नमस्कार मित्रांनो . ब्लॉगिंग सुरु करा किंवा वेबसाईट तुम्हाला डोमेन ची गरज हि लागतेच . परंतु डोमेन घेताना खूप साऱ्या गोष्टीचा विचार करूनच योग्य तो डोमेन घ्यावा असे मला वाटते कारण डोमेन हे फक्त एक नाव नसून तुमची ओळख आहे तर बघूया ब्लॉग साठी डोमेन नेम कसे निवडावे ? म्हणेजच How To choose Domain Name for Blog In Marathi.
उत्तम डोमेन का महत्वाचा आहे ?
तुमच्या मते डोमेन हे एक साधे नाव असू शकते परंतु ह्या मागे तुमचा बिझनेस किंवा ब्लॉग वेबसाईट यशस्वी होण्याचे पहिले पाऊल दडले आहे तर बघूया नक्की उत्तम डोमेन हा का महत्वाचा आहे ….
पहिला प्रभाव – ह्यला आपण फर्स्ट इम्प्रेशन सुद्धा म्हणू शकता कोणता हि ब्लॉग किंवा वेबसाईट यशस्वी होण्यासाठी पहिला प्रभाव हा खूप गरजेचं आहे कारण वाचक ह्या प्रभाव वरून तुमच्या बद्दल विचार करत असतो . हा प्रभाव जर चांगला असेल तर तो वाचक नक्कीच परत येईल आणि हाच प्रभाव जर वाईट असेल तर वाचक कधी हि तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईट वर परत येणार आणि त्याच्या जवळच्या दुसऱ्या वाचक समोर सुद्धा तो तुमच्या वेबसाईट बद्दल वाईट बोलेल त्या मुळे पहिला प्रभाव हा चांगलंच असावा व त्याची सुरवात तुमच्या डोमेन पासून करा
SEO वरील परिणाम – तुमच्या वेबसाईट आणि ब्लॉग च्या यशस्वी होण्या मागे SEO चा खूप मोठा आहे त्या मुळे त्या वर वाईट परिणाम होता काम नये त्या मुळे तुमची डोमेनची चुकीची निवड SEO वर वाईट परिणाम करू शकतो त्या डोमेन हा उत्तमच हवा.
ब्रँड – तुमचा डोमेन हा तुमची वेबसाईट ला किंवा ब्लॉग ला एक ब्रँड बनवत असतो त्या ब्रँड ची ओळख हि चांगली असावी . ब्रँड हा इंटरनेट वर नाही तर लोकांच्या मनात तयार होत असतो त्या मुळे डोमेन निवडण्याची एक चुकी तुमच्या स्वप्न वर पाणी फिरवू शकतो त्या त्यामुळे हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्क कडे लक्ष द्या.
ब्लॉगिंग साठी एक उत्तम डोमेनची निवड कशी करावी | How To choose Domain Name for Blog In Marathi
वरील दिलेल्या पॉईंट्स वरून तर डोमेन उत्तम का असावा ? हे समजलेच असेल तर मग आत्ता बघूया कि ब्लॉग साठी डोमेन नेम कसे निवडावे ? म्हणेजच How To choose Domain Name for Blog In Marathi ….
१) .Com डोमेन चे जास्त महत्व
आज च्या काळात खूप सारे डोमेन एक्स्टेंशन हे उपलब्ध आहेत जसे कि .com , .in , .org ते .xyz , .pizza इथं पर्यंत परंतु जेव्हा उत्तम डोमेन चे नाव येते तेव्हा आम्ही तुम्हाला .कॉम डोमेन एक्स्टेंशन घेण्याचा सल्ला देऊ .
कारण लोकांना हि .कॉम ची सवय झाली आहे . आपण सुद्धा काही शोधायचे असल्यास काही विचार न करता .कॉम हे एक्स्टेंशन लावून मोकळे होतो त्या मुळे .कॉम एक्स्टेंशन ची एक वेगळी ओळख झाली आहे त्या आम्ही तुम्हाला हे घेण्याचे सुचवू
२) डोमेन नेम मध्ये किवर्डचा वापर
कीवर्ड ( Keyword ) हा तुमच्या डोमेन मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो कारण तुम्ही ह्या मुळे सर्च इंजिन ( Search Engine ) ला तुमची वेबसाईट हि कोणत्या विषया वर हे सांगत असता . तुमचा कन्टेन्ट ( Content ) जर चांगला असेल तर ह्या डोमेन मध्ये असलेल्या कीवर्ड मुळे तुम्ही सहज गूगल पेज मध्ये रँक ( Rank ) करू शकता. उत्तम डोमेन शोधणे हे नक्कीच कठीण आहे परंतु जर तुम्ही कीवर्ड च्या मदतीने एक वेगळा कॉम्बिनेशन डोमेन बनवला तर हि एक नक्कीच वेगळी कल्पना ठरू शकते . त्या मुळे डोमेन मध्ये कीवर्ड असणे खूप गरजेचे आहे .
३) डोमेन नेम हा शॉर्ट असावा
जसे कीवर्ड हा डोमेन मध्ये असणे आवश्यक आहे तसाच तुमचा डोमेन नेम हे शॉर्ट असणे तेवढेच महत्वाचे . शॉर्ट डोमेन नेम हे लक्षात राहण्यासाठी सोप्पे असतात तसेच मोठे डोमेन नेम हे लिहण्यास सुद्धा कठीण असतात त्या मुळे डोमेन हा शॉर्ट असलेला चांगला . डोमेन हा जास्तीत जास्त १५ शब्दाचा असावा . आणि लक्षात ठेवा मोठे डोमेन चे वाईट परिणाम तुमच्या वेबसाईट होऊ शकतो त्या मुळे डोमेन हा शॉर्ट च असावा .
