नमस्कार मित्रांनो ब्लॉगींग बद्दलच्या नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्लॉग ची लोडिंग स्पीड कशी वाढवायची म्हणजेच How To Increase Loading Speed Of Blog In Marathi याबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो आपण अनेक स्वप्न पाहून ब्लॉगिंग ची सुरुवात करतो. दिवस-रात्र एक करून आपण ब्लॉगमध्ये मेहनत घेत असतो व ब्लॉग कसा सुंदर दिसेल यासाठी आपण खूप सारे प्रयत्न सुद्धा करतो . परंतु तीन-चार महिन्यानंतर तुम्हाला असे लक्षात येते की तुमच्या ब्लॉग ची स्पीड ही अत्यंत कमी झाली आहे. म्हणजेच तुमची ब्लॉग स्पीड ही खूप स्लो झाली आहे.
तुम्हाला समजत नाही की ब्लॉग ची स्पीड कशी कमी झाली . ब्लॉग ची स्पीड कमी झाल्यामुळे आपल्या वेबसाईटवर अनेक छोटे-मोठे परिणाम होतात / गुगलच्या नुसार 2021 मध्ये तुमच्या ब्लॉग ची स्पीड रॅंकिंग साठी एक महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे . त्यामुळे जर तुमच्या वेबसाईट ची म्हणजेच ब्लॉगची स्पीड ही स्लो असेल तर तुमची वेबसाईट ही गुगल मध्ये कधीच रॅंक होणार नाही म्हणजेच तुम्ही ब्लॉगिंग मधून कधीच पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे आज आपण ब्लॉग ची स्पीड कशी वाढवावी म्हणजेच How To Increase Loading Speed Of Blog In Marathi याबद्दल माहिती घेणार आहोत . तर चला सुरु करूया..
How To Increase Loading Speed Of Blog In Marathi | ब्लॉग चा लोडिंग स्पीड वाढवण्यासाठी 11 टिप्स
ब्लॉग ची लोडिंग स्पीड स्लो का होते ?
मित्रांनो वेबसाईट ची स्पीड स्लो होण्याचे खूप सारे कारणे आहेत . मी आज तुम्हाला त्यातली काही प्रमुख कारणे सांगणार आहेत . सर्वात पहिला कारण म्हणजे वेबसाईट मध्ये वापरले जाणारे फोटोज हे ऑपटीमाईज केलेले नाही व त्याची साईज खूप जास्त आहे . जेव्हा तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये जास्त साईजचे फोटो लोड करतात तेव्हा तुमच्या वेबसाईटची स्पीड ही कमी होते व याच प्रकारे तुम्ही जर व्हिडिओज सुद्धा तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये ऍड केले तर यामुळे सुद्धा तुमच्या वेबसाईटची स्पीड कमी होते . व तुम्ही जर शेअर होस्टिंग वापरत असाल व गरज नसलेल्या css आणि js फाईल तुमच्या कोड मध्ये असतील तर त्यामुळे सुद्धा तुमच्या वेबसाईट ची स्पीड कमी होऊ शकते. तुम्ही जर तुमच्या वेबसाइटमध्ये थर्ड पार्टी कोड चा वापर केला तर यामुळे सुद्धा तुमच्या ब्लॉगची स्पीड कमी होऊ शकतो.
ब्लॉग ची लोडींग स्पीड कशी चेक करावी ?
मित्रांनो ,ब्लॉगची लोडींग स्पीड वाढवण्याआधी आपण त्याची स्पीड किती आहे हे चेक करूया . वेबसाइटची लोडींग स्पीड चेक करण्यासाठी आपण तीन टूलचा वापर करू शकतो त्यामध्ये पहिला टूल आहे पेज page speed insight. दुसरा टूल आहे GT Matrix व तिसरे टुल आहे google search console या माध्यमातून तुम्ही तुमच्या वेबसाईट ची स्पीड जाणून घेऊ शकता व त्यानुसार तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये बदल करू शकता.
ब्लॉग चा स्पीड वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेच्या आहेत ?
मित्रांनो ब्लॉग चा स्पीड वाढवण्या अगोदर तुम्हाला दोन गोष्टी करणे अत्यंत गरजेच्या आहेत पहिली गोष्ट आहे. तुमच्या ब्लॉग ची स्पीड काय आहे हे जाणून घ्या हे तुम्ही वरील दिलेल्या तीन टुलच्या माध्यमातून चेक करू शकता . व दुसरी गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा बॅकअप घ्यायचा आहे . कारण स्पीड वाढवत असताना तुमच्या वेबसाईट मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही बॅकअप च्या साहयने तुमची वेबसाइट परत पहिल्या सारखी करू शकता .
ब्लॉकचा लोडींग स्पीड कशी वाढवावी ? | How To Increase Loading Speed Of Blog In Marathi
ह्या मध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे . त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगचा लोडींग स्पीड अगदी सहज वाढवू शकता . तर चला त्या बद्दल जाणून घेऊया ..
1. PHP वर्जन अपडेट करा
जर तुम्ही ब्लॉगिंगसाठी वर्डप्रेस वापर करत असाल तर PHP नेहमी अपडेट करत रहा . जेव्हा तुम्ही PHP चे लेटेस्ट वर्जन वापरता तेव्हा तुमच्या वेबसाईट च्या स्पीड मध्ये तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल.
