Blog साठी उत्तम Niche कसा Choose करावा ?

 नमस्कार मित्रांनो आज आपण ब्लॉगिंगसाठी  विषय कसा निवडावा म्हणजेच how to choose blogging niche in marathi  ह्या वर चर्चा करणार आहोत . ब्लॉग सुरु करताना आपल्याला आनंद होतो . परंतु ब्लॉगिंग मध्ये सर्वात जास्त कठीण काय असेल ते म्हणजे वेबसाईट साठी विषय निवडणे व सातत्याने त्या विषयाच्या निगडित पोस्ट लिहणे . आपल्या ओळखीत असे बरेच लोक असतील जे सुरवात तर एका विषयापासून करतात परंतु नन्तर दुसऱ्याच विषयावर पोस्ट लिहतात .

How To Choose Blogging Niche In Marathi

 जसे कि कोणी आज व्यवसाय बद्दल लिहीत आहे . तर उद्या तो आरोग्या बद्दल लिहणार व नंतर कुठल्या तरी वेगळ्याच विषया वर लिहणार . ह्या चुकी मुळे तुम्ही तुमचे टार्गेट वाचक गमावत आहेत . जसे आपला ब्लॉग हा ब्लॉगिंग ह्या विषयाशी निगडित आहे . ह्यात आपण seo बद्दल सुद्धा लिहतोय . परंतु हा दुसरा विषय सुद्धा ब्लॉगिंग ह्या क्षेत्राशी संबंधित आहे . त्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होयचे असल्यास अश्याच कोणता तरी विषय तुम्हाला निवडावा लागणार आहे . 

ब्लॉगिंगचा विषय निवडण्यासाठी काही टिप्स | how to choose blogging niche in marathi 

जेव्हा तुम्ही ब्लॉगिंगसाठी विषय निवडत असता तेव्हा एका गोष्टीचा विचार करणे फार गरजेचे आहे की तुम्ही ब्लॉगिंग हे नक्की कमाई साठी करत आहात की एक छंद म्हणून. कारण तुम्ही जर ब्लॉगिंग  हे कमाई साठी करत असाल व तुम्ही जो विषय निवडला आहे त्या विषयावर ट्रॅफीक येणार नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही.  

परंतु असेही काही विषय आहेत ज्यामध्ये ट्रॅफिक तर भरपूर येते परंतु त्यात जास्त कमाई होत नाही.  त्यामुळे विषय निवडताना असा ही विषय निवडू नये की त्यात तुम्हाला लिखाण करणे अवघड जाईल.  मग नक्की उत्तम विषय तरी कोणता आहे ? उत्तम विषय ज्याला म्हणता येईल ज्यात तुम्हाला आवड आहे व त्यावर मुबलक प्रमाणात ट्रॅफिक येते व तुम्ही निवडलेल्या विषयाला भविष्यात सुद्धा मागणी असणार आहे . जर तुम्ही निवडलेल्या विषयांमध्ये या सगळ्या गोष्टी असतील तर तुमचा नीचे हा उत्तम आहे.

विषय निवडताना ह्या ४ गोष्टींचा विचार करा 

  1. १. तुमची आवड 
  2. २. भविष्यात मागणी 
  3. ३. बिझनेस किंमत 
  4. ४. महिना व वर्षाकाठी येणारे सर्चेस 

तर चला आम्ही तुम्हाला  उत्तम विषय निवडण्यासाठी मदत करतो . जर तुम्ही आधीच कोणता तरी विषय निवडला असेल . व आता पर्यंत जेवढी पोस्ट वाचली त्यामुळे तुम्हाला तो विषय चुकीचा वाटतोय . तर घाबरू नका तुम्ही तुमचा विषय कधी हि बदलू शकता . तर चला ब्लॉगिंग चा विषय कसा निवडावा म्हणजेच how to choose blogging niche in marathi हे बघूया ….. 

1. कोणत्या विषयात आवड आहे ? 

How To Choose Blogging Niche In Marathi

स्वतःला विचार कि कोणत्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे . आवड म्हणजे असा विषय जे काम करताना किव्हा त्या संबंधित काम करताना तुम्हाला कंटाळा येत नाही . त्या विषय बद्दल काम करताना तुम्ही ते काम आनंद सकट व मन लावून करता . काळजी करू नका . थोडा स्वतःला वेळ द्या . तुम्हाला नक्कीच सर्वात जास्त असा आवडीचा विषय नक्कीच सापडेल . 

2. विषयात आवड व फायदा दोन्ही आहे का ? 

आता तुम्ही सांगाल ते आम्हाला कसे कळणार ? घाबरू नका …. तुमची हि शंका सुद्धा मी  दूर करतो . जसे कि तुम्हाला वाटतेय कि टेक्नॉलॉजी ह्या विषय बद्दल आपण सुद्धा गुगल वर खूप सर्च करतो म्हणजे दुसरी लोकं हि सर्च करत असतील . म्हणजे ह्यात खूप फायदा आहे ? पण जर तुम्हाला टेक्नॉलॉजी ह्या विषयात काडीमात्र रस नसेल . पण फायदा दिसतोय म्हणून तुम्ही ह्या विषयात लिहत असाल . 

