ब्लॉग हा Google Analytics सोबत Connect कसा करावा ?

 ह्या पोस्ट मध्ये आपण google analytics म्हणजे काय ? व ब्लॉग google analytics सोबत कनेक्ट कसे करावे म्हणजेच how to connect my blog to google analytics in marathi व यासोबतच आपण google analytics चा इतिहास व त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

how to connect my blog to google analytics in marathi

 google analytics हे गुगल चे एक प्रॉडक्ट आहे . परंतु हे 2005 पूर्वी अस्तित्वात नव्हते.  2005 पूर्वी google analytics हे urchin नामक कंपनी चे प्रॉडक्ट होते.  त्यानंतर गुगलने त्याला खरेदी केले व या प्रॉडक्ट मध्ये थोडेफार अपडेट करून त्याला google analytics हे नाव देऊन मार्केट मध्ये हे प्रॉडक्ट आणले .  

ब्लॉग google analytics सोबत कनेक्ट कसा करावा ? | How To Connect My Blog To Google Analytics In Marathi

Google Analytics काय आहे ? | what is google analytics in marathi

 जेव्हा आपण एक ब्लॉग किंवा वेबसाईट बनवतो . त्यानंतर हळूहळू ब्लॉग ट्राफिक येणे सुरू होते व ट्राफिक आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर किती वेळासाठी थांबते किंवा कोणकोणते पेजेस विजिट करते . या सर्व गोष्टी google analytics मॉनिटर करून आपल्याला याबद्दल माहिती देते. 

google analytics हे आपण आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर ओपन करून त्यामध्ये तुम्ही तुमच्या वेबसाईटवर किती लोकांनी भेट दिली आहे किंवा कोणते कीवर्ड द्वारा ते तुमच्या वेबसाईट पर्यंत आले आहेत.  म्हणजेच आज किती ट्राफिक होते किंवा कोणत्याही दिवसाचे ट्रॅफिक तुम्ही यामध्ये पाहू शकता. 

एवढेच नव्हे तर तुमच्या वेबसाईट वर आलेले व्हिजिटर्स कोणते पेजेस जास्त वाचत आहेत किंवा कोणत्या पेजेस वरून ते लगेच एक्झिट होत आहेत या सर्वांचा डेटा google analytics वर आपल्याला समजतो. 

जर तुम्ही google analytics  ला व्यवस्थित समजून घेतात व त्यानुसार तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये काही अपडेट करता किंवा बदल करता तर तुमच्या वेबसाईट चे ट्राफिक नक्कीच वाढू शकते व तुम्ही एक योग्य दिशेने काम करू शकता. 

Google Analytics कशाप्रकारे काम करते ? 

जेव्हा तुम्ही google analytics वर अकाउंट बनवता तेव्हा त्यांचा एक कोड आपल्याला मिळतो . तो कोड आपल्या ब्लॉगच्या कोडींग मध्ये टाकायचं असतो . त्यामार्फत google analytic आपल्याला आपल्या ब्लॉग बद्दल डेटा दाखवते. 

तुमचा ब्लॉग हा ब्लॉगरवर असू दे किंवा वर्डप्रेसवर google analytics सोबत कनेक्ट करायची प्रक्रिया ही सारखीच आहे तुम्ही google analytics च्या  एकच अकाउंट मध्ये खूप सारे ब्लॉग कनेक्ट करून त्या सगळ्या वेबसाईट चा डेटा पाहू  शकता. 

Google Analytics वेबसाईट बद्दल कोणता डेटा दाखवते ? 

google analytics आपल्याला आपल्या वेब साइटचा बाऊन्स रेट दाखवते म्हणजेच जो कोणी विजिटर तुमच्या वेबसाईट वर येत आहे त्याने त्या पेज  व्यतिरिक्त अजून कोणते पेज पाहिले आहेत हे यावरून आपल्याला समजते व आपल्या वेबसाईटवर ट्राफिक कोठून येत आहे.  म्हणजेच ऑरगॅनिक ट्रॅफिक येत आहे ? की सोशल मीडिया द्वारा ? हेसुद्धा आपल्याला यामध्ये समजते . तुमच्या वेबसाईट वर आलेले व्हिजिटर्स हे कोणते पेज वाचत आहेत किंवा त्या पेजवर ते किती वेळा साठी थांबले किंवा कोणते पेज वाचण्यात त्यांना आवड आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला google analytics वर समजतात . 

