Mobile Phone मधून Blogging कशी Start करावी ?

 तुम्हाला  किंवा ब्लॉगिंग बद्दल माहिती असणारे असे अनेक लोक आहेत ज्यांना हा प्रश्न कायम असतो की मोबाईल मधून ब्लॉगींग कशी करावी ? म्हणजेच how to do blogging from mobile phone in marathi तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की ब्लॉगिंग करण्यासाठी फक्त कम्प्युटर किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे.

How To Do blogging From Mobile Phone In Marathi

  तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.  कारण मी असे अनेक लोक बघितले आहेत किंवा मी स्वतः सुद्धा ब्लॉगिंग जेव्हा सुरु केली तेव्हा मी मोबाईल फोनवरून ब्लॉगिंग करत होतो.  त्यामुळे तुमच्या मनात असलेला हा गैरसमज काढून टाका. 

2021 मध्ये मोबाईल मधून ब्लॉगींग कशी करावी ? | How To Do blogging From Mobile Phone In Marathi

 मोबाईल मधून काम करताना तुम्हाला थोडे दिवस त्रास होऊ शकतो . परंतु जर तुम्हाला मोबाईलची सवय झाली तर तुम्हाला मोबाईल मधून ब्लॉगिंग  करण्यात काहीही त्रास होणार नाही .  चला जाणून घेऊ या मोबाईल मधून ब्लॉगिंग कशी करावी ? म्हणजेच how to do blogging from mobile phone in marathi खूप सारे असे नवीन ब्लॉगर आहेत ज्यांच्या कडे  पैसे नाही आहेत की ते त्या पैशातून जुना किंवा वापरलेला कम्प्युटर किंवा लॅपटॉप विकत घेऊ शकतील . पण त्यांच्याकडे मोबाईल आहे व त्यांना ब्लॉगिंग करण्याची इच्छा आहे . तर अशा लोकांसाठी ही पोस्ट मी आज लिहिली आहे. 

मोबाईल मधून ब्लॉगिंग करण्याचे दोन मार्ग :

  1. ॲप्लिकेशन
  2. ब्राऊजर

आता या मधून तुम्ही काय निवडायचे हे मी तुमच्यावर सोपवून देतो . परंतु तुमच्या मनात अजूनही प्रश्न येत असेल की या दोन मधून कोणता मार्ग हा सोपा आहे व या दोन मधील कोणत्या मार्गाने तुम्ही एकदम सहजरीत्या ब्लॉगिंग करू शकता. 

 तर माझ्या मते तुम्ही या दोन्ही मार्गाचा वापर केला पाहिजे.  कारण असे काही काम आहेत ते तुम्ही ॲप्लिकेशनवर करू शकता परंतु ते काम तुम्ही ब्राउझरवर तेवढ्याच सहजतेने नाही करू शकत . परंतु असेही काही काम आहेत ते तुम्ही ब्राउझर वर करू शकता परंतु ॲप्लिकेशन मध्ये ते तुम्ही करू शकत नाही . त्यामुळे माझे मत हे राहील की तुम्ही या दोन्ही मार्गांचा पुरेपूर वापर करा. 

तुम्हाला तर माहित असेल की ब्लॉगिंग तुम्ही दोन प्लॅटफॉर्मवरून सुरू करू शकता . एक आहे गुगलचे प्रॉडक्ट त्याचं नाव आहे ब्लॉगर आणि हे अगदी मोफत आहे . फक्त तुम्हाला यामध्ये कस्टम डोमेन विकत घेण्यासाठी पैसे खर्च करायचे आहेत.  आणि दुसरा आहे वर्डप्रेस यावर काम करण्यासाठी तुम्हाला होस्टिंग व डोमेन ह्या दोन्ही गोष्टी मध्ये पैसे खर्च करायचे आहेत . तर तुम्ही या दोन प्लॅटफॉर्मवरून ब्लॉगिंगला सुरुवात केली असेल तर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून अगदी सहजपणे ब्लॉगिंग करू शकता. 

