तुम्हाला तुमचा ब्लॉगर चा ब्लॉग वर्डप्रेस मध्ये ट्रान्सफर करायचा आहे का ? म्हणजेच how to transfer blogger to wordpress in marathi हे जाणून घ्यायचे आहे का ? . ब्लॉगर हे गुगल द्वारे डेव्हलप केले गेलेले एक उत्तम व मोफत ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे . इथे तुम्ही शून्य पैश्या मध्ये तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करू शकता. जर तुम्हाला ब्लॉगिंग शिकायची असेल किंवा तुम्ही एक नवीन ब्लॉगर आहात .
तर तुम्ही ब्लॉगर पासून एक सुंदर सुरवात करू शकता . पंरतु जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रात अनुभव घेता आणि जर तुम्ही खरंच ब्लॉगिंग ला सिरीयस घेत असाल . तर तुम्हाला नक्कीच तुमचा ब्लॉग हा वर्डप्रेस वर हलवणे गरजेचे आहे . ह्या पोस्ट मी तुम्हाला ब्लॉगर चा ब्लॉग वर्डप्रेस वर ट्रान्सफर कसा करावा म्हणजेच how to migrate blogger to wordpress in marathi हे सांगणार आहे . तर चला सुरू करूया…..
ब्लॉगर ब्लॉग वर्डप्रेस मध्ये का ट्रान्सफर करावा ? | blogger to wordpress migration in marathi
जसे मी तुम्हाला सुरवातीलाच सांगितले की ब्लॉगर हे गुगल द्वारा डेव्हलप केलेले एक उत्तम आणि प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे . इथे तुम्ही फक्त gmail अकाउंट च्या साहयाने तुमचा ब्लॉग सुरू करू शकता. परंतू जेव्हा तुम्ही ब्लॉगर वर ब्लॉग सुरू करता. तेव्हा तुम्ही तो ब्लॉग पूर्ण पणे कंट्रोल नाही करू शकत. आणि जर तुम्ही त्यांचा कोणता नियम मोडता तेव्हा ब्लॉगर तुमचा ब्लॉग गुगल वरून हटवू सुद्धा शकतो .
आणि ब्लॉगर मध्ये तुम्हाला खूप कमी फीचर मिळतात . परंतु ब्लॉगर च्या उलट . वर्डप्रेस हे एक प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे . आणि ह्या वर तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर संपूर्ण कंट्रोल मिळतो . आणि ह्या मध्ये थीम आणि प्लगइन हे खूप सारे आहेत. आणि प्लगइन मुळे तुम्ही तुमच्या ब्लॉग ला एक चांगला लूक देऊ शकता. व प्लगइन हे तुमच्या ब्लॉग साठी वेग वेगळ्या अँप्लिकेशन सारखे काम करते .
ब्लॉगर ब्लॉग वर्डप्रेस वर ट्रान्सफर कसे करावे ? | how to transfer blogger to wordpress in marathi
ब्लॉगर ब्लॉग वर्डप्रेस वर हलवणे काही कठीण काम नाही आहे . जर तुम्ही ही पोस्ट लास्ट पर्यंत अगदी नीट वाचलीत तर तुम्ही अगदी सहज पणे तुमचा ब्लॉगर ब्लॉग वर्डप्रेस वर ट्रान्सफर करू शकता.
आणि जर तुम्ही अजून पर्यंत वर्डप्रेस ब्लॉग सुरू केला नसेल तर तुम्ही आमची how to start blog in WordPress in marathi ही पोस्ट वाचू शकता.
1. ब्लॉगर ब्लॉग export करा | how to export blogger to wordpress in marathi
आपल्या ब्लॉगर ब्लॉग ला export करण्यासाठी सर्व प्रथम blogger. com मध्ये लॉगिन करा . व त्या नंतर settings -> manage blog मध्ये जावा . आणि back up content ह्या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप बॉक्स ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला डाऊनलोड या बटन वर क्लिक करायचे आहे.
2. ब्लॉगर फाईल वर्डप्रेस मध्ये इम्पोर्ट करा | how to import blogger to wordpress in marathi
एक्सपोर्ट फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्या फाईल ला तुमच्या वर्डप्रेस ब्लॉग मध्ये इम्पोर्ट करायचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या वर्डप्रेस ब्लॉग मध्ये लॉगिन करायची आहे व त्यानंतर tool -> import ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व येथे ब्लॉगर ऑप्शनच्या खाली install now या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे व यानंतर run importer या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे .
यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुम्ही आधी डाउनलोड केलेली फाईल इथे सिलेक्ट करायची आहे . फाइल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला upload file and import या बटन वर क्लिक करायचे आहे. फाईल इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल की तुम्हाला एक नवीन युजर बनवायचा आहे का ? किंवा तुम्हाला त्याच यूजर सोबत पुढे कन्टेन्ट import करायचा आहे का ? यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता.
3. वर्डप्रेस मध्ये permalink सेट अप करा
आता तुमचा सर्व कंटेंट हा वर्डप्रेस मध्ये इम्पोर्ट झालेला आहे. आता तुम्हाला permalink सेटप करायचे आहे. Permalink म्हणजे तुमच्या ब्लॉगचे पेज किंवा पोस्ट ची url . ब्लॉगर च्या url मध्ये महिना आणि नेम ह्या फॉरमॅट चा उपयोग केला जातो आणि तुम्हाला याच प्रकारे इथे सुद्धा सेटअप करायचा आहे. परंतु चिंतेचे कारण नाही कारण वर्डप्रेस मध्ये तुम्ही ब्लॉगरसारखा url सेटअप करू शकता. फक्त तुम्हाला settings -> permalink ऑप्शनवर क्लिक करायचे आहे व त्यानंतर महिना आणि नेम फॉरमॅट सिलेक्ट करायचा आहेत. ह्या साठी तुम्ही मी दिलेला फोटो बघू शकता. सेव केल्यानंतर तुम्हाला परत custom structure ला सेलेक्ट करायचे आहे व त्यामध्ये तुम्हाला url फॉरमॅट च्या शेवटला .html ऍड करायचे आहे.
4. ब्लॉगर पोस्ट ला redirect करा
वर्डप्रेस वर ब्लॉग ट्रान्सफर केल्या नंतर ब्लॉगर ब्लॉग साठी redirection सेट करणे गरजेचे आहे . ह्याने जर कोणी तुमच्या ब्लॉगर च्या ब्लॉग ला भेट देत असेल तर तो redirect होऊन तुमच्या वर्डप्रेस च्या नवीन ब्लॉग वर पोहचेल . ह्या साठी तुम्हाला plugins -> add new मध्ये जायचे आहे आणि तुम्हाला wp 404 auto redirect to similar post he प्लगइन इस्टॉल करायचे आहे.
व त्यानंतर ते प्लगइन activate करून त्याच्या सेटिंग मध्ये जायचे आहे. व ह्या मध्ये जी डिफॉल्ट सेटिंग आहे ती तशीच ठेवायची आहे. ह्या मध्ये तुम्हाला फक्त Taxonomies मध्ये जाऊन Disable Taxonomy Redirection च्या बॉक्स वर क्लिक करायचे आहे . व ह्या नंतर save settings वर क्लिक करायचे आहे. अश्या प्रकारे तुमच्या सगळ्या पोस्ट योग्य रित्या redirect झाल्या आहेत.
5. नवीन साइटमॅप सर्च कंसोल मध्ये सबमिट करा
ह्या साठी तुम्हाला गूगल सर्च कंसोल च्या dashboard मध्ये जायचे आहे. व तिथे साईट बार sitemaps चा ऑप्शन दिसेल आणि तुम्हाला तिथे फक्त url च्या लास्ट ला sitemap_index. xml हे जोडून सबमिट करायचे आहे .
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगर ब्लॉग वर्डप्रेस वर कसा ट्रान्सफर करावा म्हणजेच how to transfer blogger to wordpress in marathi हे शिकलो . जर तुम्ही आम्ही दिलेल्या सगळ्या स्टेप्स योग्य रित्या फोल्लो करता तर तुम्हाला ब्लॉगर ब्लॉग वर्डप्रेस मध्ये ट्रान्सफर करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही . व तुम्हाला ह्या पोस्ट आणि वेबसाईट बद्दल काही ही शंका असेल तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता. व how to migrate blogger to wordpress in marathi ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका…..