2. cache प्लग-इन चा वापर करा
जेव्हा तुम्ही ब्लॉगिंगसाठी वर्डप्रेस वापर करता तेव्हा वर्डप्रेस मध्ये खूप सारे मोफत त्याचे पलकिन उपलब्ध आहेत त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट चा स्पीड नक्कीच वाढू शकतात ब्लॉगर मध्ये अशा काही सोयीसुविधा तुम्हाला मिळत नाही त्यामुळे ब्लॉगर कुठेतरी याबाबतीत कमी पडतो
3. जास्त जाहिरातीचा वापर करू नका
जर तुमच्या वेबसाईट वर जाहिरातीचा लोड जास्त असेल . तर तुमच्या वेबसाईट चा स्पीड हा नक्कीच कमी होणार . त्यामुळे वेबसाईटचा स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही जाहिरातीचा लोड थोड्या प्रमाणात कमी करू शकता.
4. होम पेज वर पोस्टची संख्या कमी ठेवा
जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे होमपेज हे सुंदर व सुटसुटीत ठेवायचे असेल तर होम पेजवर ब्लॉग पोस्टची संख्या कमी ठेवा . याने तुमच्या होम पेज वर लोड येणार नाही व तुमची होम पेज सुद्धा छान दिसेल.
5. वापरात नसलेले Javascript काढून टाका
मित्रांनो तुम्हाला page speed insight मध्ये तुमच्या वेबसाईटला स्कॅन करायचे आहे . त्यानंतर रिपोर्टच्या मध्ये तुम्हाला वापरात नसलेल्या Javascript ची एक लिस्ट बनवायची आहे व त्यानुसार वेबसाईटमध्ये असलेले गरजेच्या नसलेल्या Javascript काढून टाकायचे आहेत.
6. वेब होस्टिंग
सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही वेब होस्टिंग. हे एक असे माध्यम आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची वेबसाइट ची स्पीड वाढून सुद्धा शकता किंवा कमी सुद्धा करू शकता . जर तुम्ही पैसे वाचवण्याच्या नादात स्वस्त होस्टिंग विकत घेतली असेल तर तुमचा परफॉर्मन्स हा कमीच असणार व जर तुम्ही शेअर होस्टिंग वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या वेबसाईटचा server response time increase होत असतो . त्यामुळे तुम्ही तुमच्या वेबसाईट ला चांगल्याप्रकारे optimize नाही करू शकत व तुमच्या वेबसाईट ची स्पीड ही स्लो च राहणार. त्यामुळे होस्टिंग विकत घेताना चांगल्या प्रकारे विचार करूनच घ्यावी.
7. लाइट weight थीम
थीम तुमच्या ब्लॉगमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे जर तुमची थीम ही लाइट weight असेल. तर तुम्ही तुमच्या वेबसाईटचा स्पीड सहज वाढवू शकता. थीम जेवढी लाइट weight असणार तेवढी तुमच्या वेबसाईट चा स्पीड अधिक असणार . त्यामुळे थीम निवडताना ती लाइट weight आहे की नाही हे नक्की तपासून पहा.
8. इमेज optimization
मित्रांनो वेबसाईट स्लो होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही वेबसाइटमध्ये वापरलेले फोटोज. जर तुम्ही वेबसाईट मध्ये वापरलेले फोटो हे heavy व जास्त साईज वाली असतील तर तुमच्या वेबसाईट ला स्लो करण्याचे काम तुमचे हे इमेज करत असते. त्यामुळे ब्लॉग पोस्ट मध्ये इमेज वापरताना त्या compress करून वापरा व तुम्ही वापरलेले इमेज हे मॉडर्न फॉरमॅटमध्ये असतील तर ते लवकर लोड सुद्धा होतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये webp इमेजेस चा वापर करू शकता.
9.CDN चा वापर करा
मित्रांनो स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क चा उपयोग करू शकता. CDN तुमच्या वेबसाईटची कॉपी तुमच्या जवळ असणाऱ्या सर्वर मध्ये सेव करते . यामुळे कोणी ही यूजर तुमच्या वेबसाईटवर येतो तेव्हा त्याला रिझल्ट त्याच्या जवळील सर्वर मधून येतो. त्यामुळे रिक्वेस्ट लवकर जाण्यास मदत होते व तुमच्या वेबसाईट ची स्पीड वाढते
10. जास्तीचे प्लगइन काढून टाका
जर तुम्ही ब्लॉगिंगसाठी वर्डप्रेस चा वापर करत असाल तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच खूप सारे प्लग-इन इन्स्टॉल केले असतील व त्यामुळे तुमच्या वेबसाईट ची स्पीड ही स्लो झाली असेल . त्यामुळे गरजेचे असणारे प्लग-इनच ठेवा व बाकीचे प्लग-इन हे काढून टाका यामुळे तुमच्या वेबसाईट चा स्पीड वाढवण्यास नक्कीच मदत होईल.
11. HTML , CSS, JS फाईलला मिनीफाय करा
तुमचा थीम मध्ये जे HTML , CSS, JS फाईल आहेत . त्यामुळे तुमची वेबसाईट ही स्लो होते त्यामुळे HTML , CSS, JS च्या फाईल मिनीफाय करण्यासाठी तुम्ही वर्डप्रेस प्लग-इन चा वापर करू शकता यांनी तुमच्या वेबसाईटचा स्पीड नक्कीच वाढेल.
निष्कर्ष ( Conclusion )
मित्रांनो मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल . या पोस्टमध्ये आपण ब्लॉगची स्पीड कशी वाढवावी ? म्हणजेच How To Increase Loading Speed Of Blog In Marathi याबद्दल माहिती जाणून घेतली वरील दिलेल्या टिप्स नुसार तुम्ही जर तुमच्या ब्लॉग मध्ये बदल केले . तर तुमच्या वेबसाईट ची स्पीड ही नक्कीच वाढेल. तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल काही प्रॉब्लेम असतील . तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..