Google Analytics चे अकाऊंट कसे बनवावे ? | how to create google analytics account in marathi

 तुमचा ब्लॉग हा ब्लॉगरवर असू दे किंवा वर्डप्रेस वर google analytics चे अकाउंट बनवण्यासाठी त्याची एकच प्रोसेस आहे . यासाठी तुम्हाला फक्त तीन स्टेप फॉलो करायचे आहेत . 

  1.  google analytics अकाउंट बनवायचे आहे 
  2.  ट्रॅकिंग कोड कॉपी करायचे आहे
  3. google analytics ट्रॅकिंग कोड तुम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये टाकायचा आहे. 
how to connect my blog to google analytics in marathi

सर्वात पहिला तुम्हाला google analytic च्या डॅशबोर्डवर यायचे आहे . व त्यानंतर start measuring वर क्लिक करायचे आहे . त्यानंतर पुढील डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंट से नाव टाकायचे आहे व next वर क्लिक करायचे आहे . 

व पुढील पेज मध्ये तुम्हाला property setup च्या डशबोर्ड मध्ये property name टाकायचे आहे व यामध्ये तुम्हाला तुमची country निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमची currancy निवडायची आहे व त्यानंतर next बटन वर क्लिक करा. 

यानंतर business information च्या पेज मध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगची category निवडायची आहे . त्यानंतर तुम्हाला तुमच्या business size निवडायची आहे व त्यानंतर खालील चेक बॉक्स मध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने क्लिक करू शकता व त्यानंतर create या बटन वर क्लिक करा. 

how to connect my blog to google analytics in marathi

यानंतर तुमच्यासमोर google analytics terms of service agreement चे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला country निवडून खाली I also accept .. च्या चेकबॉक्स मध्ये क्लिक करायचे आहे व एग्रीमेंट वाचून त्यानंतर I Accept या बटन वर क्लिक करायचे आहे. 

यानंतर पुढील पेज मध्ये तुम्हाला choose a platform चा ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला webहा प्लॅटफॉर्म निवडायचा आहे.. 

यानंतर पुढील पेज मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईट ची URL टाकायची आहे व त्यानंतर तुम्हाला stream name टाकायचे आहे व त्यानंतर तुम्हाला create  stream या बटन वर क्लिक करायचे आहे. 

how to connect my blog to google analytics in marathi

यानंतर तुम्हाला web stream details मध्ये ग्लोबल साईट एक चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तिथे दिसत असलेला कोड कॉपी करून घ्यायचा आहे. 

how to connect my blog to google analytics in marathi

Google Analytics ब्लॉगर ब्लॉग सोबत कनेक्ट कसे करावे | how to connect my blogger blog to google analytics in marathi

how to connect my blog to google analytics in marathi

हे करण्यासाठी तुम्हाला गुगल अकाउंट बनवल्यानंतर जो कोड कॉपी केला आहे.  तो कोड तुम्हाला ब्लॉगर डशबोर्ड मध्ये Theme -> Edit html मध्ये जाऊन <head> टॅगच्या खाली पेस्ट करायचा आहे व save या बटन वर क्लिक करायचे आहे . यानंतर google analytics अकाउंट ब्लॉगर ब्लॉग सोबत यशस्वीरित्या कनेक्ट होईल. 

Google Analytics वर्डप्रेस ब्लॉग सोबत कनेक्ट कसे करावे ? | how to connect my wordpress blog to google analytics in marathi

how to connect my blog to google analytics in marathi

google analytics अकाउंट वर्डप्रेस ब्लॉग सोबत कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला google analytics अकाउंट बनवल्यानंतर जो कोड मिळाला आहे / तो कॉपी करून तुम्हाला वर्डप्रेस च्या डशबोर्ड मध्ये जायचे आहे . त्यानंतर Appreance -> Theme editor मध्ये क्लिक करून त्यानंतर Theme files मध्ये तुम्हाला header.php  या ऑप्शनवर क्लिक करून त्यामधील कोड मध्ये <head> tag च्या खाली तुम्हाला तो कोड पेस्ट करायचे आहे व अशा प्रकारे google analytics अकाउंट वर्डप्रेस ब्लॉग सोबत यशस्वीरीत्या कनेक्ट होईल . 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आपण google analytics अकाउंट कसे बनवावे म्हणजेच how to create google analytics account in marathi व google analytics अकाउंट ब्लॉगर व वर्डप्रेस ब्लॉग सोबत कसे कनेक्ट करावे म्हणजेच how to connect my blog to google analytics in marathi याबद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल कोणतीही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका….. 

Leave a Comment

x