नमस्कार मित्रांनो प्रत्येक ब्लॉगरची एक इच्छा असते की त्यांच्या वेबसाईटवर खूप सारं ट्रॅफिक यायला हवं . मला माहिती आहे तुम्हालाही तुमच्या ब्लॉग वर भरपूर ट्रॅफिक हवे आहे .कारण ट्रॅफिक शिवाय तुमची कमाई सुरू होणार नाही . सुरुवातीच्या दिवसात एक चांगला ब्लॉगर कितीही चांगले आर्टिकल लिहिले तरी सुद्धा त्याचं ट्राफिक काही वाढत नाही . त्यासाठी आजच्या पोस्टमध्ये आपण ब्लॉग वर ट्रॅफिक कसे वाढवावे म्हणजेच How to increase traffic on blog in marathi याबद्दल चर्चा करणार आहोत .
जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगला प्रसिद्ध करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा ब्लॉग गुगलमध्ये रँक करायचा असेल तर त्यासाठी ट्राफिक खूप गरजेचा आहे . म्हणूनच आपण ट्रॅफिक कसे वाढवावे या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत . सर्व प्रथम ट्रॅफिक वाढल्याने तुमचा ब्लॉग प्रसिद्ध होतो व प्रसिद्ध झाल्याने तुमच्या ब्लॉगवर अजून ट्रॅफिक सुद्धा येते व त्यामुळेच तुम्हाला जाहिरातीमधून चांगली कमाई सुद्धा होते . म्हणूनच आजच्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉग वर ट्रॅफिक कसे वाढवावे म्हणजेच How to increase traffic on blog in marathi याबद्दल जाणून घेणार आहोत तर त्याला सुरू करूया…
ब्लॉग वर ट्रॅफिक वाढवण्याचे 6 मार्ग | 6 Ways To Increase Traffic On Blog In Marathi
जर तुमचा स्वतःचा ब्लॉग असेल तर तुम्ही त्यावर आर्टिकल लिहीत असाल तर ते आर्टिकल गुगल वर प्रेम करणे खूप गरजेचे आहे परंतु पोस्ट गूगल मध्ये काम करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे नवीन लोकांना सहसा माहीत असते व त्यामुळेच ते ब्लॉगवर ट्राफिक नाही आणू शकत पण जर तुमचा पण स्वतःचा ब्लॉग आहे व त्यावर तुम्हाला ट्रॅफिक आणायची आहे तर खाली दिलेल्या मुद्द्यानुसार तुमच्या ब्लॉग मध्ये बदल करा यामुळे नक्कीच तुमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध होईल अशी मला आशा आहे जर तुम्हाला ऑरगॅनिक ट्राफिक हवे असेल तर मी ज्या प्रमाणे खालील मुद्दे स्पष्ट केले आहेत त्यानुसार आपल्या ब्लॉगवर काम करा तर चला मुद्दे पाहू या….
1. उत्तम कन्टेन्ट | Quality Content
ब्लॉग वर ट्राफिक वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा कन्टेन्ट . व हा कन्टेन्ट उत्तमच असायला हवा. एक वेळ तुमच्या ब्लॉगवर कमी पोस्ट असतील तरी चालेल परंतु त्या पोस्ट उत्तम असायला हव्यात . उत्तम याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर सजावट करायची आहे. तर उत्तम कन्टेन्ट चा अर्थ म्हणजे तुमच्या पोस्ट मधून तुमच्या वाचकांना योग्य ती माहिती मिळायला हवी .असं नाही की काहीही लिहिले आणि पोस्ट पब्लिश केली.
जर तुम्हाला उत्तम कन्टेन्ट कसा लिहायचा ? हे माहीत नसेल तर मी त्यासाठी एक वेगळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत त्यामध्ये मी तुम्हाला उत्तम कन्टेन्ट सुरुवातीपासून कसा लिहायचा हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीन. परंतु उत्तम पोस्ट लिहिण्यासाठी एक गोष्ट आणखी गरजेची आहे ती म्हणजे प्रॅक्टिस . जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तसे तसे तुमच्या लिखाणात बदल होतील . व तुमचा कंटेंट हा उत्तम होईल . जर तुमच्या पोस्टमध्ये वाचकाला योग्य ती माहिती मिळणार नसेल तर तुमचा वाचक तुमच्या वेबसाईटवर परत कधीच येणार नाही त्यामुळे वेबसाईटचा कंटेंट हा उत्तमच हवा.
2. SEO फ्रेंडली ब्लॉग | SEO Friendly Blog
तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर ऑरगॅनिक ट्रॅफिक आणण्यासाठी ब्लॉग सर्च इंजिनमध्ये रँक होणे गरजेचे आहे . व गुगलमध्ये रँक करण्यासाठी तुमचा ब्लॉग हा SEO फ्रेंडली असायला हवा . तुम्हाला माहित नसेल कि SEO फ्रेंडली ब्लॉग कसा लिहावा ? तर त्यासाठी मी एक वेगळी पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत SEO फ्रेंडली ब्लॉग कसा लिहावा ? हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याच्यामध्ये मदतीने तुम्ही सहज SEO फ्रेंडली ब्लॉग बनवू शकता व तुमचा ब्लॉग गुगलमध्ये रँक करू शकता.
