नमस्कार मित्रांनो , मागील पोस्ट मध्ये आपण जाणून घेतले की ..आणि ह्या पोस्ट मध्ये आज आपण वर्डप्रेस ब्लॉग ची थीम कशी बदलावी म्हणजेच how to change theme in wordpress in marathi . तुम्ही तुमचा ब्लॉग हा वर्डप्रेस मध्ये बनवा किंवा ब्लॉगर मध्ये तुम्हाला दोन्ही मध्ये थीम ची गरज ही लागतेच . कारण थीम हीच तुमच्या वेबसाइट चे सौंदर्य वाढवत असते .
टेंप्लेट आणि थीम ह्या दोघांचा अर्थ हा सारखाच आहे . आणि ह्या मध्ये एक वेगळे प्रकारचे layout असते जे तुमच्या ब्लॉगचे सौंदर्य वाढवत असते . तुम्ही जर ब्लॉगिंग क्षेत्रात काही काळ काम केले असेल तर थीम तुमच्या ब्लॉग साठी किती गरजेचे आहे ही वेगळे सांगण्याची गरज नाही . तर चला जाणून घेऊया वर्डप्रेस ची थीम कशी बदलावी म्हणजेच how to change theme in wordpress in marathi ………
वर्डप्रेस थीम कशी बदलावी ? | how to change theme in wordpress in marathi
जर तुम्ही तुमच्या वर्डप्रेस थीम शी खुश नसाल तर तुम्ही सहज थीम बदलू शकता. व तुम्हाला हवा तो layout तुम्ही तुमच्या वर्डप्रेस ब्लॉग साठी सेट करू शकता . वर्डप्रेस ब्लॉगची थीम बदलण्याचे 2 मार्ग आहेत .
- थीम सर्च करून थीम बदलणे
- थीम अपलोड करून थीम बदलणे
ह्या दोन्ही मार्गाच्या मदतीने तुम्ही सहज वर्डप्रेस ब्लॉग ची थीम बदलू शकता . मी तुम्हाला दोन्ही मार्ग सविस्तर सांगणार आहे . तुम्ही तुम्हाला हवा तो मार्ग अवलंबून थीम बदलू शकता . सर्वात मी तुम्हाला थीम सर्च करून ती कशी बदलावी ही सांगणार आहे .
1. थीम सर्च करून थीम कशी बदलावी ?
वर्डप्रेस मध्ये तुम्हाला 8000+ थीम ह्या मोफत मध्ये उपलब्ध आहेत . व या मध्ये तुम्हाला हवी ती थीम सर्च करून ती थीम तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगला सेट करू शकता .
स्टेप 1 – तुमच्या वर्डप्रेस dashboard मध्ये सर्व प्रथम लॉगिन करा.
स्टेप 2 – त्यानंतर वर्डप्रेस dashboard मध्ये Appearance वर क्लिक करा .
स्टेप 3 – Appearance वर क्लिक केल्या नंतर Themes वर क्लिक करा .
स्टेप 4 – Themes वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक वेगळी स्क्रीन open होईल त्या मध्ये Add New ह्या ऑप्शन वर क्लिक करा .
स्टेप 5 – ह्या नंतर feature filter वर क्लिक करा .
Subject – इथे तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा विषय निवडायचा आहे . म्हणजे जर तुमचा ब्लॉग हा मनोरंजन संबंधित असेल तर तुम्हाला Entertainment वर क्लिक करायचे . अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने subject निवडू शकता .
Features – ह्या मध्ये तुम्हाला तुमच्या थीम च्या मध्ये कोणते कोणते features हवे आहेत ही निवडायचे आहे .
Layout – ह्या मध्ये तुम्हाला तुमच्या थीमचे layout कसे हवे आहे he निवडायचे आहे .
स्टेप 6 – ह्या सगळ्या गोष्टी निवडल्या नंतर तुम्हाला apply filter वर क्लिक करायचे आहे .
स्टेप 7 – apply filter वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर भरपूर थीम दिसण्यास येतील त्यातील उत्तम थीम select करून install करायचे आहे .
स्टेप 8 – थीम install झाल्या नंतर त्या थीमला तुम्हाला activate करायचे आहे . activate केल्या नंतर तुमची थीम यशस्वीरित्या तुमच्या ब्लॉगला सेट होईल.
स्टेप 9 – ह्या नंतर तुम्ही appearance -> Customize मध्ये जाऊन तुमच्या थीम ल तुमच्या हिशोबाने modify करू शकता .
ह्या 9 स्टेप तुम्ही आम्ही दाखवल्या प्रमाणे केल्या नंतर तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगची थीम ही यशस्वीरित्या बदलेल . तर चला दूसरा मार्ग म्हणजेच वर्डप्रेस थीम अपलोड करून कशी बदलावी म्हणजेच how to upload theme in wordpress marathi हे सविस्तर पणे पाहूया .
2. अपलोड करून वर्डप्रेस थीम कशी बदलावी ? | how to upload theme in wordpress marathi
कित्येक वेळा असे होते की आपल्याला जी थीम हवी आहे ती सर्च करून सुद्धा मिळत नाही . मग अशावेळी आपण तेथे डाउनलोड करतो होती ती डाउनलोड केल्यानंतर त्याचे मला वर्डप्रेस ब्लोग मध्ये अपलोड करतो अपलोड करुन कशी बदलावी हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया
स्टेप 1 – सर्वप्रथम तुम्हाला वर्डप्रेस dashboard मध्ये लॉगिन करायचे आहे
स्टेप 2 – त्यानंतर वर्डप्रेस डायपर मध्ये तुम्हाला Appearance वर क्लिक करायचे आहे व त्यानंतर theme या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3 – त्यानंतर तुमच्या समोर एक वेगळी स्क्रिन ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Add New या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4 – व त्यानंतर Upload Theme या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे .
स्टेप 5 – Upload Theme या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेगळी स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये Choose File ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या थीमची फाईल select करायची आहे
स्टेप 6 – व त्यानंतर Install Now या बटन वर क्लिक करून ती थीम इंस्टॉल करायची आहे व तिथे इंस्टॉल झाल्यानंतर थीमला Activate करायचे आहे.
या 6 स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमची वर्डप्रेस ब्लॉगची थीम यशस्वीरित्या बदलेल.
निष्कर्ष
या पोस्टमध्ये आज आपण वर्डप्रेस ब्लॉगची थीम कशी बदलावी ? म्हणजेच how to change theme in wordpress in marathi हे जाणून घेतले . त्यासाठी आपण 2 मार्ग सविस्तरपणे जाणून घेतले. या मार्गांच्या मदतीने तुम्ही यशस्वीरित्या तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगची थीम बदलू शकता . तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल कोणतीही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका ……..