परंतु तुमच्या ब्लॉगचा बेसिक सेटअप करण्यासाठी तुम्हाला थोड्यावेळासाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप ची गरज पडणार आहे . परंतु काळजी करण्याचे कारण नाही तुम्ही तुमच्या मित्राकडून थोड्यावेळासाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर करू शकता .  कारण खूप सारे असे काम आहेत जे तुम्ही मोबाईल वरून करू नाही शकत जसे की ब्लॉग ची थीम कस्टमाईज करणे अशा कामासाठी कम्प्युटर व लॅपटॉप ची गरज पडते. 

आणि एक गोष्टी ध्यानात ठेवा की जर तुम्ही तुमचे काम हे मित्राच्या डेस्कटॉपवर करत नसाल तर तुम्हाला सायबर कॅफे हा एक दुसरा सुद्धा ऑप्शन आहे . परंतु जर तुम्ही सायबर कॅफेमध्ये तुमच्या ब्लॉगचा सेटअप करत असाल तर ब्राउझर मध्ये incoginito mode  चालू करून त्यामध्ये तुमच्या ब्लॉगचा सेटअप करा . ह्यामुळे तुमचा ब्लॉग हा सुरक्षित राहील. 

ब्लॉगर प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांसाठी 

मी आशा करतो की तुम्ही तुमच्या ब्लॉगचा सेटअप केला आहे . ब्लॉगरवर ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लॉगइन करण्यासाठी गुगल अकाउंट ची गरज पडते . तर तुम्ही ज्या मोबाईल मध्ये ब्लॉगिंग करणार आहात त्यामध्ये तुम्ही तुमचे गुगल अकाउंट लॉगिन करून घ्या . त्यानंतर गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला ब्लॉगर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. 

How To Do blogging From Mobile Phone In Marathi

 एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ते सुरु करायचे आहे व त्यामध्ये तुमचे गुगल अकाउंट साइन इन करायचे आहे .

How To Do blogging From Mobile Phone In Marathi

 त्यानंतर ते अप्लिकेशन मध्ये तुमच्या सर्व पोस्ट या दिसतील . जर तुम्हाला त्या पोस्ट अपडेट किंवा एडिट करायचे असेल तर तुम्ही अगदी सहजपणे त्या करू शकता . 

How To Do blogging From Mobile Phone In Marathi

जर तुम्हाला नवीन पोस्ट लिहायची असेल तर पेन्सिलच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचा आहे . त्यानंतर त्यामध्ये तुम्ही नवीन पोस्ट सहज लिहू शकता.  यामध्ये तुम्ही कोणत्याही टेक्स्ट ल  bold किंवा italic अगदी सहज करू शकता.  किंवा तुम्हाला तुमच्या पोस्ट मध्ये लिंक जोडायचे असेल किंवा इमेज जोडायचे असेल तर हे सुद्धा तुम्ही या ॲप्लिकेशनच्या द्वारे अगदी सहजपणे करू शकता. 

डेस्कटॉप प्रमाणे मोबाईल मध्ये ब्लॉगरचा वापर कसा करावा 

मित्रांनो जर तुम्हाला मोबाईल मधून अगदी कम्प्युटर प्रमाणे ब्लॉगिंग चे काम करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी ब्राऊजर चा वापर करू शकता . परंतु यासाठी मी तुम्हाला एक सल्ला देईन की ब्लॉगिंग मोबाईल मधून करण्यासाठी गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या ब्राउजर चा वापर करा. 

आणि जसे तुम्ही कम्प्युटरमध्ये ब्लॉगर ओपन करून त्यामध्ये गुगल अकाउंट साइन करतात तसेच इथे सुद्धा तुम्हाला करायचे आहे आणि ब्लॉगरचे डशबोर्ड हे आता पूर्णपणे मोबाईल responsive झाले आहे . त्यामुळे तुम्हाला ते डेस्कटॉप मोड मध्ये ओपन करण्याची गरज नाही . परंतु जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर तुम्ही डेस्कटॉप मोड मध्ये सुद्धा हे ओपन करू शकता व यासाठी तुम्हाला मोबाईलच्या ब्राउजर मध्ये वरती असलेल्या तीन डॉट वर क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला desktop site यावर क्लिक करायचे आहे.  यानंतर तुमची मोबाइल स्क्रीन ही पूर्णपणे डेस्कटॉप मोड मध्ये बदलून जाईल.  मला आशा आहे की हे तुम्हाला पूर्णपणे समजले असेल आणि तुम्हाला यामध्ये कोणताही कोणती शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. 

