नमस्कार मित्रांनो . ब्लॉगिंग सुरु केल्या पासून तुमच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले असतील . जसे कि ब्लॉगिंग पासून पैसे कमवू शकतो का ? ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे कोणते मार्ग आहेत ? म्हणजेच how to earn money from blog in marathi किती पैसे कमवू शकतो ? असे खूप सारे … पण जर तुमच्या मनात हि हेच प्रश्न येत आहेत . तर तुम्ही एक योग्य ठिकाणी आले आहात . मी तुम्हाला आज खूप सारे मार्ग सांगणार आहे ज्याने तुम्ही ब्लॉगिंग मधून तुमची कामे सुरु करू शकता . जर तुम्ही आमच्या वेबसाईट वर पहिल्यांदा भेट देत असाल तर तुम्ही आमच्या दुसऱ्या ब्लॉगिंग संबंधित पोस्ट सुद्धा वाचू शकता .
काही वर्षांपूर्वी ब्लॉगिंग हे नाव कोणाला माहित सुद्धा नव्हते . आणि ज्यांना माहित होते किंवा जे प्रत्यक्ष ब्लॉगिंग करत होते ते जाहिरात सोडल तरी बाकी कोणते मार्ग त्यांना माहित सुद्धा नव्हते . परंतु काळानुसार ब्लॉगिंग ची व्याख्या बदलत चालली आहे . ब्लॉगिंग ला आता व्यवसायाचे स्वरूप आले आहे . आताच्या काळात ब्लॉगिंग एक जास्त कमाई करणारा व्यवसाय बनला आहे . त्यामुळे काळानुसार आपल्याला सुद्धा बदलावे लागेल . तर विविध मार्ग बघण्याअगोदर आपण ब्लॉगिंग मधून तुम्ही किती पैसे कमवू शकता हे जाणून घेऊया .
ब्लॉगिंग मधून किती पैसे आपण कमवू शकतो ? | how to earn money from blog in marathi
माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या संपर्कात असणारे काही मोठे ब्लॉगर आहेत जे ४ ते ५ वर्ष ब्लॉगिंग फिल्ड मध्ये काम करत आहेत व त्यांची आताची महिन्याची कमाई हि ५ – १५ लाख आहे . व तेही फक्त ४ ते ५ वर्षात . त्यामुळे ब्लॉगिंग मुळे तुम्ही सहज लाखात कमाई करू शकता . परंतु तुमची कमाई हि खूप साऱ्या गोष्टींवर अवलंबून असते जसे कि तुमचा ब्लॉगिंग विषय कोणता आहे ? , तुम्ही ब्लॉगिंग स्किल शिकण्यासाठी किती वेळ देता ? तुमच्या ब्लॉग वर किती वाचक येतात ? अश्या अनेक गोष्टींवर तुमची कमाई हि अवलंबून असते . व ह्यांसोबत हि अनेक गोष्टी आहेत जसे कि तुमची ध्येय , तुमची प्रेरणा , कामाप्रती असलेली निष्ठा . व ह्याच बरोबर तुमचा ब्लॉगिंग चा विषय हा कमाई मधील महत्वाचा भाग आहे .
ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे 8 मार्ग | How To Earn Money From Blog In Marathi
ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत . परंतु हे सगळेच मार्ग तुमच्या ब्लॉग शी लागू होतील असे हि नाही . तुम्ही ह्यातील तुमच्या ब्लॉग ला जे मार्ग बरोबर वाटत असतील . तर त्या मार्गांबद्दल अधिक माहिती घेऊन तुम्ही त्यामधुन तुमची कमाई सुरु शकता .
1. जाहिरात प्लॅटफॉर्म | Advertisement Network
तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या कमाई साठी जाहिरात नेटवर्क ची मदत घेऊ शकता . ह्या मध्ये ऍडसेन्स व मीडिया.नेट ह्या दोन प्रसिद्ध जाहिरात प्लॅटफॉर्म आहे . परंतु ह्या जाहिरात नेटवर्क ची जाहिरात तुमच्या ब्लॉग वर लावण्यासाठी तुम्हाला ह्यांचे अप्रूव्हल मिळणे गरजेचे आहे . व ह्या मध्ये ऑटो जाहिरात चा ऑप्शन आहे . जो तुमच्या ब्लॉग मधील कन्टेन्ट च्या संबंधित जाहिरात दाखवतो . त्यामुळे तुमच्या वाचकाला हि ह्याचा त्रास होत नाही . जर तुम्हाला १०० पेक्षा जास्त ट्रॅफिक तुमच्या ब्लॉग वर रोज येत असेल तर ह्या जाहिरात नेटवर्कच अप्रूव्हल घेण्यात काहीच प्रॉब्लेम नाही . परंतु ह्या जाहिरात नेटवर्क ला अर्ज करण्याअगोदर त्यांच्या नियम व अटी काळजी पूर्वक वाचा .
2. डायरेक्ट जाहिरात | Direct Advertisement
तुम्हाला तर माहीतच असेल आपल्या सारखे खूप सारे अजून हि ब्लॉगर आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना आपल्याला व्यवसायाची किंवा ब्लॉग ची मार्केटींग करायची असते . त्यासाठी ते आपल्याला सारख्या नव्या किंवा प्रसिद्ध ब्लॉगर शी संपर्क साधून डायरेक्ट जाहिरात साठी विचारणा करतात . तुम्हाला ते त्यांचे बॅनर तुमच्या ब्लॉग वर लावायला देतील व महिन्याकाठी तुमच्यात जो व्यवहार झालाय त्यानुसार ते तुम्हाला पैसे देतील . ह्या डायरेक्ट जाहिरात मधून हि तुम्ही चांगली कमाई करू शकता .
3. अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing
अफिलिएट मार्केटिंग हा सर्वोत्तम कमाई चा मार्ग आहे . कारण जर तुम्ही जातात च्या एक क्लिक ची आणि अफिलिएट च्या एक विक्री ची तुलना केलीत तर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग चे महत्व समझेल . आजच्या काळात बहुतेक ब्लॉगर ह्या मार्गातून कमाई करत आहेत . अफिलिएट मार्केटिंग साठी सुद्धा खूप सारे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहेत . त्यासाठी मी एक वेगळा ब्लॉग लिहण्याचा प्रयत्न नक्की करेन . अफिलिएट मार्केटिंग चा फायदा म्हणजे ह्या साठी तुमची वेबसाईट असायलाच हवी असे काही नाही . तुम्ही सोशियल मीडिया च्या माध्यमातून हि पैसे कमवू शकता . अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट ची लिंक तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये टाकायची असते व जर कोणी त्या लिंक वर क्लिक करून ते प्रॉडक्ट खरेदी केले तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात .
4. स्पॉन्सर पोस्ट | Sponsored Post
स्पॉन्सर पोस्ट हे एक असे माध्यम आहे . जे तुमच्या ब्लॉगिंग कमाई मध्ये भर टाकते. तुम्ही एक पोस्ट तुमच्या वेबसाईट वर शेअर करुन तुम्ही दहा डॉलरपेक्षा अधिक पैसे कमवू शकता . जर तुमची वेबसाईट ही अधिक प्रसिद्ध असेल. तर तुम्ही 100 डॉलर ते हजार डॉलर प्रत्येक पोस्ट साठी आकारू शकता. जेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता किंवा तुमच्या वेबसाईटवर भरभरून ट्रॅफिक येते. तेव्हा तुम्हाला स्पॉन्सर पोस्टचे मेल नक्की येतील. यामध्ये तुम्हाला समोरचा माणूस पोस्टसाठी अमुक-अमुक व्यवहार करेल व तुम्ही ती पोस्ट तुमच्या वेबसाईटवर शेअर केल्यानंतर तो माणूस तुम्हाला त्या पोस्ट साठी पैसे देईल याला स्पॉन्सर पोस्ट असे म्हणतात.
5. ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री | Sell Online Product
तुम्ही जर मोठमोठ्या प्रसिद्ध ब्लॉगर ना फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की ते ब्लॉगर त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट त्यांच्या वेबसाईट किंवा ब्लॉग वरून त्याची विक्री करत आहेत . जर तुम्ही तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग संबंधित काही कोर्स किंवा ई-बुक बनवले तर तुम्ही प्रत्येक कोर्स किंवा ही ई -बुक साठी अमुक-अमुक पैसे आकारून त्या प्रॉडक्टची विक्री तुम्ही तुमच्या ब्लॉग वरुन करू शकता . जर तुमचा प्रेक्षकवर्ग हा अधिक असेल तर तुम्ही ह्या प्रकारच्या मार्गा मधून चांगले पैसे कमवू शकता.
6. ऑनलाईन कोर्स | Online Course
जर तुमच्याकडे कोणते वेगळे स्किल असेल व तुम्ही ते ब्लॉगच्या माध्यमातून लोकांना शिकवत असाल . तर तुम्ही तुमचा स्वतःचा प्रीमियम असा कोर्स बनवून तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईट च्या माध्यमातून त्या कोर्सची विक्री करू शकता . हा एक उत्तम कमाई मार्ग आहे . जर तुमचा चाहतावर्ग मोठा असेल व तुमच्याकडे काही वेगळे स्किल असेल जे दुसऱ्यांना म्हणजे तुमच्या वाचकांना शिकायचे असेल . तर तुम्ही त्यांच्यासाठी असे कोर्स बनवून त्याची विक्री करू शकता.
7. ब्लॉग संबंधित सर्व्हिस | Service
तुमच्या स्किल च्या बेस वर तुम्ही तुमच्या वाचकांना अनेक प्रकारच्या सर्व्हिस देऊ शकता . जर तुम्हाला SEO बद्दल चांगले ज्ञान असेल किंवा तुम्ही वेबसाईट डेव्हलपर असाल तर तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्या वाचकांना अश्या सर्व्हिस देऊ शकता . मी सुद्धा कॉम्पुटर सायन्स चा स्टुडंट असल्या मला वेब डेव्हलपिंग येते त्यामुळे मला ब्लॉगिंग ,मधून कामे होण्याच्या अगोदर मी माझ्या वेबसाईट च्या वाचकांना बॅनर च्या माध्यमातून वेबसाईट बनवून द्यायचो व ह्या साठी कमी पैसे सुद्धा आकारायचो . अश्याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या कडे असलेल्या स्किल च्या बेस वर सर्व्हिस देऊ शकता .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मी ब्लॉगिंग कमाई म्हणजेच how to earn money from blog in marathi च्या बाबतीत असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला . ह्या मध्ये मी तुम्हाला ८ कमाई मार्ग स्पष्ट केले . ह्यातल्या सर्वच मार्ग तुमच्या ब्लॉग शी कनेक्ट होतीलच असे नाही . परंतु ह्यातले बहुतेक मार्ग तुम्ही वापरून तुम्ही ब्लॉगिंग मधून तुमची कमाई सुरु करू शकता . तुम्हाला ब्लॉगिंग कमाई म्हणजेच how to earn money from blog in marathi बद्दल अजून कोणत्या शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका . लवकरच भेटू एक नवीन विषयासोबत …..