योग्य Keyword Research कसा करावा ?

 कीवर्ड रिसर्च म्हणजे काय व ते कसे करावे म्हणजेच how to do keyword research in marathi हे seo मधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे ज्यामध्ये आपण इंटरनेटवर सर्च केल्या जाणाऱ्या लोकप्रिय शब्द किंवा वाक्य यांचा शोध घेतला जातो व ह्या शब्द किंवा वाक्यांचा उपयोग आपल्यासारखेच लोक गुगल ,बिंग, याहू या सर्च इंजिनमध्ये शोधत  असतात . जेव्हा तुम्ही जाणता की वाचकाला नक्की काय हवे ? तर तुम्ही त्या विषयांवर आपले ध्यान केंद्रित करून त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या ब्लॉगचा कन्टेन्ट लिहू शकता . 

how to do keyword research in marath

यामुळे तुम्ही सर्च इंजिनमध्ये रँक करू शकता . कीवर्ड रिसर्च म्हणजे काय हे आपण मागील पोस्ट मध्ये जाणून घेतले.  जर तुम्ही पोस्ट वाचली नसेल तर तुम्ही what is keyword research in marathi हि पोस्ट नक्की वाचा . तर आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत की कीवर्ड रिसर्च कसा करावा ? तर चला सुरु करूया … 

कीवर्ड रिसर्च कसा करावा ? | how to do keyword research in marathi

यामध्ये आपण कीवर्ड रीसर्च करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत हे आपण बघणार आहोत व त्यानुसार कीवर्ड रिसर्च कसा करावा म्हणजेच how to do keyword research in marathi हे जाणून घेणार आहोत . जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही एक चांगली कीवर्ड स्ट्रॅटेजि बनवण्यात व त्याचा योग्य वापर करण्यात यशस्वी व्हाल .  यामुळे तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी योग्य तो कीवर्ड  शोधून त्या कीवर्डवर काम करून वेबसाईटच्या seo सोबतच तुमच्या वेबसाईट च्या रँकिंग मध्ये सुद्धा सुधारणा कराल. 

सर्वप्रथम या SEOच्या माध्यमातून तुमच्या वेबसाईट मध्ये यशस्वी होण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे.  ते म्हणजे तुम्ही कोण आहात ? तुमचे ग्राहक कोण आहेत ? व तुम्ही कोणाला टार्गेट करत आहात ? . खूप सारी लोकं या स्टेपला दुर्लक्ष करतात.  कारण त्यांना असे वाटते की कीवर्ड रिसर्च करण्यात खूप वेळ लागतो आणि  कीवर्ड रिसर्च करण्यात वेळ का खराब करावा व त्यांना असे वाटते की आम्हाला सगळं माहिती आहे की आमच्या वाचकांना काय हवे ते . यामुळेच ते योग्य ते कीवर्ड रिसर्च करू शकत नाहीत. 

 याचे उत्तर एकच आहे ते म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीला रँक करायचा विचार करत आहात व तुमचा वाचक नक्की कोणत्या गोष्टी  सर्च इंजिन मध्ये सर्च करत आहे आणि यामध्ये खूप तफावत असू शकते . जर तुम्ही वाचकांचे प्रश्न जाणले तर तुम्ही त्यानुसार कन्टेन्ट लिहून त्यावर रँक करून तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक आणू शकतात . त्यामुळे तुमच्या वेबसाईटचा परफॉर्मन्स वाढविण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाचकांना बद्दल जाणून घ्यायचे आहे . उदाहरणार्थ लोक एका विशिष्ट गोष्टींबद्दल सर्च करत आहेत जसे की मोबाईल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे गरजेचे आहे ते म्हणजे . 

  • हे शब्द कोण शोधत आहे ? 
  • लोकं मोबाईल हे कधी शोधत आहेत ?
  •  पूर्ण वर्षभर लोक हे सर्च करतात का ?
  •  लोक हे मोबाईल बाबतीत कशाप्रकारे सर्च करत आहेत ? 
  •  ते कोणते प्रश्न विचारत आहेत ? 
  •  ते प्रश्नांमध्ये कोणत्या शब्दांचा वापर करत आहेत ? 
  •  ते कोणत्या मोबाईल बद्दल अधिक शोधत आहेत ? 
  • तुमचे टारगेट ऑडियन्स कोठे राहते ? 

