गुगलमध्ये Blog ची Position कशी Check करावी ?

 कोणत्या ही ब्लॉगरची एकच इच्छा असते ती म्हणजे त्याचे ब्लॉग पोस्ट ही गुगल मध्ये उत्तम रित्या रॅंक होणे . जर तुम्ही अश्या विषयावर लिखाण केले असेल ज्या वर इतर लोकांनी सुद्धा भरपूर लिखाण केले आहे तर अश्या पोस्टला गुगल मध्ये रॅंक होण्यास बराच वेळ लागू शकतो . परंतु तुम्ही जर अश्या विषयावर लिखाण केले आहे ज्या वर अजून कोणीच जास्त प्रमाणात लिहले नाही आहे . तर साहजिकच तुमचे आर्टिकल म्हणजेच ब्लॉग पोस्ट ही गुगल मध्ये लवकर रॅंक होईल . 

 इंटरनेट वर असे भरपूर विषय आहेत ज्या वर कोणी जास्त लिहले नाही आहे व कोणी ते टॉपिक जास्त सर्च सुद्धा करत नाही, व जर तुम्ही अश्या टॉपिक वर लिखाण केले व पोस्ट रॅंक झाली तरी त्याचा तुम्हाला जास्त काही फायदा होणार काही . कारण ते टॉपिक जर कोणी सर्च करत नसेल तर तुम्हाला ट्रॅफिक कोठून येणार ? ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ही विषयावर लिखाण कराल ते high क्वालिटी असायला हवे व अश्या विषयांवर लिखाण करा ज्या बद्दल लोक गुगल वर सर्च करत असतील . व आर्टिकल असे लिहा की तुमच्या आर्टिकल मध्ये त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटायला हवी .

how to check blog position in google in marathi

 मित्रांनो आपण आपल्या ब्लॉग पोस्टचा seo करतो कारण त्या पोस्ट  सर्च इंजिन मध्ये आरामात इंडेक्स व्हावी व लवकरात लवकर सर्च रिजल्ट मध्ये दिसायला हवी . परंतु तुम्हाला ही माहिती आहे का की तुम्ही गुगल मध्ये तुमच्या ब्लॉग पोस्ट ची पोजिशन सुद्धा चेक करू शकता . म्हणजेच तुम्ही ही जाणून घेऊ शकता की तुमचे आर्टिकल ही गुगल मध्ये कोणत्या पोजिशन वर रॅंक करत आहे . व आज आपण ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण सर्च इंजिन मधील पोजिशन व रॅंकिंग कशी चेक करायची म्हणजेच how to check blog position in google in marathi हे सांगणार आहे .  

तुम्ही तुमच्या ब्लॉगचा ऑन पेज SEO आणि ऑफ पेज SEO तर केलात असेल . परंतु जर तुम्हाला तुमची ब्लॉग पोस्ट गुगल सर्च इंजिन मध्ये कशाप्रकारे परफॉर्म करत आहे . हे माहीत नसेल तर याचा काहीच फायदा नाही . तुम्हाला हे माहिती असायला हवे की तुमचा ब्लॉग सर्च इंजिन मध्ये कशाप्रकारे परफॉर्म करत आहे व तुमच्या ब्लॉगची सर्च इंजिन मध्ये पोझिशन काय आहे. 

सर्वप्रथम तुमच्या ब्लॉग पोस्ट गुगल सर्च इंजिनमध्ये इंडेक्स होण्यासाठी साईट मॅप गुगल सर्च कंसोल  मध्ये सबमिट करणे गरजेचे आहे . साईट मॅप सबमिट केल्यानंतर तुमच्या ब्लॉग पोस्ट ह्या गुगल सर्च इंजिनमध्ये इंडेक्स होतात व त्यानंतर त्या रॅंक होतात परंतु त्या ब्लॉग ची पोझिशन सर्च इंजिन मध्ये कशी चेक करावी ? म्हणजेच how to check blog position in google in marathi हे आपण आज बघणार आहोत. 

सर्च इंजिन मधली ब्लॉग ची पोझिशन चेक करण्यासाठी गुगल वेबमास्टर तुमची मदत करत असते . व तुम्हाला हे सांगते की तुमच्या ब्लॉग ची पोझिशन काय आहे व त्यावर किती क्लिक येत आहेत . गुगल च्या मदतीने तुम्ही सहज तुमच्या ब्लॉगची पोजीशन चेक करू शकता.  तर चला बघूया गुगल वेब मास्टर च्या मदतीने ब्लॉगची पोझिशन कशी चेक करावी ? 

गूगल मध्ये आपल्या ब्लॉगची पोजीशन कशी चेक करावी ? | how to check blog position in google in marathi

स्टेप 1 – सर्वप्रथम गुगल सर्च मध्ये लॉगिन करा 

स्टेप 2 – तुमच्या वेबसाईट ला सिलेक्ट करा 

स्टेप 3 – व त्यानंतर परफॉर्मन्स ऑप्शन वर क्लिक करा व तिथे आपली पोझिशन बघा

परफॉर्मन्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉगची सर्च इंजिन पोझिशन समजेल. 

how to check blog position in google in marathi

अवरेज पोजिशन 

जसे की वरती दिलेल्या फोटो मध्ये तुम्ही बघू शकता की माझ्या ब्लॉगची अवरेज पोझिशन ही 30.8 आहे याचा अर्थ असा की जेव्हा कोणी माझ्या ब्लॉगचे संबंधित पोस्ट गुगलमध्ये सर्च करते तेव्हा त्या पोस्ट ची पोझिशन ही 30 असते .

तुम्हाला तर माहितीच असेल की जेव्हा कोणीही गुगलवर सर्च करतो तेव्हा पहिल्या पेजवर 10 रिझल्ट दिसतात . तर माझ्या ब्लॉगची पोजिशन ही 30 आहे तर माझा ब्लॉग हा तिसऱ्या पेजवर दिसेल असे समजा . 

टोटल इम्प्रेशन 

याचा अर्थ असा की तुमचा ब्लॉग ची लिंक सर्च इंजिन मध्ये किती वेळात दाखवली गेली.  असे समजा की मी ऑन पेज seo म्हणजे काय यावर पोस्ट लिहली आहे व जर कोणी त्यासंबंधी गुगलवर सर्च करत असेल व जर माझे पोस्ट ही पोस्ट पहिल्या पेजवर असेल किंवा दहाव्या पेजवर परंतु  तरीसुद्धा माझा 1 इम्प्रेशन मोजण्यात येतो . 

टोटल क्लिक 

याद्वारे आपल्याला समजते की गुगल द्वारे आपल्या ब्लॉगवर किती लोकांनी क्लिक केले आहे.  समजा की जर कोणी गुगल मध्ये काही सर्च करत असेल व जर आपला ब्लॉग तिथे रॅंक असेल व त्यावर जर कोणी क्लिक करून तो ब्लॉग ओपन केला तर तो 1 क्लिक मोजला जातो. 

अवरेज CTR 

याचा अर्थ असा की तुमच्या ब्लॉग वर सर्च इंजिन द्वारे किती अवरेज क्लिक येतात . असे समजा की तुम्हाला 100 इम्प्रेशन आले आहेत व त्यावर 4 क्लिक आली आहेत तर तुमचा एव्हरेस्ट CTR हा 4 % असेल. 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आज आपण जाणून घेतली की ब्लॉगची गुगलमध्ये पोझिशन चेक कशी करावी ? म्हणजेच how to check blog position in google in marathi. जर तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. …….

Leave a Comment

x