तर कधी तरी अशी वेळ येईल कि तुम्ही ब्लॉगिंग सोडून द्याल . कारण ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी खूप वेळ लागतो . त्यामुळे ब्लॉगिंग चा विषय हा तुमच्या आवडीचा नसेल तर तुम्हाला ते करताना आनंद मिळणार नाही . व कधीतरी नाईलाजास्तव तुम्ही ब्लॉगिंग सोडून द्याल . त्यामुळे ब्लॉगिंग चा विषय निवडताना आवड व फायदा ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करा . 

3. विषयात असणारी स्पर्धा | competition

How To Choose Blogging Niche In Marathi

तुम्ही आवडीचा विषय निवडला ? त्या मध्ये फायदा आहे कि हि नाही हे सुद्धा बघितल ? पण त्या विषयात असणाऱ्या स्पर्धेचा विचार कधी करणार ? कारण तुम्ही जशी ब्लॉगिंग सुरु केली आहे तशी हजारो लोक तुमच्या विषयावर आधी पासून लिहत आहेत . व पुढे सुद्धा लिहणार आहेत . त्यामुळे तुमच्या कडे इतरांपेक्षा काही वेगळा नसेल तर तुम्ही ह्या स्पर्धत कसे टिकणार . त्यामुळे विषय निवडताना आवड व फायदा ह्यासोबत स्पर्धेचा विचार करायला विसरू नका . त्यामुळॆ विषय हा असाच निवड ज्यात स्पर्धा खूप असेल . 

4. दीर्घकालीन विचार करा | long-term demand

तुम्ही जो विषय निवडत आहात तो विषय पुढील काळात सुद्धा तेवढ्यच मागणीत राहील का ह्यचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे . नाही तर तुम्ही जो विषय निवडत आहेत त्याची प्रसिद्धी फक्त १ किंवा ६ महिन्या पर्यंत मर्यादित असेल तर पुढे जाऊन तुम्हाला दुसरा विषय निवडावा लागणार .

 त्यामुळे विषय निवडताना दीर्घकालीन विचार करा . तुम्ही गुगल ट्रेंड ह्या टूल च्या साहयाने आता कोणत्या गोष्टी चर्चेत आहेत किंवा लोक कोणत्या गोष्टी गुगल वर सर्च करत आहेत हे तुम्हाला समझेल . व विषय निवडताना तुम्हाला मदत होईल .

5. लोक तुमचे ब्लॉग का वाचतील ? 

वर दिलेल्या मुद्यच्या साहयाने तुम्हाला बरेच विषय लक्षात आले असतील . परंतु हे सगळं असून सुद्धा तुम्ही लिहिलेला ब्लॉग लोक का वाचतील ? ह्याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे . कारण तुम्हाला जर त्याविषयात काहीच अनुभव नसेल . किंवा तुम्ही त्या विषयात पारंगत नसाल . तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळा कन्टेन्ट कसा लिहाल . व समोरचा माणूस वेळ देऊन तुमचा ब्लॉग का वाचेल ह्या गोष्टींचा सुद्धा वेळ घेऊन विचार करा . हे प्रश्न स्वतःला विचारा तेव्हाच तुम्हाला त्या प्रश्नांचे योग्य ते उत्तर मिळेल .

How To Choose Blogging Niche In Marathi

 जर तुम्ही माझ्या बद्दल विचार कराल . तर मी १ वर्ष झाले ह्या ब्लॉगिंग क्षेत्रात काम करतोय त्यामुळे खूप साऱ्या चुका सुद्धा केल्या व त्यामधून शिकून अनुभव सुद्धा घेतला . त्यामुळेच मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतो . परंतु तुमच्या कडे असा काही अनुभव आहे का ? त्यामुळे ब्लॉगिंग हे फक्त कमाईचे साधन नसून इथे आपण हजारो माणसे जोडत असतो त्यामुळे समोरच्या माणसांचा विचार करणे गरजेचे आहे . तेव्हाच तुम्ही ब्लॉगिंग मध्ये ” लंबी रेस का घोडा ” बनू शकाल व ब्लॉगिंग क्षेत्रात यशस्वी व्हाल .  

तुम्हाला जर ब्लॉगिंग विषयाबद्दल लिस्ट हवी असेल तर लवकरच मी त्या साठी नवीन पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करेन . ज्याने ब्लॉगिंग साठी उत्तम व जास्त कमाई करून देणारा विषय निवडण्यास तुम्हाला मदत होईल . 

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट आपण ब्लॉगिंग साठी उत्तम विषय कसा निवडावा म्हणजेच how to choose blogging niche in marathi . जो तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करेल ह्या बद्दल सविस्तर चर्चा केली . तुम्ही जर ह्या मुद्यांच्या साहयाने तुमच्या ब्लॉग साठी विषय निवडलात तर तुम्ही नक्कीच ब्लॉगिंग क्षेत्रात यशस्वी व्हाल व ह्यात काहीच शंका नाही . तुम्हाला जर ह्या पोस्ट किंवा ह्या वेबसाईट बद्दल काही हि शंका असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका . लवकरच भेटू एक नवीन विषयासोबत …. 

Leave a Comment

x