3. कमी कॉम्पिटेशन वाले कीवर्ड शोधा – Low Competition Keyoword
ब्लॉगिंग मध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे कीवर्ड रिसर्च . मागील पोस्ट मध्ये आपण जाणून घेतले किंवा कीवर्ड रिसर्च म्हणजे काय ? जर तुम्ही टॉपिक निवडला व त्यावर आर्टिकल लिहिले पण त्यामध्ये कमी कॉम्पिटिशन कीवर्ड तुम्ही लिहिले नाहीत . तर ती पोस्ट गुगलमध्ये कधीच रँक होणार नाही. त्यामुळे पोस्टसाठी कमी कॉम्पिटिशन वाले किवर्ड निवडणे ही सुद्धा एक कला आहे . जर तुम्ही जास्त कॉम्पिटिशन वाले कीवर्ड वर काम करत असाल तर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. कमी कॉम्पिटिशन वाले कीवर्ड कसे निवडावे ? यासाठी मी एक वेगळी पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न करेन/ त्यामध्ये कमी कॉम्पिटिशन वाले कीवर्ड कसे निवडावे ? हे स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करेन.
4. सोशल मीडियावर प्रमोशन करणे | Social Media Promotion
तुम्हाला तर माहितीच असेल आपण आपल्या दिवसातील किती वेळ सोशल मीडियावर घालतवत असतो . त्यामुळे आपल्याला जर कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन करायचा असेल तर सोशल मीडिया सारखा आणखी कोणताही पर्याय नाही . आपल्या आजूबाजूला असणारी लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात . त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पोस्ट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, लिंकडीन, इंस्टाग्राम ,ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर शेअर केल्या तर तुम्हाला अधिक ट्रॅफिक सहज मिळू शकते . जर तुम्ही तुमच्या पोस्ट व्हाट्सअप वरील ग्रुप मध्ये शेयर केल्या तर तुम्हाला नक्कीच अधिक ट्रॅफिक मिळू शकते. तुम्ही या सगळ्या सोशल मीडियावर स्वतःचे वेगळे ग्रुप बनवून रोज त्या ग्रुप वर तुमच्या पोस्ट शेअर करू शकता . याने तुमची वेबसाइट प्रसिद्ध होण्यास हि मदत होईल.
5. पोस्टमध्ये इंटर लिंकिंग करणे | Post Internal Linking
जेव्हा तुम्ही कोणतीही पोस्ट पब्लिश करता. तर त्यामध्ये तुमच्या जुन्या पोस्ट इंटरलींक करायला विसरू नका . ह्यामुळे काय होईल जर तुमचा वाचक ती पोस्ट वाचत असेल. व त्याला जर आणखी पोस्ट वाचायचे असतील . तर तो त्या लिंक द्वारे दुसरे आर्टिकल सुद्धा वाचू शकतो . त्यामुळे तुमचा वाचक तुमच्या वेबसाईटवर जास्त टाईम घालवेल . व यामुळे तुमचा बाउन्स रेट सुद्धा कमी होऊ शकतो . हा एक उत्तम उपाय आहे ज्याने तुमचा वाचक तुमच्या वेबसाईट बांधला जाईल . व यामुळे गुगल ला असे वाटेल की तुम्ही खूप चांगले कन्टेन्ट लिहित असाल व वाचकाच्या अशा टाईम घालवण्याने गुगल तुमची पोस्ट गुगलमध्ये आणखी रँक करू शकतो.
6. नियमित पोस्ट पब्लिश करणे | Publish Post Regular
तुम्ही जर रोज एक पोस्ट लिहित असाल किंवा एक दिवसाआड एक लिहीत असाल . तर त्याच प्रमाणे नियमित पोस्ट लिहा . व त्यासाठी टाईमी टेबल सुद्धा बनवा . जर तुम्ही आज एक पोस्ट टाकली व त्यानंतर एक महिन्यानंतर अजून एक पोस्ट टाकली . तर गुगल ला असे वाटेल की तुम्ही तुमच्या ब्लॉग बाबत सिरीयस नाही आहात . त्यामुळे गुगल तुमची रँकिंग सुद्धा कमी करेल . त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार टाइम टेबल बनवा व त्यानुसारच नियमित पोस्ट पब्लिश करा. पोस्ट पब्लिश करताना क्वालिटी सोबत अजिबात छेडछाड करू नका. दिवसातून एकच आर्टिकल टाका पण ते उत्तम टाका . यामुळे तुम्ही गुगलमध्ये रँक तर व्हालच . पण तुमचा वाचक हि तुमच्याशी बांधला जाईल व तोच वाचक तुम्हाला आणखी दुसरे वाचक आणून देईल.
ब्लॉगींग आत्ताच्या काळात पैसे कमवायचा एक उत्तम स्त्रोत आहे . जर तुम्ही थोडी फार मेहनत केली . म्हणजेच चांगले आर्टिकल लिहिले व किंवा टेक्निकल गोष्टींबाबत अपडेट राहिलात तर ब्लॉगिंग मधून पैसे कमावणे कठीण काम नाही आहे .
निष्कर्ष ( conclusion )
या पोस्ट मध्ये आज आपण ब्लॉग वर ट्रॅफिक कसे वाढवावे ? म्हणजेच How to increase traffic on blog in marathi याबद्दल चर्चा केली त्यासाठी मी तुम्हाला ६ मुद्दे स्पष्टपणे सांगितले . जर तुम्ही त्या मुद्यांप्रमाणे तुमच्या ब्लॉग वर काम केले तर नक्कीच तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक वाढेल , जर तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका…..