्रे येतात. आपण ती तशीच ठेवतो, पण असे करणे महागात पडू शकते. कारण, एकाच व्यक्तीने दोन पॅन कार्ड बाळगणे मोठा गुन्हा असून, त्यासाठी दंड होऊ शकतो.

दुसऱ्या पॅन कार्डचे काय करायचे..?
घरी दोन पॅन कार्ड आलेले असल्यास, त्यातील एक कार्ड सरेंडर करावे लागते. त्यासाठीची प्रक्रियाही सोपी आहे. त्यासाठी प्रथम प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन सामान्य फॉर्म डाऊनलोड करा. फॉर्म भरुन कोणत्याही ‘एनएसडीएल’ (NSDL) कार्यालयात सबमिट करा.

फॉर्म सबमिट करताना फॉर्मसह दुसरे पॅन कार्ड सबमिट करावे लागेल. तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेही करता येते..

हे विसरु नका..
– पॅन कार्डमधील 10 अंकी क्रमांक काळजीपूर्वक भरावा, तो पुन्हा तपासा..
– चुकीची माहिती भरल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो
– इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पॅन नंबर योग्यरित्या प्रविष्ट करा आणि पुन्हा तपासा

– चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीवर आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत आयकर विभाग दंड ठोठावू शकतो.
– दोन पॅन कार्ड ठेवल्यास १०००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो, बँक खाती गोठवली जाऊ शकतात. त्यासाठी एक कार्ड सरेंडर करणे आवश्यक आहे.

Leave a Comment

x