तुम्हाला खरंच जाणून घ्यायचे आहे की वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा ? how to start blog in wordpress in marathi म्हणजेच मग तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आले आहात . तुम्ही ब्लॉगिंग सुरू करण्याचा विचार केलात ही सर्वात मोठी गोष्ट आहे . आणि तुम्ही जर तुमच्या ब्लॉग ची सुरवात ही वर्डप्रेस पासून करत असाल तर तो एकदम योग्य निर्णय आहे .
ह्या साठीच आम्ही विचार केला की वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा ? how to start blog in wordpress in marathi ह्या वर ब्लॉग लिहणे खूप गरजेचे आहे . वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करणे खरोखर खूपच सोप्पे आहे . तर चला सुरू करूया …..
वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ?
वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करण्यासाठी मुख्य 3 गोष्टी गरजेच्या आहेत जसे की ….
- डोमेन नेम
- वेब होस्टिंग
- हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचणे
हो तुम्ही वाचण्यात काही चूक केली नाही . हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचणे सुद्धा खूपच गरजेचे आहे तेव्हाच खूप योग्य प्रकारे वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरू करू शकाल . शक्यतो नवीन ब्लॉगर सर्वात मोठी चुकी करतात ती म्हणजे ब्लॉगिंग मध्ये प्लॅटफॉर्म निवडण्यात जर तुम्हाला योग्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कसं निवडावा हे जाणून घ्यायचे असेल तर त्या साठी तुम्ही आमची Blogger Vs WordPress In Marathi ही पोस्ट वाचू शकता .
जर तुम्ही पोस्ट वाचत असाल तर मला असे वाटते की तुम्ही तुमचे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडले असावे . तुम्हाला वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करण्यासाठी फक्त डोमेन नेम आणि वेब होस्टिंग ची गरज आहे . तर मी असे समजतो की तुम्ही डोमेन नेम आणि वेब होस्टिंग विकत घेतले असेल . आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल की बेस्ट डोमेन नेम आणि बेस्ट वेब होस्टिंग कोठून घ्यावी तर त्या साठी ही आम्ही लवकरच पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करू . तर चला तुम्हाला आता तुमच्या वेब होस्टिंग मध्ये वर्डप्रेस इंस्टॉल करायचे आहे .
4 स्टेप मध्ये वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा ? | How To Start Blog In WordPress In Marathi
स्टेप 1 – वर्डप्रेस इंस्टॉल करणे
जेव्हा तुम्ही होस्टिंग विकत घेत तेव्हा त्यांच्या पॅनल मध्ये तुम्हाला वर्डप्रेस इंस्टॉल करण्याचा ऑप्शन दिलेला असतो . व त्यानंतर योग्य ती माहिती भरून तुम्ही तुमच्या वेब होस्टिंग मध्ये वर्डप्रेस इंस्टॉल करू शकता . तुम्ही त्या नंतर तुमच्या पॅनल मधून किंवा ब्राऊजर मध्ये तुमच्या साइट च्या लिंक च्या समोर ” /wp-admin/ ” हे लिहून सुद्धा वर्डप्रेस मध्ये लॉगिन करू शकता . एकदा जर तुमचे वर्डप्रेस इंस्टॉल झाले त्या नंतर तुम्हाला तुमची वेबसाइट किंवा ब्लॉग कस्टमाइज करायचा आहे . तर चला ते जाणून घेऊया .
स्टेप 2 – वर्डप्रेस थीम निवडणे
जेव्हा तुम्ही वर्डप्रेस इंस्टॉल करता त्या नंतर त्या मध्ये बेसिक थीम ही आधीच इंस्टॉल झालेली असते . परंतु थीम साठी वर्डप्रेस मध्ये भरपूर पर्याय आहेत . त्या साठी तुम्हाला Appearance -> Themes -> Add New वर click करायचे आहे . त्या नंतर तुम्ही तिथे सर्च करून तुम्ही तुम्हाला हवी ती थीम इंस्टॉल करू शकता .
स्टेप 3 – वर्डप्रेस पहिली ब्लॉग पोस्ट लिहणे
ब्लॉग पोस्ट लिहण्यासाठी तुम्हाला Posts -> Add New वर क्लिक करायचे आहे . तिथल्या वर्डप्रेस ब्लॉक एडिटर मध्ये तुम्ही सहज तुमची पहिली पोस्ट लिहायला सुरवात करू शकता . एकदा का तुमची पोस्ट लिहून झाली तर वरती उजव्या साइड ला पब्लिश बटन वर क्लिक करून तुम्ही ती पोस्ट पब्लिश करू शकता . वर्डप्रेस ब्लॉक एडिटर मध्ये तुम्हाला अनेक वेगळे सेक्शन सुद्धा दिसून आले असतील जसे की categories,tags,featured images इत्यादि . आम्ही लवकरच तुमच्या साठी वर्डप्रेस ब्लॉक एडिटर कसे वापरावे ह्या साठी वेगळी पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करू .
स्टेप 4 – वर्डप्रेस प्लगइन इंस्टॉल करणे
वर्डप्रेस प्लगइन म्हणजे तुम्ही एक प्रकारे अॅप्लिकेशन म्हणू शकता . ह्याच्या मदतीने तुम्ही खूप वेगवेगळे फीचर चा आस्वाद घेऊ शकता . ते ही कोणत्या ही प्रकारची कोडिंग न करता . वर्डप्रेस मध्ये 50,000 हून जास्त प्लगइन उपलब्ध आहेत . प्लगइन इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला Plugins -> Add New क्लिक करायचे आहे . नक्की आम्ही तुमच्या साठी नवनवीन उपयोगी प्लगइन ची लिस्ट व त्याच्या माहिती साठी पोस्ट लिहू .
अश्या प्रकारे तुम्ही तुमचा ब्लॉग वर्डप्रेस मध्ये सुरू करू शकता . लवकरच आम्ही तुमच्या साठी वर्डप्रेस साठी बेसिक सेटिंग ची एक पोस्ट लिहणार आहोत त्याच्या मदतीने तुम्ही वर्डप्रेस इंस्टॉल केल्या नंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या गरजेच्या सेटिंग करायचे आहे हे त्या पोस्ट मधून तुम्हाला समझेल .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा ? how to start blog in wordpress in marathi हे जाणून घेतले व वर्डप्रेस मध्ये ब्लॉग सुरू कसा करावा ही माहिती आम्ही फक्त तुम्हाला 4 स्टेप समजावून सांगितले आहे . ह्या पोस्ट बद्दल किवहा वेबसाइट बद्दल तुम्हाला कोणत्या प्रकारच्या शंका असतील तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……