वर्डप्रेस प्लॅटफॉर्म वर काम करणाऱ्यांसाठी 

ज्या लोकांनी वर्डप्रेसवर ब्लॉग बनवले आहेत त्यांना हे माहीत असेल की ब्लॉगर डशबोर्ड ओपन केल्यावर सर्वात पहिला तुम्हाला गुगल अकाउंट लॉग इन करावे लागते.  परंतु वर्डप्रेस मध्ये तुम्हाला लॉग इन करण्यासाठी युजरनेम व पासवर्ड ची आवश्यकता असते व त्यानंतर तुम्ही वर्डप्रेस मध्ये लॉग इन करू शकता . 

तर चला जाणून घेऊ या वर्डप्रेस ब्लॉग ॲप्लिकेशनच्या द्वारे कसे वापरावे तर यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन वर्डप्रेस नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे.  

How To Do blogging From Mobile Phone In Marathi

वर्डप्रेस अप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ते ओपन करायचे आहे व त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लॉगिन करायचे आहे . 

How To Do blogging From Mobile Phone In Marathi

ज्या लोकांनी त्यांचा ब्लॉग wordpress.com वर बनवला असेल त्यांनी ” log in or sign up with wordpress.com ” वर क्लिक करायचा आहे व ज्यांनी wordpress.org यावर ब्लॉग बनवला असेल तर त्यांना ” Enter your existing site address ” वर क्लिक करायचे आहे . 

आपल्यापैकी बहुतेक लोक wordpress.org वर ब्लॉक बनवतात त्यामुळे त्यांना दुसऱ्या नंबर वालं ऑप्शन निवडायचे आहे व नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईट ची url टाकायची आहे व continue बटन वर क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला युजरनेम व पासवर्ड टाकून  continue वर क्लिक करायचे आहे . 

How To Do blogging From Mobile Phone In Marathi

तुम्ही तुमचा ब्लॉग वर्डप्रेस ॲप्लिकेशनच्या द्वारे सहज हँडल करू शकता.  जर तुम्हाला नवीन पोस्ट लिहायचे असेल किंवा कोणत्याही कमेंट ला रिप्लाय करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲप्लिकेशनच्या द्वारे सहज करू शकता.  असे काही लोक आहेत ज्यांना थोडेफार बदल करण्यासाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप चालू करण्याची आवश्यकता वाटत नाही ते लोकं ह्या ॲप्लिकेशनच्या च्या द्वारे मोबाईल मधून सहज ब्लॉगिंग करू शकतात . 

कम्प्युटर प्रमाणे मोबाईल वरून वर्डप्रेस चा वापर कसा करावा 

यासाठी तुम्हाला मी वरती सांगितल्याप्रमाणे मोबाईलच्या ब्राउझर मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड ओपन करायचा आहे व त्यानंतर वर्डप्रेस डशबोर्ड ओपन करायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या वेबसाईट च्या url च्या समोर /wp-admin लावून सुद्धा ओपन करू शकता व यानंतर तुमचे वर्डप्रेस लॉगइन पेज ओपन होईल . त्यामध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे व यामध्ये तुम्ही अगदी कम्प्युटर प्रमाणे मोबाईल मधून वर्डप्रेस वापरू शकता व मोबाईल मधून अगदी सहजपणे ब्लॉगिंग करू शकता. 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आपण मोबाइल मधून ब्लॉगिंग कशी करावी म्हणजेच how to do blogging from mobile phone in marathi हे जाणून घेतले . जर तुम्हाला ह्या पोस्ट किंवा वेबसाइट बद्दल कोणती ही शंका असेल तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……

Leave a Comment

x