४ ) डोमेन नेम बोलण्यास सोप्पा असावा
डोमेन हा नेहमी लिहण्यास व बोलण्यास सोप्पा असावा कारण कठीण नाव लक्षात राहत नाही त्या मुळे नाव हे सोप्पे असल्यास ते लक्षात सुद्धा राहते व वाचकाला तुमच्या पर्यंत पोहचण्यास मदत होते .
५ ) डोमेन नेम नेहमी युनिक असावा
डोमेन हे नेहमी युनिक ठेवण्याचा प्रयत्न करा . कारण माणसांना युनिक गोष्टी ह्या जास्त वेळ लक्षात राहतात . त्या मुळे गेलेला वाचक परत येतोच पण त्याच्या मनात तुमच्या बदल एक वेगळी ओळख असते त्या मुळे दुसऱ्यांच्या नावाची नक्कल नका करू स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा . आणि हि वेगळी ओळख बनवण्यासाठी युनिक डोमेन नेम तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो .
६ ) डोमेन नेम घेण्याआधी रिसर्च करा
डोमेन नेम हि तुमची ओळख आहे त्या मुळे त्याला उत्तम बनवण्यासाठी रिसर्च करा इंटरनेट वर असलेल्या तुमच्या विषया मधल्या ब्लॉगर शी संपर्क साधा त्यांच्या कडून तुम्हाला नक्कीच मोलाचा सल्ला मिळेल . रिसर्च हा गरजेचा आहे कारण तुम्ही ज्या डोमेन बद्दल विचार करताय तो आधी कोणी रजिस्टर केलेला नसावा . त्या मुळे तुमच्या डोमेन नेम ची यादी बनवा तो आधी कोणी रजिस्टर केला आहे कि नाही ह्यची खात्री करा व त्या नंतरच त्या डोमेन नेम चा विचार करा .
७ ) डोमेन साठी नेम जनरेटर चा वापर करा
इंटरनेट वर खूप सारे नेम जनरेटर उपलब्ध आहेत त्यांचा वापर तुम्ही तुमचे नाव युनिक बनवू शकता साठी जनरेटर चा नक्की वापर करा . ह्या मध्ये तुम्हाला तुम्ही ठरवलेले नाव आधी कोणी सिलेक्ट केले आहे कि नाही हे सुद्धा समजते त्या मुळे उत्तम नाव शोधण्यासाठी जनरेटर तुमचे काम सोप्पे करते
स्वस्त व उत्तम डोमेन कुठून विकत घ्यावा ?
इंटरनेट वर हजारो डोमेन नेम विकत घेण्यासाठी वेबसाइट उपलब्ध आहेत . परंतु जेव्हा उत्तम डोमेन नेम चा विषय येतो ठेवा खूप कमी वेबसाईट वर तुम्ही विश्वास ठेवू शकता . जसे कि ….
- Godaddy.Com
- NameCheap.Com
- Bluehost.Com
ह्या वेबसाईट वर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता कारण ह्या खूप जुन्या वेबसाईट अजून ग्राहकांना चांगली सर्व्हिस देत आहेत त्या मुळे ह्या वेबसाईट विश्वास पात्र आहेत .
तुम्हाला जर कमी पैशानं मध्ये एक उत्तम डोमेन हवे आहेत तर तुम्ही NameCheap.Com वर डोमेन घेऊ शकता . ह्या वेबसाइट वर कुठलेही डोमेन ६००-८०० रुपयांन मध्ये मिळून जाईल . आम्ही सुद्धा आमच्या वेबसाईट च्या डोमेन साठी NameCheap.Com ला पसंती देतो . त्या मुळे NameCheap.Com आमच्या मते डोमेन विकत घेण्यासाठी एक चांगली वेबसाईट आहे .
NameCheap.Com वरून डोमेन नेम कसे विकत घ्यावा ?
1) येथून डोमेन ( Domain ) नाव विकत घेण्या साठी ह्या NameCheap.Com वेबसाईट क्लिक करा
2) क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर NameCheap चे डॅशबोर्ड ओपन होईल

3) त्या नंतर सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला हवे असलेल्या डोमेन चे नाव टाईप करा

4) ह्या नंतर NameCheap तुम्हाला हव्या असलेल्या डोमेन चे एक्स्टेंशन उपलब्ध आहेत कि नाही हे दाखवेल त्या नंतर Add To Cart वर क्लिक करा

5) त्या नंतर Checkout वर क्लिक करून तुमचे पेमेंट पूर्ण करून डोमेन विकत घ्या.

ह्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉग साठी डोमेन नेम कसे निवडावे ? म्हणेजच How To choose Domain Name for Blog In Marathi ह्या बद्दल सविस्तर जाणून घेतले . त्या प्रकारे तुम्ही डोमेन घेतल्यास तुमचे डोमेन हे उत्तम असेल ह्याची मला खात्री आहे .
तरीही ह्या बद्दल तुमच्या मनात कोणते हि प्रश्न असल्यास आम्हाला कोणत्या हि प्रकारचा संकोच न करता विचारा. तुमच्या मदती साठी आम्ही नक्कीच तुमच्या मागे उभे राहू . नंतर भेटूया एक नव्या विषया सोबत…..