नमस्कार मित्रांनो . ब्लॉगिंग क्षेत्र असो की आणखी कोणते हि ऑनलाइन बिजनेस तुम्हाला जर एक उत्तम ब्लॉग किंवा वेबसाईट बनवायची असेल तर उत्तम डोमेन कसा निवडावा हे तर आपण बघितले परंतु उत्तम वेब होस्टिंग कसे निवडावे म्हणजेच How To Choose Web Hosting In Marathi हि शंका प्रत्येकाच्या मनात आहे .
आपण सगळ्यांना माहिती आहे जर ऑनलाइन बिजनेस मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यामध्ये तुमच्या होस्टिंग चा किती मोठा हात आहे त्यामुळे वेब होस्टिंग हि उत्तमच असायला हवी . परंतु ही उत्तम वेब होस्टिंग या इंटरनेटच्या मोठ्या जगात कशी शोधावी व ती वेब होस्टिंग आपल्यासाठी उत्तम कशी असेल त्याची काही कारणे आपण बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला असे काही 5 मुद्दे सांगणार आहे ज्याने तुम्ही तुमची उत्तम वेब होस्टिंग सहज निवडू शकता . तर चला सुरवात करूया …..
५ मुद्दे उत्तम वेब होस्टिंग निवडण्यासाठी | How To Choose Web Hosting In Marathi
1. उपलब्ध स्टोरेज | Available Storage
तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगच्या नुसार तुम्हाला तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटला स्टोरेजची गरज भासणार आहे. कारण त्यामध्ये तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगच्या सर्व फाइल्स त्या स्टोरेजमध्ये स्टोर राहणार आहेत . त्यामुळे वेब होस्टिंग निवडताना तुम्हाला हव्या असणाऱ्या स्टोरेज नुसार होस्टिंग प्लॅनची निवड करा . जर तुम्हाला जास्तीचा स्पेस हवा असेल तर तर तेवढ्या स्पेस मध्ये असणारी वेब होस्टिंग निवडा . परंतु जर तुमची वेब होस्टिंग कंपनी तुम्हाला अनलिमिटेड स्टोरेज देत असेल. तर तुम्ही डोळे बंद करून सुद्धा त्या होस्टिंगवर विश्वास ठेवू शकता. परंतु उपलब्ध स्टोरेज हा जास्तीचा हवा कारण तुमचा स्टोरेज हा फुल झाला. तर तुमच्या वेबसाईटला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो . त्यामुळे वेब होस्टिंगची निवड करताना उपलब्ध स्टोरेज नक्की तपासून बघा.
2. अप टाइम | Up Time
तुम्ही कुठल्या गोष्टीचा इंटरनेट वर शोध घेताय परंतु ज्या वेबसाईट वर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे . ती वेबसाईट काही उघडत नाही आहे . किंवा ती वेबसाईट फार वेळ घेतेय . हि गोष्ट युझर ला तर खटकतेचं परंतु गुगल ला हि ह्या गोष्टीचा त्रास होतोय . कारण गुगल त्याच्या कस्टमर योग्य ती मदत करू शकत नाही आहे . त्यामुळे तुमची वेबसाईट किती सेकंदांमध्ये उघडणार हे पूर्ण पाने तुमच्या वेब होस्टिंग च्या अप टाइम वर अवलंबून असते . त्यामुळे वेब होस्टिंग निवडताना त्या वेब होस्टिंग चा अप टाइम नक्की तपासून बघा . शकतो ९९ टक्के किंवा त्याहून जास्त अप टाइम देणारी वेब होस्टिंग निवडा .
3. ट्रॅफिक लिमिट | Traffic Limit
तुम्हाला ह्या गोष्टीची कल्पना नसेल परंतु काही वेब होस्टिंग महिन्याकाठी ट्रॅफिक ची लिमिट असते . जर तुमच्या लिमिट पेक्षा जास्त युझर जर तुमच्या वेबसाईट ला भेट देत असतील . तर तुमची वेब होस्टिंग कंपनी तुमच्या कडून जास्तीचे पैसे आकारू शकते . त्यामुळे होस्टिंग प्लॅन मध्ये असणारी महिन्याकाठी ट्रॅफिक चे लिमिट नक्की तपासून पहा . त्या लिमिट पेक्षा जर कमी ट्रॅफिक तुम्हाला येत असेल तर घाबरायचे काही कारण नाही . परंतु जर लिमिट पेक्षा जास्त ट्रॅफिक तुमच्या वेबसाईट ला महिन्याकाठी येत असेल तर तर तुमची वेबसाईट हि बंद सुद्धा पडू शकते . त्यामुळे ह्या गोष्टीत अजिबात हयगय करू नका .
4. कस्टमर सपोर्ट | Customer Support
वेब होस्टिंग निवडताना हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे . कारण जेव्हा तुम्हाला कधी हि वेब होस्टिंग संबंधित प्रॉब्लेम येईल तेव्हा तुमची वेब होस्टिंग कंपनी तुम्हाला मदत करेल ना ? हे नक्की तपासून घ्या . कारण जर तुमची वेब होस्टिंग कंपनी तुमच्या प्रॉब्लम च्या काळात तुमची मदत करणारी नसेल तर त्या वेब होस्टिंग चा काय फायदा ? . म्हणून कस्टमर सपोर्ट चा ऑप्शन तुमच्या वेब होस्टिंग प्लॅन मध्ये असणे खूप महत्वाचे आहे .
5. डाटा सुरक्षा | Data Security
जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा अजिबात दुर्लक्ष करू नका . कारण तुम्ही ज्या वेबसाईट वर कंटेन्ट टाकणार आहेत ती भले तुमची वेबसाईट असेल परंतु तुमच्या ज्या वेब होस्टिंग वर तुमची वेबसाईट होस्ट करणार आहात ती वेब होस्टिंग कंपनी विश्वास ठेवण्यालायक आहे कि नाही हे नक्की तपासून बघा . तुमची वेबसाईट तुम्हाला बॅकअप घेण्याचा ऑपशन देत आहेत कि नाही हू सुद्धा तपासून पहा . काही वेब होस्टिंग तुमच्या होस्टिंग प्लॅन सोबत SSL सर्टिफिकेट सुद्धा फ्री मध्ये देते . पण तुमची वेब होस्टिंग नसेल तर तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करून ते SSL सर्टिफिकेट विकत घ्यावे लागेल . त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची चुकी करू नका . कारण तुमची एक चुकी तुमचे स्वप्न बंग करू शकते .
मी वर जे काही मुद्दे स्पष्ट केले ते वेब होस्टिंग चा प्लॅन निवडताना नक्की तपासून घ्या कारण हे सर्व मुद्दे खूप महत्वाचे आहेत . व ह्या सोबतच तुम्ही वेब होस्टिंग कंपनी तुम्हाला कोणते कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिम देते आहे . हे सुद्धा नक्की तपासा . कारण वेब होस्टिंग विकत घेतल्या नन्तर तुमच्या त्याच कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिम सोबत काम करायच आहे . व काही वेब होस्टिंग ३० दिवसांची मनी बॅक ग्यारंटी सुद्धा देते . तर ऑफर चा नक्की फायदा करून घ्या . तुम्हाला जर तुमच्या वेब होस्टिंग मध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही तुमची वेब होस्टिंग रिप्लेस करू शकता . व काही अधिक फिचर चा नक्की लाभ उठवा .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आम्ही उत्तम वेब होस्टिंग कशी निवडावी म्हणजेच How To Choose Web Hosting In Marathi ह्या ५ मुद्दे स्पष्टीकरणा सह सांगितले आहेत . जर तुम्ही त्या मुद्यांवर गांभीर्यासह लक्ष दिले असेल तर उत्तम होस्टिंग निवडताना तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही .
इंटरनेट वर खूप साऱ्या प्रकारच्या वेब होस्टिंग सर्व्हिस आहेत . परंतु त्यात योग्य सर्व्हिस निवडताना अजिबात गांगारून जाऊ नका . आम्ही सांगितलेले मुद्दे व तुमच्या वेब होस्टिंग कडून असणाऱ्या अपॆक्षा व तुमची गरज या सगळयांचा योग्य तो मेळ साधून तुमच्या साठी एक उत्तम होस्टिंगची निवड करा . हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका . लवकरच भेटू एक नवीन विषयासोबत …..