स्टेप 1 – Focus कीवर्ड चा शोध करा 

सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोकस कीवर्ड  निवडायचा आहे . कारण तुम्हाला तुमच्या फोकस कीवर्ड भोवतालीच तुम्हाला तुमची पूर्ण पोस्ट लिहायची आहे . त्यामुळे जर तुमचा फोकस केवढा हा जास्त कॉम्पिटिशन वाला असेल.  तर तुम्ही तिकडे कधीच रँक करू शकत नाहीत . त्यामुळे फोकस कीवर्ड हा कमी स्पर्धा वाला व थोडा फार सर्च व्हॉल्युम वाला असावा. त्यामुळे फोकस केवळ शोधताना तो रँक करेल का ? किंवा त्याची कॉम्पिटिशन किती आहे ? हे जाणूनच फोकस किवर्डची निवड करावी . कारण जर तुम्ही फोकस केवढा जास्त कॉम्पिटिशन वाला निवडत असाल . तर तुमच्या प्रतिस्पर्धी कडे तुमच्या पेक्षा जास्त अनुभव तसेच मनुष्यबळ जास्त आहे त्यामुळे तुम्ही त्यांना मागे टाकून रँक करू शकत नाही .

स्टेप 2 – Related कीवर्ड ची लिस्ट बनवा 

यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या कीवर्ड ची एक योग्य लिस्ट बनवायची आहे . यामध्ये तुम्हाला तुमच्या वाचकाच्या सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे . उदाहरणार्थ जर तुम्ही कीवर्ड रिसर्च बद्दल लिहित असाल तर त्या किवर्ड च्या लिस्ट साठी  तुम्ही गुगल सर्चचा वापर करू शकता.  जेव्हा तुम्ही गुगलमध्ये keyword research असे सर्च करता . तेव्हा गुगल तुम्हाला काही गोष्टी खाली सुचवीत असते आणि या गोष्टी वाचक सर्च करत असतात . 

how to do keyword research in marath

त्यामुळे जर तुम्ही या गोष्टींबद्दल तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहिले.  तर या कीवर्ड वर तुम्ही रँक होण्याची शक्यता जास्त असते . त्यामुळे अशा केवळ ची लिस्ट काढून त्या कीवर्डचा वापर व त्या विषया संबंधीत तुमच्या पोस्टमध्ये लिहण्याचा प्रयत्न करा. 

स्टेप 3 – Long tail कीवर्ड चा वापर करा 

तिसऱ्या स्टेप मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कीवर्ड हा जेवढा लांब तेवढा तो विशिष्ट असतो.  कारण लांब कीवर्ड मध्ये सर्च जरी कमी असले तरी तिकडे तुम्हाला टार्गेट ऑडियन्स मिळते व या कीवर्डवर स्पर्धासुद्धा कमी असल्यामुळे तुम्ही अशा कीवर्डवर सहज रँक करू शकतात . त्यामुळे कीवर्ड शोधताना long tail  कीवर्ड शोधण्याचा प्रयत्न करा .  कारण अश्या कीवर्ड मध्ये तुम्हाला टार्गेट ऑडियन्स तर मिळतेच परंतु अश्या कीवर्डचा कन्वर्जन रेट सुद्धा जास्त असतो . त्यामुळे तुमच्या ब्लॉग वर योग्य तो वाचक येण्याची संभावना जास्त असते . 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आम्ही कीवर्ड रिसर्च कसा करावा म्हणजेच how to do keyword research in marathi या विषयाबद्दल योग्य प्रकारे सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे . जसे की मी या पोस्टच्या सुरुवातीलाच सांगितले होते की तुम्ही कोणत्याही विषयावर काम करा परंतु कीवर्ड रिसर्च करण्यावर जास्त भर द्या . ही एक अशी प्रक्रिया आहे जी कधीच संपणार नाही.  जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट लिहिता तेव्हा त्या पोस्ट साठी कीवर्ड रिसर्च करणे खूप गरजेचे आहे .

 मागील काही वर्षात कीवर्ड रिसर्च ह्या टर्म मध्ये भरपूर बदल झाले आहेत . परंतु ब्लॉगिंग क्षेत्रात कीवर्ड रिसर्च चे अजून ही भरपूर महत्त्व आहे.  त्यामुळे जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत नक्की शेअर करा व तुम्हाला या पोस्ट बद्दल किंवा वेबसाईट बद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. 

Leave a Comment

x