तुम्हाला तुमच्या वर्डप्रेस साईट मध्ये नॅव्हिगेशन मेनू बनवायचे आहेत का ? म्हणजेच how to create menu in wordpress in marathi हे जाणून घ्यायचे आहे ? खरं तर वर्डप्रेस साईट मध्ये मेनू बनवणे हे खूप सोप्पे आहे . तुम्ही तुमच्या नॅव्हिगेशन मेनू मध्ये पेजेस , कॅटेगरी , ब्लॉग पोस्ट्स आणि कस्टम लिंक जोडू शकता .
वर्डप्रेस मध्ये मेनू कसे बनवावे ? | How To Create Menu In WordPress In Marathi
तसे तर नॅव्हिगेशन मेनू चे लोकेशन हे तुमच्या वर्डप्रेस थीम वर अवलंबून असते . व काही थीम मध्ये तुम्हाला दोन मेनू दिले जातात एक आहे प्रायमरी मेनू जो वर्डप्रेस वेबसाईट च्या टॉप ला दिसतो व दुसरा आहे सेकंडरी मेनू जो तुमच्या फुटर मध्ये दिसतो . ह्या मध्ये आपण वर्डप्रेस मध्ये मेनू कसे बनवावे म्हणजेच how to create menu in wordpress in marathi हे बघणार आहोत . तर चला सुरु करूया ……
वर्डप्रेस मध्ये नॅव्हिगेशन मेनू कसे बनवावे ? | how to create navigation menu in wordpress in marathi
नॅव्हिगेशन मेनू बनवण्यासाठी तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये Appearance -> Menus वर क्लिक करायचे आहे . व ह्या मध्ये सर्व प्रथम तुम्हाला मेनू साठी नाव द्यायचे आहे व त्या नंतर Create Menu बटन वर क्लिक करा .
ह्या नंतर तुम्हाला त्या मध्ये तुमच्या हिशोबाने कॅटेगरी , पोस्ट्स , पेजेस व कस्टम लिंक निवडून ह्या मध्ये ऍड करायचे आहे .
सर्व प्रथम तुम्हाला View All टॅब वर क्लिक करून त्या कॅटेगरी , पोस्ट्स , पेजेस आणि कस्टम लिंक ला सिलेक्ट करा जे तुम्हाला तुमच्या मेनू मध्ये हवे आहेत . व ह्या साठी तुम्हाला कॅटेगरी , पोस्ट्स , पेजेस आणि कस्टम लिंक च्या समोर असणाऱ्या चेक बॉक्स वर क्लिक करायचे आहे .
मेनू आयटम निवडल्या नंतर तुम्हाला Add to Menu ह्या बटन वर क्लिक करायचे आहे .
मेनू आयटम हे मेनू मध्ये ऍड झाल्या नंतर तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप ने त्या मेनू ची ऑर्डर ठरवू शकता . म्हणजे कोणता मेनू तुम्हाला पहिला हवाय किंवा दुसरा हवा आहे . ह्या प्रकारे तुम्ही ऑर्डर सेट करू शकता .
वर्डप्रेस मध्ये ड्रॉप-डाउन मेनू कसे बनवावे ? | how to create drop down menu in wordpress in marathi
ड्रॉप डाउन मेनू म्हणजे मेनू चे सब मेनू ह्याला ड्रॉप डाउन मेनू असे म्हणतात . ह्या साठी तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप च्या प्रक्रियेने हे मेनू डाव्या साईड आणून ड्रॉप डाउन मेनू बनवू शकता .
वर्डप्रेस नॅव्हिगेशन मेनू मधील मेनू आयटम edit किंवा remove कसे करावे ?
जेव्हा तुम्ही मेनू मध्ये पेजेस किंवा कॅटेगरी ऍड करतात तर तुम्ही त्यांचे टायटल सुद्धा बदलू शकतात . व तुम्ही कोणत्या हि मेनू आयटम ला remove करायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता .
नॅव्हिगेशन मेनू साठी लोकेशन कसे निवडावे ?
अश्या प्रकारे तुमचे मेनू हे पूर्ण पणे तयार झाले आहेत . आता तुमच्या नॅव्हिगेशन मेनू साठी लोकेशन निवडायचे काम बाकी आहे . परंतु नॅव्हिगेशन मेनू चे लोकेशन हे पूर्ण पणे तुमच्या वर्डप्रेस थीम वर अवलंबून आहे . बहुतेक थीम मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे मेनू साठी २ ऑपशन असतात . आणि ह्या ऑपशन चा उपयोग आपण वरतीच जाणून घेतला आहे . आता मी तयार झालेल्या मेनू चे लोकेशन हेडर मध्ये निवडत आहे .
वर्डप्रेस मेनू हे साइडबार किंवा फूटर मध्ये कसे ऍड करावे ?
तुम्ही थिम मध्ये कोणत्या ही विजेट एरिया मध्ये म्हणजेच साइडबार व फुटर मध्ये हे मेनू ऍड करू शकतात .
त्या साठी तुम्हाला केवळ डॅशबोर्ड मध्ये जाऊन Appearance -> Widgets वर क्लिक करायचे आहे . व ड्रॅग ड्रॉप च्या साहयाने तुम्ही नेव्हिगेशन मेनू विजेट ला साइडबार किंवा फुटत मध्ये ड्रॉप करायचे आहे व त्या नंतर विजेट ला एक टायटल ठेवायचे आहे . व त्या नंतर सिलेक्ट मेनू वर क्लिक करून मेनू सिलेक्ट करायचा आहे . अश्या प्रकारे तुम्ही सहज वर्डप्रेस मेनू हे साइडबार किंवा फूटर मध्ये ऍड करू शकता .
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण वर्डप्रेस मध्ये मेनू कसे बनवावे म्हणजेच how to create menu in wordpress in marathi व त्याबद्दल अधिक ची माहिती जाणून घेतली . तुम्हाला ह्या पोस्ट किंवा वेबसाइट बद्दल काही ही शंका असेळ तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ह्या पोस्ट मुळे तुम्हाला कोणती ही मदत झाली असेल तर ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .